Skip to main content

'बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने एक दिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र '



ता. प्र. किनवट:-

  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड व बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा 'या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 20 जानेवारी 2022रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्ष तथा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड,उदघाटक जोगेंद्रसिंह बिसेन प्र-कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

बीजभाषण प्रसिद्ध विचारवंत डॉ. केदार काळवणे, कळंब, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, भाषा वाडमय व संस्कृती अभ्यास संकुल तथा सदस्य मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन, प्रसिद्ध विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर, ,प्रसिद्ध नाट्यलेखक प्रकाश त्रिभुवन,डाॅ.गणेश चंदनशिवे,प्रमुख,लोककला विभाग, मुंबई विद्यापीठ मुंबई ,

प्रा. डॉ.विनोंद कुमरे, डॉ. उर्मिला चाकूरकर, डॉ. गणेश मोहिते, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. शंकर विभुते डॉ. संतोष हंकारे,हे 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा 'या विषयावर मार्गदर्शन करतील.समारोपीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणराव सिडाम ,उपाध्यक्ष किशिस, तर प्रमुख उपस्थिती 

गंगारेड्डी बैनमवार, उपाध्यक्ष किशिस, 

शंकरराव चाडावार, सचिव,किशिस, जसवंतसिंग सोखी, कोषाध्यक्ष किशिस या मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र चारसत्रामध्ये होईल.साहित्यप्रेमी रशिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे, संस्था समन्वयक प्रा राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, मराठी विभागप्रमुख तथा राष्ट्रीय चर्चासत्र समन्वय प्रा. डॉ. पंजाब शेरे, तात्रिक सहाय्यक प्रा. डॉ. योगेश सोमवंशी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...