Skip to main content

श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसानिमित्त समजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले



 किनवट ता. प्र दि ३० भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसा निमित्त किनवट शहरात समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भाजप च्या ज्येष्ठ पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवुन कार्यक्रम यशस्वी केले.

माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपा तर्फे ई-सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली ज्या मध्ये नागरीकांना विविध दाखला सुविधा ना नफा ना तोटा या तत्वावर पुरवली जाणार असुन ज्याचे संचलन भाजपा कार्यकर्ता व विद्यार्थी परिषद चे विद्यार्थी करणार आहेत ज्यामध्ये सद्य स्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली ई-श्रम कार्य ची नोंदणी मुख्यत्वे केली जाणार आहे ज्यामध्ये भविष्यात आधार दुरुस्ती केंद्र, मतदान कार्ड नोंदणी केंद्र यांच्या सह विविध नागरी दाखल्यांच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

या निमित्त दिनांक २९ रोजी आयोजित कार्यक्रामाव्दारे बोलतांना भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले कि भाजपा हा एक विचार आहे ज्यामध्ये लोककल्याण हा महत्वाचा भाग असुन भाजपा मध्ये नेतृत्व करण्याची किंवा नेतृत्वाची आवश्यकता नसते तर जो विचार आहे तो जरी कार्यकर्त्याने अंगीकारला तर भाजपा हि निरंतर चालत असते त्यामुळे कार्यलर्त्यांनी इतर कोणत्याही शुल्लक गोष्टीचा विचार न करता लोकांच्या हितामध्ये निरंतर काम करत रहावे असे मार्ग दर्शन विविध ज्येष्ठ पदाधिका-यांकडुन मिळाले तर आयोजित कार्यक्रमाध्ये भाजपा किसान आघाडी चे प्रदेश सरचिटणिस सुधाकर भोयर, भाजपाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, ज्येष्ठ सदस्य राघु मामा, अजय चाडावार यांची मंचावर उपस्थिती होती. तर कार्यक्रमात अशोक चिन्नावार, संतोष चनमनवार, सतीश बिराजदार,  युवा आघाडीचे उमाकांत कराळे, वि.हिं.प चे  शिवराज चाडावार, सुनिल मच्छेवार,  शिवा आंधळे, पंकज माडपेल्लीवार,  नरेंद्र सिरमनवार, शिवा क्यातमवार, राजेंद्र भातनासे,  बाबू उटलावार, गजानन शिवनकर, जगदीश तिरमनवार, निखील कावळे, सतिष नेम्मानिवार, बालाजी धोत्रे,   गौरव इटकेपेल्लीवार, संतोष सिरमनवार, संतोष मरसकोल्हे, राहूल दग्गुलवार, आकाश भंडारे, देवराव कोम्मरवार, सुनिल मच्छेवार, संजय धोबे, साई नार्लावार, साई नेम्मानिवार, , गौरव इटकेपेल्लीवार, साई येलेश्वरवार, सम्राट सर्पे, दिनेश नगरुलवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास कोल्हारिकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण कदम यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जयराज वर्मा, वैभव सिरमनवार, नरसिंग तक्कलवार आदींनी परिश्रम घेतले.

तर कार्यक्रमात रजनीकांत राईचंवार, विनायक ठोंबरे, विकास जाधव, अंकुश पेन्शनवर, शिवा तोटावार, राजू कलकुंटलावार यांना  ई श्राम कार्डचे वाटप करण्यात आले. तर शहरात विविध ठीकाणी श्रीनिवास नेम्मानिवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर त्यांच्या प्रतिष्ठानवर प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा देणा-यांची रिघ लागली होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...