Skip to main content

गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन - एक दृष्टीक्षेप ॲड. सचिन दारवंडे यांचा विशेष लेख

गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन -  एक दृष्टीक्षेप 



"The hottest place in Hell is reserved for those who remain neutral in times of great moral conflict.

                        Dr. Martin Luther King, Jr.



किनवट प्रशासनाने स्मशानाच्या भिंतीचे स्वरक्षण करून, तेथील मुडद्याना शांत झोपी देऊन, जिवंत हाड- मास असलेल्या गांधी नगर येथील माणसाच्या घरावर कडाक्याच्या थंडीत अन महामारीच्या काळात  बुलडोझर फिरवून किनवट प्रशासनाने त्यांना अन्यायकारकपणे बेघर केले आहे. 


आज गांधी नगरच्या लोकांना बेघर करून दोन महिने होत आहेत. मागील दोन महिन्यात त्या लोकांचे काय हाल झालेत यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.



निसर्ग माणसांवर कोपतो हे सर्वज्ञात आहे,परंतु निसर्गाने मागील दोन महिने त्या लोकांचा छळ केला आहे. भर दिवसा नभात ढग आणि घराचे दरवाजे बंद करून अंथरून घेऊन बसावे अशी रक्त गोठवणारी थंडी. प्रश्न असे आहेत या लोकांनी दोन महिने कसे काढले असेल? घरात लाईट गेली तर रात्र भर मानस जागून काढतात ही लोक अंधारात कसे राहत असतील? T. V वर साप दिसला तर ते साप रात्री स्वप्नात येतात, त्याच्या अंथरुणात रोज साप निघत आहेत त्याचं जगणे कसे असेल ? एका स्त्री चा गर्भपात झाला तो कुणामुळे ?. त्या स्त्री ची काय मानसिक स्थिती असेल? लहान मुले देशाचे भविष्य आहेत त्याची मुले त्या  मोकळ्या मांडवात अभ्यास करत असतील का? तेथील काही लोकांची मुले अपंग आहेत त्याचा श्वास तपासून बघण्याची गरज आहे का? शेवट चा प्रश्न असा आहे ही मानस आहे कि जनावर ?



मोकाट फिरणाऱ्या जनावरना ठेवण्यासाठी कोडवाडा असतो परंतु जिवंत माणसाला ठेवण्यासाठी किनवट प्रशासनाकडे जागा नाही ! 

प्रशासन निष्ठुर झाले आहे, खरं पहिले तर किनवट प्रशासनाच्या मानवी संवेदना तपासून पाहण्याची गरज आहे, तिथं माणसंच बसली आहेत.... ना?


गांधी नगरच्या लोकांनी स्वतःला बेघर समजून मोकळ्या मांडवात संसार सुरु केला, प्रशासनाला सुद्धा माहित होते दोन वेळच्या जेवणाने मारलेली माणसे काय विरोध करणार ?. निराश, हतबल , आणि शोषित लोकांसाठी आकांक्षा आळणे आशेचा किरण म्हणून समोर आली आहे. तिने प्रशासनाच्या विरोधात सुरु केलेले चक्री उपोषण व मंत्रालयात जाऊन तिथे या लोकांच्या समस्या मांडल्यामुळे तिचं नेतृत्व करण्याची क्षमता पुढे आली आहे. संघर्षातून नेतृत्वाला झळाळी मिळते, हा संघर्ष तिचा किनवट च्या राजकीय पटलावर उदय म्हणावा लागेल.



गांधीनगरच्या लोकांची लढाई ही नैतिक व न्यायिक आहे. या लढाई मुळे त्या लोकांना स्वतःच्या हक्काच्या घराची स्वप्न पडत आहेत. आज गांधी नगर च्या लोकांना बेघर केले आहे उद्या तेच बुलडोजर कुणाचेही घर उध्वस्त करण्यासाठी येऊ शकते  कारण Injustice anywhere is a threat to justice everywhere ( कोठेही अन्याय सर्वत्र न्यायाला धोका आहे). मशीन आणि शासकीय प्रशासनाला मानवी संवेदना नसतात. परंतु किनवट च्या लोकांनी स्वतःच्या धार्मिक सामाजिक संवेदनेला जागून गांधी नगरच्या आंदोलनास समर्थन दिले पाहिजे 


Without any political stand i support Akanksh Alane and her team.I does not want to reserve my place in hell ✊️



Adv S. B. Darwande

Distinct & Session Court

( Nanaded )

9011671567

Comments

  1. Nice thinking about that people, also need to provide that people's/ societies rights by Kinwat Muncipal Corporations. Jaybhim

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला