Skip to main content

विनापरवाना अवैधरित्या दारू विक्रेत्याला तीन वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा..

 


किनवट (तालुका प्रतिनिधी) एखादा व्यवसाय करणे हे जसे सरकार थांबू शकत नाही म्हणजेच  दारू निर्मिती करणे ही बाब सरकार थांबवू शकत नाही. परंतु जनता व पोलीस एखादी गोष्ट जर बेकायदेशीर असेल तर निश्चितच थांबू शकतात हे आज माहूर येथील न्यायालयाने दिलेल्या निकाला वरून निश्चित झाले आहे.

अवैधरित्या देशी दारूची पानटपरीवर दारू विकनाऱ्या इसमाला माहूर न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा दिनांक 12 /10/ 2019 रोजी अंदाजे 18;20 वाजता पान टपरीवर अंजनखेड तालुका माहूर येथे 15 बॉटल विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवल्याने तसे सरकार पक्षातर्फे  सरकारी विधिज्ञ श्री डी एस भारती यांनी सिद्ध केल्याने व विद्वत्तापूर्ण युक्तिवाद सादर केल्याने तसेच आरोपीचे वकील श्री एस.एस.राठोड यांचे युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपी श्री प्रभाकर गंगाराम पडलवार यांना माहू न्यायदंडाधिकारी साहेबांनी तीन वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची तसेच सदर दंड न भरल्यास साध्या सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा दिनांक 21/1/20220 रोजी सुनावली त्यामुळे किनवट/ माहूर विधानसभेतील अवैद्य दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत सदर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आहे असे जन सामान्यातून संबोधल्या जात आहे.

Comments