Skip to main content

रामस्वरूप मडावी यांचा 'काहूर' काव्यसंग्रह आदिवासी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार -प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर

 


किनवट : आदिवासी समाजाला गौरवशाली इतिहास आहे. अभ्यासून तो आपल्या  पिढी समोर आपण आणल पाहिजे. तसेच आपलं दुःख , वेदना व  समस्या साहित्यातून समाजासमोर आल्या पाहिजेत . म्हणूनच रामस्वरूप मडावी यांचा 'काहूर ' हा काव्यसंग्रह आदिवासी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे. असे प्रतिपादन तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर यांनी केले.

       


   येथील जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल मधील संत तुकाराम महाराज सभागृहात रामस्वरूप लक्ष्‍मण मडावी यांच्या ' काहूर' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक , नामांतर शहीद पुत्र तथा महावितरण नाशिकचे उप कार्यकारी अभियंता डॉ. अभियंता विवेक मवाडे, महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऍड. मुकुंदराज पाटील, मुख्याध्यापक मोहन जाधव, निवृत्त पोस्ट मास्तर दौलतराव कोवे व कवि रामस्वरूप मडावी, पुष्पा मडावी हे  मंचावर उपस्थित होते. 





       प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. प्रारंभी महानायकांच्या प्रतिमा पूजनानंतर वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी स्वागत गीत गाईले. 

        याप्रसंगी बोलतांना अभियंता विवेक मवाडे म्हणाले की, मराठी साहित्यात विविध साहित्य प्रवाह आपली कैफियत मांडत पुढे आले आहेत. आंबेडकरवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विद्रोही साहित्य, जनवादी, स्त्रीवादी श्रमिकांचे साहित्य असे विविध साहित्य प्रकार आपल्या समस्या,  विधानांना मांडण्यासाठी निर्माण झाले आहेत. यामुळेच विद्रोह आणि हक्काची भाषा ही साहित्यातून उमटते. रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहातून जीवनाच्या व समाज व्यवस्थेच्या विविध अगांना साकारलं आहे. दुःख , दैन्य , दारिद्र्य व अज्ञान यामुळे विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींच्या हातावर मीठ भाकरी  भेटणं मुश्कील असतं. ह्याच भाकरीचा संघर्ष  त्यांनी आपल्या  काव्यसंग्रहातून रेखाटला आहे. 

      यावेळी ऍड . मुकूंदराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. किशन धुर्वे यांनी गोंडी भाषेत विद्रोही कविता सादर केली. अध्यक्षीय समारोप करतांना गट शिक्षणाधिकारी महामुने म्हणाले की, कविता शिकवितांना रामस्वरूप मडावी यांनीच साहित्य निर्मिती केली. अशा धडपडणाऱ्या सर्व शिक्षकांचं साहित्य आम्ही तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत पोहचवू. आदिम इतिहास ताजा करणाऱ्या त्यांच्या लेखनीस सलाम.

        कार्यक्रमास गोरबंजारा साहित्यिक प्रा. डाॅ. वसंत राठोड, केंद्रप्रमुख  रामा उईके, विजय मडावी, शिवाजी खुडे, सुभाष बोड्डेवार, देविदास वंजारे, जगदीश कोमरवार, साई नेम्माणीवार, राजा तामगाडगे, राजेश पाटील, विकास कोवे, वर्षाराणी कोवे उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल येरेकार , समशेर खान , रुपेश मुनेशर , नवनाथ कोरनुळे , रमेश राठोड , प्रदीप कुडमेते, राहूल तामगाडगे , दीपाली मडावी , ओमकार मडावी आदिंनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.