Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय उपोषण

    बापुराव वावळे/ किनवट प्रतिनिधी:- .      गटविकास अधिकारी साहेब यांना दिले निवेदन.महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना किनवट तालुका कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या संदर्भात प़्ंचायत समिती किनवट समोर एक दिवसीय उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदन तालुका संघटनेच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी साहेब किनवट यांना देण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005अंतर्गत स्थरावर रोजगार हमी योजनेचे काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेत निवड करण्यात आलेली आहे. ग्रामरोजगार सेवकांची पुर्णवेळ समर्पित नियुक्ती करण्यात यायला पाहिजे होती, परंतु महाराष्ट्र सरकारने 2 मे 2011रोजी शासन निर्णय काढून ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ बाह्स्त कर्मचारी म्हणून नियुक्त करून कामाच्या आधारावर 2.25%ते4.50% 6%पर्यंय तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी भाग पाडले आहे.महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना कोणत्याही प्रकारचे टिए,डिए, देण्यात येत नाहीत.मनरेगा अंतर्गत काम करणारे मजूर पुर्णवेळ,

जर पोलिस संपावर गेले तर ...... धनश्री सुगावकर यांचा वाचनिय लेख

                                           आपण शाळेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे खूप निबंध लिहिलेलं  आहेत. जसे की कामगार  संपावर गेले तर ,शिक्षक संपावर गेले तर, डॉक्टर संपावर गेले तर, अशा विविध प्रकारचे निबंध आपण प्रत्येक  विषयावर लिहिलेले आहेत. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला का, जे पोलिस संपावर गेले तर...... हा निबंध कधी लिहिला का तुम्ही ?का कधी या विषयाचा विचार केला का? कारण मी सांगते आपण असा विचार कधीच केला नाही, कारण आपल्या सभोवतालचे वातावरण याला जबाबदार आहे. म्हणजे बर्‍याच लोकांचे असे विचार आहेत की, पोलिसांची नोकरी खूप मस्त खूप मस्त असते. बाहेर पोलीस पोलिसांना सर्व घाबरतात .ते काहीच काम करत नाहीत. दादागिरी करतात ,कोणतीही वस्तू घ्यायची तर त्यांना ती फुकटच मिळते ,अशी वेगवेगळ्या प्रकारचे विचार काही लोक करतात. पोलिसांच्या कामाची सत्य परिस्थिती ही खूप कमी लोकांना माहीत आहे जर पोलिस संपावर गेले तर हा विचार केला तर.... अंगावर शहारे येतील. शिक्षक संपावर गेले तर शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे कसे होईल ,कामगार संपावर गेले तर कारखान्याचे तसेच दैनंदिन वस्तू लागतात त्याचे कसे होईल ,डॉक्टर संपावर

किनवटसह मध्ये विजेचा लपंडाव सुरु तर सिरमेटी गाव तिन दिवसा पासुन आधांरात

 किनवट प्रतिनीधी :  ( किनवट तालुक्यात विज अनेक वेळा येजा करत आहे तर सिरमेटी या गावी सतत तिन दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्याचे ग्रामस्थानी कळवीले आहे ) सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन तालुक्यात व ग्रामिण भागात वितरित होणाऱ्या विजेचा लपंडाव सुरु आहे तर कमी वीज दाबामुळे किनवट तालुका अंधारमय झाला आहे . वीज पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण होत आहे तसेच विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक उपकरणे निकामी होण्याची भीती वाढली आहे गर्मीमुळे लहान मुलासह अबालवृध्दानां याचा त्रास सहन करावा लागत आहे . विजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन, कुलरचा वापरही निट करता येत नाही त्यामुळे परीसरातील जनता त्रस्त आहे दर पाच - पाच मिनीटात वीज खंडीत होत असल्याने नागरिक वीज महावितरण बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे  थोडाही वारा सुटला कि लाईन गुल होते या बाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेल्याचे सांगितले जाते  विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कुणीही पुढाकार घेत

सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते. ग्राहक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या !

माझ्या महाराष्ट्रातील तमाम गुंतवणूकदारांनो, शेतकऱ्यांनो ,महिलांनो कामगारांनो तसेच ग्राहक म्हणून सराफा दुकाना मध्ये जाणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील बंधूनो तसेच माझ्या भगिनींनो आज आपला विषय जरा वेगळा आहे आज आपण नित्याच्या विषयाला फाटा देत सामान्यवर्गाचा असा महत्वाचा विषय चर्चेसाठी घेत आहोत. आज आपण बघणार आहोत कि सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल. भारतात सोनं खरेदीचं प्रमाण मोठं आहे. सोन खरेदी हा विषय महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तसेच आज संपूर्ण जग सोन्याकडे एक गुंतवणूक या नजरेने पाहत आहेत त्याचा फायदा कितपत आहे किंवा कसे हे येणारा काळच सांगत असतो हे मात्र खरे.गुंतवणूक म्हणूनही सोनं खरेदी करण्यालाच जास्त पसंती दिली जाते. पण अनेकदा सर्वसामान्य व्यक्तींना सोनं खरेदीत फसवणुकीचाही सामना करावा लागतो. सोनं खरं आहे, की खोटं हे ओळखता न आल्यामुळे ही फसवणूक होते. सोन्यात अंगठी बनवत असताना बनविल्यानंतर tounch टंच काढून घ्या, सेक्सी म्हणजे तुम्ही जागरूक ग्राहक आहात असे समजण्यास तुम्हाला हरकत नाही. बरेच सराफ लोक हे फायद्यासाठी kdm मध्ये दागिने तय्यार करुन देतात

भारत बंदला किनवट मध्ये समिश्र प्रतिसाद

  किनवट:- शेतकऱ्यांवर थोपणाऱ्या   केंद्राच्या तीन कृषी विधेयक विरोधात संयुक्त किसान मोर्चाने दि.२७ रोजी भारत बंदचे आवाहन केले होते त्याच पार्श्वभुमीवर किनवट येथे किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभा काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होलशनरी सो. पा. विविध पक्षाच्या वतीने पाठींबा दर्शवला आहे जिजामाता चौक येथे  सभेचे आयोजन करण्यात आले होते . या करीता भारतभर शेतकरी संघटना एकवटल्या आहेत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट शहरात बंदचे आवाहन करत फेरी काढण्यात आली यात काँग्रेसचे नगरसेवक अभय महाजन , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशनराव राठोड, काँग्रेस सेवा फाँऊडेशन नांदेड जिल्हा सचिव फारुक चव्हाण आदी या फेरीत सहभागी झाले होते .

गोदावरी अर्बनचे अध्यक्ष राजश्री पाटील मराठवाडारत्न पुरस्काराने सन्मानित

नांदेड: गोदावरी अर्बनने पाच राज्यासह  मराठवड्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट व भरीव  कामगिरी केल्याबद्दल लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री अंकुशराव टोपे, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री बाबनराव लोणीकर, लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू, अभिनेता मंगेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थित होते.           गोदावरी अर्बनची स्थापना २०१३ साली झाली आहे. एकीकडे राज्यातील सहकार क्षेत्राला मरगळ आली असतांना या क्षेत्राला अवघ्या ८ वर्षाच्या कालावधीत राज्यासह इतर पाच राज्यात झळाळी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हजारो महिला बचतगटांना अर्थसाक्षरता प्रशिक्षण, लघुउद्योजक नव तरुणांना आर्थिक मदत,

महाविकास आघाडीच्या कारकीर्दीत व देशात महिला सुरक्षित नाही- ऑल इंडिया पँथरचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड :  महाराष्ट्रातील वाढते महिला अत्याचार व हत्याकांड यांवर प्रतिबंध  घालण्यासाठी व अत्याचार केलेल्या आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी  जिल्हाधिकारी नांदेड याच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदना द्वारे करण्यात आली.          महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला अत्याचाराचा उच्चांक वाढला आहे. राज्यभर महिलांवर बलात्कार अल्पवयीन मुलींचे हत्याकांड सुरू आहेत. जिजाऊ, सावित्रीबाई, रमाई, अहिल्याबाई च्या महाराष्ट्रात त्यांच्या लेकी सुरक्षित नाहीत. सरकार मूग गिळून गप्प बसली आहे, गेंड्याच्या कातडीची झालेली आहे. महाराष्ट्रासहित देशभर महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र देशभर बलात्कार, दलित अत्याचार, हत्याकांडाने हाहाकार माजला आहे. दुर्दैव हे की, हा गंभीर प्रश्न सत्ताधाऱ्यांना प्रश्नच वाटत नाही.       बलात्कार हत्याकांड प्रकरणी राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री वाद हा निंदनीय दुर्दैवी आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनांनाविरोधात केंद्र राज्य सरकारने एकत्र लढून महिलांना सुरक्षित केले पाहिजे परंतु तसं न होता केवळ र

भारत बंदच्या अनुषंगाने मांडवी येथील मेनबाजार लाईन कडकडीत बंद

   मांडवी प्रतिनिधी / इंद्रप्राल कांबळे:-  संयुक्त किसान मोर्चा 19   राजकीय पक्षाच्यावतीने 28 रोजी भारत बंदच्या अनुषंगाने आज मांडवी येथे सकाळीच विविध पक्षाच्या प्रतिनिधी कडून मांडवी  बंद करण्यात आले .  आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी मांडवी बंद निमित्त  मांडवी व व्यापारी संघटना मांडवी शेतकरी संघटना मांडवीच्या विविध प्रतिनिधीने मांडवी बंदचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित कॉ. इंदल सिंग कोडबा राठोड शिवसेनेचे अविनाश चव्हाण व्यापारी संघटनेचे प्रदीप राठोड ,इंदर दुलसिंग पवार इंदल गोबरा राठोड, सुनील  तगडपिल्लेवार मनोल सलवार सुरेश पवार शेतकरी सघतना चे सुभाष काळे परस राम पवार, आणेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारकडे अनेक मागण्या करीत असताना शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची व जनविरोधी कायदे हाणून पाडण्यासाठी अनेक मागण्या मान्य करीत असताना रेल्वे खाजगिक करण करणे टाळावे व शेतीमालाला हमीभाव द्यावा द्यावे अशी मागणी करण्यात आली अशी निवेदन  मोर्चा करतानी मांडवी येथील पोलीस ठाण्याचे  स.पो. नी. पोलीस  मल्हार शिवरक

उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांची मुबंई पोलिस उपायुक्तपदी पद्दोन्नती ,सानेगुरुजी रुग्णालयात निरोप सभारंभ कार्यक्रम घेण्यात आला

  किनवट शहर प्रतिनिधी :- किनवट सारख्या आदीवासी अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्थे सोबत सामाजिक उपक्रम व कार्य करत नाईक यांनी सेवा दिली याच त्यांच्या कार्याची दखल घेत प्रशासनाने त्यांची पदोन्नती मुंबई पोलिस उपायुक्त पदी केली या निमित्त साने गुरुजी रुग्णालयात त्यांचा सत्कार व निरोप सभारंभ घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने हे होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले तर सुत्र संचालन प्रा . डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले या वेळी प्रमुख उपस्थिती सानेगुरुजी रुग्णालयाचे प्रमुख तथा समाज सेवक डॉ. अशोक बेलखोडे, उद्योजक अजय नेम्मानिवार, सौ. स्वाती मंदार नाईक , सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आनंद भंडारे, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, प्रा. सुरेंद्र शिंदे, उत्तम कानिंदे, राजेश पाटील, प्रा. शिवाजी गायकवाड, प्रा.दिलीप सिंह चंदेले, भय्युजी बेलखोडे,मेहर उपलेंचवार, दत्ता भिसे, राजपथ अकॅडमीचे आशिष शेळके, ॲम्बिशन अकॅडमीचे झाकीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रा. डॉ. पंजाब शेरे यां

मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांची त्वरीत सुटका करावी - राजेंद्र शेळके.

  किनवट : जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने (ए. टी. एस.) जबरदस्तीने ताब्यात घेतले असून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी साहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले आहे.           राजेंद्र शेळके यांनी निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील मेरठ येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले. कलीम सिध्दीकी यांच्यासह अन्य ४ सहकाऱ्यांना देखील ए. टी. एस. ने चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले असून परंतु अद्याप ही त्यांची सुटका केली नाही किंवा यांच्या अटकेबाबत केंद्र सरकार अथवा पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याबाबत केंद्र सरकार व ए.टी.एस. च्या या मुस्लिमविरोधी कार्यवाही चा आम्ही जाहीर निषेध करतो असे या निवेदना

किनवट येथील लोकअदालतीत १५६ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाले

  किनवट  : तालुका विधीसेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने शनिवारी (ता.२५)  किनवट न्यायालयात आयोजिलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले ३ दिवाणी ,१४ फौजदारी खटले व विविध बँकेचे १३९ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण १५६  प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. किनवट,मांडवी,उमरी,बोधडी,इस्लापुर येथील विविध बँकेच्या दाखलपूर्व १३९ प्रकरणामध्ये एकूण ६९ लाख ६९ हजार ९४६ रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली. अनेक प्रकरणे  निकाली निघाल्याने न्यायालयावरील कामाचा ताणही कमी झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.आजच्या लोकअदालतीत इरफाना  व शाहरूख शेख यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात आला या जोडीचा किनवट वकील संघाच्या वतीने साडीचोळी व पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला      कोरोना नियमांचे पालन करून किनवट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  यासाठी दोन पॅनल करण्यात येऊन एका पॅनलचे प्रमुख म्हणून विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एस.बी. अंभोरे तर पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड.राहुल सोनकांबळे व के. मूर्ती यांनी काम पाहिले. दुसर्‍या पॅनलवर प्रमुख म्हणून सह.दिवाणी न्

टेंभीच्या हिमायतनगर येथील सरपंचाचा दिलदारपणा

  हिमायतनगर/ टेंभी:- हिमायतनगर टेंभी येथील महीला सरपंच आपल्या पतीसह कळमनुरी येथे सरपंच प्रशिक्षण शिबिरासाठी जात असतांना एक शाळेतील चिमुकली ( विद्यार्थीनी) हातात थैली घेऊन ट्युशनला जाण्यास निघाली समरी अस त्या चिमुकलीच नाव दप्तर नसल्याने पुस्तक, वही, जेवणाचा डब्बा, आणि पाण्याची बाटली हे सगळ थैल्यात नेन अवघड चालल होत इतक्यात सरपंच सौ. वंदना पोपलवार यांची नजर त्या चिमुकलीवर पडली व तीची अडचण लक्षात घेऊन सौ. पोपलवार यांनी तीला एक दप्तर घेऊन दिले या मुळे समीराच्या चेहऱ्यावर हास्य उमटले अशाच मोठ्या मनाने प्रत्येकजण प्रत्येकाच्या मदतीला धावुन आले तर देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे ताजे उदाहरण आहे याच श्रेय पोपलवार शिक्षण संचालक गोवींद नांदेडे यांच्या प्रशिक्षण व प्रबोधनाला ते देतात.

गोकुंदा बनला खड्यांचे माहेरघर

 गोकुंदा/ किनवट:- गेल्या अनेक महीन्या पासुन वादात भोवऱ्यात असलेली निष्क्रीय ग्राम पंचायत अंतर्गत येणारे रस्ते पुर्णपणे खड्डेमय झाले आहे मागील काही दिवसांपासून या वाईट दुरावस्थीत रस्त्यासाठी नागरीक , सामाजीक कार्यकर्ते , तसेच विविध पक्षाच्या वतीने आदोंलने करण्यात आली निवेदने देण्यात आली पण हि गोकुंदा ग्राम पंचायत कुभंकर्णा सारखी झोपलेल्या अवस्थेत आहे त्यांना जाग कधी येईल कुणास ठाऊक   एकवीरा देवीच्या मंदिरा समोर तर  सर्व रस्ताच खड्डेमय झाला आहे लोक जीव मुठीत धरून वाहन चालवत आहे या रस्त्याने अनेक विद्यार्थी शाळे करीता , क्लासेस करीता रस्त्याने ये -जा करतात म्हणुन याकडे उपविभागिय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून हि समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत .

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी - खासदार हेमंत पाटील यांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट

  किनवट/माहूर: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित असून अद्यापही त्यांना अनुदान प्राप्त झाले नसून मतदारसंघात येणाऱ्या हिंगोली. नांदेड, आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करण्यात यावी  अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री  दादाजी भुसे यांची भेट घेऊन केली आहे.          गतवर्षीच्या खरीप हंगामात हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हदगाव, हिमायतनगर , किनवट , माहूर , हिंगोली, सेनगाव,कळमनुरी, औंढा , वसमत तर उमरखेड,महागाव तालुक्यातील शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते परंतु काही  मोजक्याच शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला होता तर अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले होते . यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून ३ लाख ३ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा  भरला असताना त्यापैकी केवळ १ लाख  ७५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटी ५२ लाख रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना परताव्याची ८६ कोटी २५ लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे . परंतू राज्य शासनाच्या  हिस्स्याचे अनुदान प्राप्त न झालयामुळे २

नगर सेवक तथा भाजपा शहराध्यक्ष नेम्मनिवार यांचा नगर परिषद प्रशासनाला ३० सप्टेंबर पर्यंत अल्टीमेटम ढिसाळ कारभारात सुधारणा झाली नाही

 किनवट ता.प्र दि २३ किनवट नगर परिषदेमुळे शहरातील नागरीकांना भेडसावना-या समस्यां मुळे शहरातील लोकप्रतिनिधी देखिल त्रस्त झाले आहेत यामुळे वार्ड क्रमांक २ चे भाजप नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी शहरातील नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने एक निवेदन नगर परिषद प्रशासनास दिले होते त्यानुसार नगर परिषद प्रशासनात कोणताही बदल न झाल्याने काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांच्या बैठक संपन्न झाली असुन यामध्ये नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना त्यांनी सादर केलेल्या १७ मुद्द्यानुसार काय कारवाई केली अशी विचारणा केल्या नंतर त्यांच्या प्रश्नास नगरपरिषद कर्मचारी हे निरुत्तर होते यामुळे प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त करत श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना येत्या सोमवार पर्यंतची मुदत दिली असुन त्यांनंतर सविस्तर अहवाल तयार करुन नगर परिषद कर्मचारी व अधिका-यांवर कायदेशिर कारवाई करण्याच्या दृष्टीन मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालणात रितसर तक्रार दाखल करुन या निष्क्रीय कर्मचा-यां विरुध्द कडक कारवाई करण्याकरिता वरिष्ठ नेत्यांच्

"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य उन सावली जीवनी येती नेहमी पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य"........ क्रांतिसुर्य प्रतिष्ठान तर्फे आयोजित काव्यपौर्णीमा कवी संमेलन पार पडले

✍राजेश पाटील शहर बातमीदार किनवट :- सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात  क्रांतिसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक पौर्णिमा काव्य पौर्णिमा या उपक्रमा अंतर्गत भाद्रपद पौर्णिमेच्या पुर्व संध्येला कवि संमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गजानन सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रवीकांत सर्पे, (सांगावाकार ) महेंद्र नरवाडे हे मंचावर उपस्थित होते तर सहभागी कवी म्हणून कवी रुपेश मुनेश्वर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मुनेश्वर,प्रा. गजानन सोनोने, राजेश पाटील आदी कवी मान्यवर उपस्थित होते कवि संमेलनाच्या प्रारंभी धम्म वंदना घेण्यात आली तद नंतर महेंद्र नरवाडे यांची भारतीय बौद्ध महासभा  उत्तर( पर्यटन व प्रचार) नांदेड शाखा मध्ये उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रा. रवीकांत सर्पे यांनी पौर्णिमे बद्दल विवेचन केले व कवि संमेलनास शुभेच्छा दिल्या सुरवातीस सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी  "हजारो वर्षाच्या रुक्ष वाळवंटी तुझ्या भावनेला  येऊ दे आता धम्म पथावर  अन मिळु दे बुद्ध प्रकाश त्याच्या अपार श्र

भोकर फाटा येथे कायम स्वरुपी पोलिस चौकी सुरु करण्याची मागणी

  ता. प्र. अर्धापुर:- अर्धापुर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या भोकर फाटा येथे कायम स्वरूपी पोलिस चौकीची मागणी  दाभड ग्राम पंचायत सदस्य युवा नेते आकाश सुर्यवंशी यांनी केली आहे. भोकर फाटा हा परीसर अत्यंत गजबजलेला ठिकाण आहे त्यामुळे २४ तास या मार्गावर वाहतुक होत असते तसेच सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूकीच्या कोंडी मुळे भोकर फाटा येथे दोन युवकाचा अपघातात मृत्यु झाला आहे अशे अपघात पुढे होऊनये या कामी सुरक्षेच्या दृष्टीने अर्धापुर फाटा येथे कायम स्वरुपी पोलीस चौकी व्हावी अशी समाज हिताच्या दृष्टीने आकाश सुर्यवंशी यांनी केली आहे

भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा(उत्तर) शाखेच्या नुतन कार्यकारिणी मध्ये किनवटचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांची उपाध्यक्ष (पर्यटन व प्रचार)पदी निवड

  किनवट प्रतिनिधी लक्ष्मीकांत दुथडे:-  भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड (उत्तर) च्या नुतन कार्यकारिणीची राष्ट्रीय महासचिव आद.जगदिश गवई, मुंबई, राष्ट्रीय सचिव बी.एच.गायकवाड, मुंबई, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, मुंबई, राज्य सरचिटणीस सुशिल वाघमारे, विभागीय सचिव दैवशाला गायकवाड, विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे, प्रभाकर नांदेडकर यांच्या तर्फे नुकतीच निवड करण्यात आली असुन या नुतन कार्यकारीणीमध्ये किनवटचे तालुका सरचिटणीस, कवी,लेखक सेवानिवृत्त पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे यांच्या धम्मकार्याची दखल घेऊन धम्मसंस्था नेतृत्वाने त्यांची जिल्हा शाखा नांदेड (उत्तर) कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष (पर्यटन व प्रचार) पदी दि.१९-९-२०२१ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा बैठकित निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे किनवट तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, जिल्हा संघटक माधवराव सर्पे, जितेंद्र भवरे, सुरेश पाटील, रमेश मुनेश्वर, राजेश पाटील,परमेश्वर सुर्वे,रुपेश मुनेश्वर  डॉ.बुध्दरत्न भवरे,प्रा.डा.पंजाब शेरे,विजय भगत, अशोक वाठोरे,भारत वाठोरे, प्रवीण वाठोरे,राहुल वाठोरे,विजय वाठोरे

गुरुजनांनी घडवलेला एकलव्य

पाठी वरच्या कण्यावरती हात ठेवून फक्त लढ म्हणा........! कॉलेजमध्ये शेवटच्या दिवशी ही कविता म्हणून कॉलेजला निरोप दिला होता. निरोप देताना असे वाटले होते कि आता इथे पुन्हा येणे नाही.....! आज कॉलेज सोडून सात वर्ष पूर्ण झालेत, पण ह्या सात वर्षा मध्ये माझ्या  गुरुजनाचा हात पाठीवरून क्षणा साठी पण सरकला असे आठवत नाही. गुरु व शिष्या चे नाते हे एका पदवी पर्यंत मर्यादित नाही तर ते अजन्म निभावायचं वचन आहे असे  मानणारे सरस्वती विद्या मंदिर कॉलेज चे प्राध्यापक यांचा हात विध्यार्थी वर्गाच्या पाठीवर नेहमीच असतो. दिनांक 17/09/2021 रोजी पदवी प्रदान कार्यक्रमात माझे मित्र प्रा. राम आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. त्याने इंग्लिश विषयामध्ये SET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एक ग्रामीण भागातील आदिवासी तरुण स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन संघर्षमय परिस्थितीत Dr बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कॅम्पस येथे इंग्लिश विषयात शिक्षण घेऊन आपले मिरीट आपल्या गुणवत्ते ने सिद्ध करतो हे कर्तृत्व अभिमानास्पदच......................आहे. ज्या ठिकाणी इंग्लिश विषयाची भीती आहे व ग्रामीण शिक्षनाची दुर्व्यस्था आहे त्या ठिकाणी हे

किनवट बसस्थानक आगार गणरायास भावभक्तीने निरोप देण्यात आला

    (शहर बातमीदार राजेश पाटील ):-  किनवट येथील बसस्थानक आगारातील गणरायाचे ११ दिवसा नंतर विसर्जन मिरवणूक काढून वाजत गाजत भक्तीभावाने निरोप देण्यात आला या वेळी एस.टी. आगाराचे कर्मचारी व्यवस्थापक , चालक , वाहक उपस्थित होते  (छाया: विशाल गिमेकर )

हुताम्यांनी दिलेल्या बलिदानाची समाजाने जाणीव ठेवावी-खासदार हेमंत पाटील

  हिमायतनगर /नांदेड : ज्या वीरांनी  स्वत:च्या कुटूंबाची काळजी न करता देशसेवेसाठी स्वत:ला वाहुन घेवुन प्राणाची आहुती दिली. त्यांच्या विचारांची, कार्याची बलिदानाची जाणीव समाजाने कायम ठेवावी असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी हिमायतनगर येथे आयोजित स्वातंत्र्ययोध्दा "वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळयाच्या अनावरण करण्यात आले .        मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.   मराठवाडयात ठिकठिकाणी  वीरांना अभिवादन केले जाते,  खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन केले.  यावेळी  त्यांच्या हस्ते स्वातंत्र्ययोध्दा "वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळयाचा अनावरण करण्यात आले.  येथील मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  संकूलात आयोजित कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री माधवराव  किन्हाळकर , माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, आ. माधवराव  जवळगावकर , गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री प

सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय येथे पदवी वितरण समारंभ संपन्न

  किनवट:-१७ सप्टे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक व्यंकटरावजी नेम्मानिवार हे होते प्रमुख अतिथी म्हणून उपविभागिय अधिकारी डी. एस. तपासकर , सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंगराव सातुरवार, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे महाविद्यालयाचे प्राध्यापक विवेक चनमनवार, प्रा. अण्णासाहेब सोळंके, प्रा.डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा. अजय किटे, प्रा. डॉ. किरण आयनेनिवार, प्रा. डॉ. द्वारका प्रसाद वायाळ, प्रा. तपन कुमार मिश्रा आदी महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते या वेळी महाविद्यालयीन पदवी परीक्षा  उतीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले  .

पोलिसांचे समर्पण

                          ....इंग्रजांच्या काळात जसे लोक पोलिसांना घाबरायचे तसे आता जनतेने घाबरावे अशी कुणीही अपेक्षा करणार नाही. अलीकडे पोलिसांवर हल्ले वाढत असल्याचे दिसून येत आहे ,ही खरंच चिंतेची गोष्ट आहे. पण जशी जशी शिक्षण व्यवस्था प्रगत होत गेली, तशी लोकांची विचार करण्याची प्रगती पण झाली. त्यामुळे आज बर्‍याच लोकांना असे वाटते, की पोलीस आपल्या बळाचा योग्य वापर करतात पण तुम्हाला पोलिसांचे जनतेप्रती समर्पण कधीच दिसत नाही .पोलीस जनतेसाठी किती झटतात हे आम्हाला कधीच दिसले नाही का?                 पोलीस पैसे खातात असे बरेच लोक म्हणतात तुम्ही किती पैसे देता पोलिसांना तुमचे काम केल्यावर ?किती वेळा पैसे घेतल्याशिवाय पोलीसांनी  तुमचे काम केले नाही. का पैसे घेतल्याशिवाय पोलीस तुमचं काम करत नाहीत. असे किती व्हिडिओ आहेत, की ज्यामध्ये तुम्ही जर बाईक चालवत असाल तर तुम्हाला हेल्मेट घातले नसेल तर पोलिसांनी तुम्हाला हेल्मेट आणून दिले, आणि तुमचे प्राण वाचवले.                                चोरी झाली पोलिसांना बोलवा, मंत्री आले पोलिसांना बोलवा, दरोडा पडला पोलिसांना बोलवा, गर्दी झाली पोलिसांना बोलवा, द

जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची नियुक्ती.

  किनवट : जनतेच्या हितासाठी, शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा, भ्रष्टाचार उघडकीस यावा हा एकमेव उद्देश ठेवून, पुर्ण महाराष्ट्र भर कार्यरत असणारी व भ्रष्टाचारी लोकांना सळो की पळो करून सोडणारी महाराष्ट्रात अग्रेसर असणारी एकमेव समिती म्हणजेच जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड करण्यात आली आहे.           आशिष शेळके हे पत्रकार आहेत, निर्भिड व भ्रष्टाचार विरोधी पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आहेत, यांनी पत्रकार सेवा संघ या संघटनेच्या आधारे विविध शासकीय कार्यालय व दावाखाने यांना भेटी दिल्या, तेथील उणिवा, तसेच कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, तसेच जनतेला होणारा त्रास, यांबद्दल आवाज उठवला. त्यांचे हे सर्व कार्य पाहून तसेच, यांचे पत्रकारी क्षेत्रातले लिखाण व यांच्या अन्याय विरोधी आणि भ्रष्ट कर्मचारी व भ्रष्टचार विरोधातील बातम्या पाहुन जनता माहिती अधिकार समिती च्या पदाधिकार्यांनी आशिष शेळके यांच्या राहत्या घरी भेट देऊन शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी आशिष शेळके यांना समि

अनुसुचित जाती , जमाती स्माशन भुमी प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना ऑल इंडिया पँथरचे निवेदन

  नांदेड नेटवर्क:  नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती चा स्मशान भुमिचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुक्यातील प्रकरण व पांगरी हदगाव तालुक्यातील प्रकरण असे अनुचित प्रकार घडत असताना ते घडू नये यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती चे स्मशानभूमीचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावात जागेचा प्रश्न असेल अशा ठिकाणी भूमी अधिग्रहण करून व स्मशानभूमीची जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी स्मशानभूमी बांधकाम व संरक्षक भिंत बांधून  जागा निश्चित करून ते प्रश्न सोडवण्यात यावे.यामागणीसाठी चे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे .जर यासमोर असा प्रश्न निर्माण झाला तर अंत्यविधी आपल्या कार्यालयासमोर करण्याचा पवित्रा घेतला जाईल असे आशयाचे पत्र देण्यात आले आहे.  यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे , युवा जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, नांदेड तालुकाध्यक्ष सतीश हिंगोले, लोहा तालुका प्रवक्ते प्रदीप वाघमारे, ता.उपाध्यक्ष नांदेड आनंद पाटील, साहेबराव सरोदे शहराध्यक्ष अर्धापुर, नागेश हिंगोले,