Skip to main content

स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बळीराम पाटील महाविद्यालयतर्फे राष्ट्रीय चर्चासत्र


 ता. प्र. किनवट:-

साहित्यिक हा संवेदनशील असतो.आपल्या प्रतिमा सामर्थ्याने उत्तम साहित्य निर्माण करतो. साहित्यातून सामाजिक वास्तव मांडणी करीत असतो. साहित्य हे मंनोरजनासाठी नसते तर ते वैचारिक, बोध  देणारे असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा ' या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी जोगेंद्रसिंह बिसेन - प्र. कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांनी  व्यक्त केले. प्रारंभी थोर स्वतंत्र सेनानी, पूज्य वंदनीय स्वामी रामानंद तीर्थ, थोर समाजसुधारक,गोरबंजाराकार, स्मृतीशेष बळीराम पाटील, स्मृतीशेष उत्तमराव राठोड यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.शब्द सुमनाने व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वागतगीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.पुढे बोलतांना डॉ. जोगेंद्रसिह बिसेन सर म्हणाले कि, समकालीन मराठी साहित्य हे नवेमूल्य समाजव्यवस्थेत पेरत आले आहे. समाजातील जगणं साहित्यिकांनी मांडले आहे. साहित्य अनेविध प्रवाहातून जात असते.लेखक हा समाजाला जागे करुन नव -नवे विचार मांडत असतो.' समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा ' या विषयावर अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय चर्चासत्र येते होत आहे.या चर्चासत्रास खुप महत्त्व आहे. एका उत्तम विषयावर चर्चा होत आहे. असे मत व्यक्त करुन राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, 


,नारायणराव सिडाम उपाध्यक्ष किशिस,प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, डॉ. जी. बी. लांब, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, 

विचारमंचावर उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून 

डॉ. पृथ्वीराज तौर,नांदेड यांनी समकालीन साहित्य समजून घेतांना नवे प्रश्न उपस्थित केले. बीजभाषण डॉ. केदार काळवणे, कळब यांनी 'समकालीन मराठी साहित्य:स्वरुप आणि प्रेरणा 'या संदर्भाने विविध प्रहवा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

अध्यक्षीय समारोप प्रफुल्ल राठोड, अध्यक्ष किशिसं,किनवट यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी माय बोली मराठी भाषेचा वापर करावे. वाचन संस्कृती वाढवावे.मराठी भाषा जीवंत राहवावी यासाठी सर्वांनीच मराठी भाषेचा अधिक प्रमाणात वापर करावे. असे मत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक तथा मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांनी केले. 

सूंत्रसंचालन प्रा. प्रल्हाद जाधव तर आभार डॉ. सुरेंद्र शिंदे यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्येने शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, आभासी पध्दतीने जोडले होते.कार्यम्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. योगेश सोमवंशी डॉ. आनंद भालेराव, प्रा. ममता जोनपेल्लीवार, प्रा. आम्रपाली हटकर, डॉ. शुभांगी दिवे,डाॅ.प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ. विजया खामनकर,प्रा.दयानंद वाघमारे, यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...