ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शेख परवीन व जयश्री भरणे यांचा महिला कार्यकर्त्यासह काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश
किनवट श. प्रतिनिधी:
किनवट तालुक्यातील सामाजिक चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग प्रदेश सरचिटणीस शेख परवीन व राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या जयश्री भरणे, भाजपा तालुका सरचिटणीस वंदना गादेकर यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये मुंबई येथे नुकताच प्रवेश केला आहे, यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रमिल नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती तर किनवट तालुक्यातील नुकत्याच झालेल्या काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे तालुक्यातील काँग्रेस पक्ष ना. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Comments
Post a Comment