Skip to main content

देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी टिपु सुलतान ब्रिगेड ची मागणी



 धर्माबाद: राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन त्यांचा अपमान केला. यांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तर्फे उपविभागीय कार्यालय धर्माबाद येथे निवेदन देऊन करण्यात आली.


        निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुंबई येथील मालाड मध्ये बांधन्यात आलेल्या मैदानास टिपु सुलतान यांचे नाव देण्यात आले. खरेतर अगोदर पासुनच त्या मैदानाचे टिपु सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाणून-बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजां विरोध लढता लढता वीरमरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला. टिपू सुलतान यांच्याबद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला.


        राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहीम राष्ट्रपती रामनाथ गोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपुसुलतान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या सर्वांचा देवेंद्र फडणवीस भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांना विसर पडलेला आहे. जाणून-बुजून वाद निर्माण करून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे लोक करीत आहेत.


        देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विषयी क्रूरकर्मा हिंदूंवर अत्याचार करणारा अशा शब्दांचा वापर केलेला आहे. हा भारतीय राज्यघटनेचा माननीय राष्ट्रपती महोदयांच्या सुद्धा अवमान आहे. याचा अर्थ असा होतो की भाजप आणि त्याच्या सहयोगी संघटनांना देशाची राज्यघटना मान्य नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तर्फे करण्यात आली आहे.


          निवेदनावर टिपू सुलतान ब्रिगेड मराठवाडा सचिव नवीन तालुकाध्यक्ष मिर्झा खुर्रम बेग उपाध्यक्ष मिर्झा इब्राहिम बेग तालुका सचिव सय्यद शाहिद अली. मिर्झा जुनेद बेग सय्यद बाबर सय्यद मुजीब मो रेहान कुरेशी सय्यद इम्रान अली यांच्या स्वाक्षरा आहेत.


          तसेच या निवेदनाला मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच यांचा पाठिंबा आहे असे तालुकाध्यक्ष सय्यद बाबर उपाध्यक्ष शेख गौस व सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...