Skip to main content

नगर सेवक तथा भाजपा शहराध्यक्ष नेम्मनिवार यांचा नगर परिषद प्रशासनाला ३० सप्टेंबर पर्यंत अल्टीमेटम ढिसाळ कारभारात सुधारणा झाली नाही



 किनवट ता.प्र दि २३ किनवट नगर परिषदेमुळे शहरातील नागरीकांना भेडसावना-या समस्यां मुळे शहरातील लोकप्रतिनिधी देखिल त्रस्त झाले आहेत यामुळे वार्ड क्रमांक २ चे भाजप नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी शहरातील नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने एक निवेदन नगर परिषद प्रशासनास दिले होते त्यानुसार नगर परिषद प्रशासनात कोणताही बदल न झाल्याने काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांच्या बैठक संपन्न झाली असुन यामध्ये नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना त्यांनी सादर केलेल्या १७ मुद्द्यानुसार काय कारवाई केली अशी विचारणा केल्या नंतर त्यांच्या प्रश्नास नगरपरिषद कर्मचारी हे निरुत्तर होते यामुळे प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त करत श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना येत्या सोमवार पर्यंतची मुदत दिली असुन त्यांनंतर सविस्तर अहवाल तयार करुन नगर परिषद कर्मचारी व अधिका-यांवर कायदेशिर कारवाई करण्याच्या दृष्टीन मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालणात रितसर तक्रार दाखल करुन या निष्क्रीय कर्मचा-यां विरुध्द कडक कारवाई करण्याकरिता वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी श्रीनिवास नेम्मानिवार यांनी बैठकीत उपस्थित कर्मचारी व अधिका-यांना चेतावले आहे.

 तरी मागील निवेदनात श्रीनिवास नेम्मानिवार यांनी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत सतत गैरहजर राहतात, लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या कार्यालयीन कामात होणारी दिरंगाई, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न, मोकात जनावरामुळे होणारे अपघात, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरातील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी, भाजीपाला मार्केट व आठवडी बाजारातील अतिक्रमण व अस्वच्छता, साई नगर गार्ड्न व इस्लामपुरा सभामंडप यांचे व्यवस्थापन करण्यात होत असलेली दिरंगाई व त्यामुळे उत्पन्न होत असलेले वाद विवाद, एल.ई.डी व सौर पथदिवे लावुन सुध्दा विज बिलात कपात का झाली नाही ? हा ही प्रश्न उपस्थित होतो, घनकचरा व्यवस्थापनाची निविदा रखडल्याने शहरात माजलेली अस्वच्छता, नगर परिषदेत कार्यालयात दिव्यांगांची होत असलेली हेळसांड, नगर परिषदेच्या आरक्षित जमिनी भुसंपादन करुन व त्याचा मोबदला देऊन सुध्दा सातबारा च्या नोंदी नाहीत तर काहीचे दस्त नोंदनी देखिल केली नाही व ते करण्यास प्रशासन उदासिन या व अशा विविध समस्यांना करिता श्रीनिवास नेम्मानिवार हे नगर परिषद प्रशासना विरुध्द आक्रमक भुमिका घेत आहेत. त्यांनी अधिकारी व कर्मचा-यांना ३० सप्टेंबर पर्यंत चे अल्टीमेटम दिले आहे. ज्यामध्ये कर्मचा-यांनी वरिल मुद्द्यांच्या अनुषंगाने कारवाई करावी अन्यथा किनवट शहरातील नागरीकांचे असुविधेमुळे बेहाल करणे व नगर परिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या दृषीने बेजबाबदार पणा दाखवणे या साठी कठोर कारवाई करण्यासाठी कर्मचा-यां विरुद्द मा.जिल्हाधिकारी यांच्या दालणात तक्रार करणार असल्याचे नेम्मानिवार यांनी यावेळी सांगितले.

 आता नगर परिषद प्रशासन याकडे कोणत्या दृष्टीने पाहते व यावर काय कारवाई करते याकडे शहरातील सर्व सुज्ञ नागरीकांचे लक्ष लागले आहे कारण सन २०१७ निवडणुकीत मोठ्या आशेने या पदाधिका-यांना शहरातील नागरीकांनी निवडुन दिले आहे. यात एक दोन वगळता कोणतेही पदाधिकारी काही ठोस भुमिका मांडु शकले नसल्याने शहरातील नागरीकांचा यामुळे यांच्याकडुन मोठा हिरमोड झाला आहे. यात काही विवादित प्रकरणे व एकदोन घटणा या शहरातील नागरीकांच्या जिव्हारी लागल्या आहेत.




Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...