हदगांव,नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील वाणवाडी नगर येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, हदगांवच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त अंध व अपंग परिवाराला दाळ, तांदुळ, साखर, तेल, आटा बॅग व इतर सर्व जीवनाशक वस्तूचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये अपगं, अंध व्यक्ती नारायण मानसिग सळवणे, लक्ष्मीबाई सातेने व राम मानसिग सळवणे हे अतिशय गरीब असून त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे याची जाण ठेवून जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर व होमगार्ड गणेश गीरबिड़े यांच्या सहकार्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगाव तर्फे या परिवाराला किट देण्यात आल्या. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेघर, अंध,अपगं, विधवा आदी गरजूंना जीवनाशक वस्तू देण्यास पुढाकार या संघटनेने घेतला असून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही हा उपक्रम घेण्यात येत असून तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या घरकुल, निराधार, श्रावण बाळ, आदी विविध योजनेसाठी समस्या सोडवण्याचे काम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगांव तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे जीवनाशक वस्तू वाटप प्रसंगी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामीडवार, जिल्हा सरचिटणीस संदीप तुपकरी, तालुकाध्यक्ष कैलास तलवारे, सचिव सिद्धार्थ वाठोरे, सहसचिव तुषार कांबळे, अरविंद भोरे, संजय तोषनिवाल, संतोष नरवाडे, गजानन गंगासागर जि. प. सदस्य, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
(राजेश पाटील/किनवट) मोजे दरसांगवी(सि.) ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड 3. पी एम किसान योजना 4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी), श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...
Comments
Post a Comment