उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांची मुबंई पोलिस उपायुक्तपदी पद्दोन्नती ,सानेगुरुजी रुग्णालयात निरोप सभारंभ कार्यक्रम घेण्यात आला
किनवट शहर प्रतिनिधी :-
किनवट सारख्या आदीवासी अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्थे सोबत सामाजिक उपक्रम व कार्य करत नाईक यांनी सेवा दिली याच त्यांच्या कार्याची दखल घेत प्रशासनाने त्यांची पदोन्नती मुंबई पोलिस उपायुक्त पदी केली या निमित्त साने गुरुजी रुग्णालयात त्यांचा सत्कार व निरोप सभारंभ घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने हे होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले तर सुत्र संचालन प्रा . डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले या वेळी प्रमुख उपस्थिती सानेगुरुजी रुग्णालयाचे प्रमुख तथा समाज सेवक डॉ. अशोक बेलखोडे, उद्योजक अजय नेम्मानिवार, सौ. स्वाती मंदार नाईक , सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आनंद भंडारे, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, प्रा. सुरेंद्र शिंदे, उत्तम कानिंदे, राजेश पाटील, प्रा. शिवाजी गायकवाड, प्रा.दिलीप सिंह चंदेले, भय्युजी बेलखोडे,मेहर उपलेंचवार, दत्ता भिसे, राजपथ अकॅडमीचे आशिष शेळके, ॲम्बिशन अकॅडमीचे झाकीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी मानले तर या कार्यक्रमा करीता अश्विनी उईके व साने गुरुजी परीवार स्टाफ यांनी परीश्रम घेतले .
Comments
Post a Comment