Skip to main content

सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते. ग्राहक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या !


माझ्या महाराष्ट्रातील तमाम गुंतवणूकदारांनो, शेतकऱ्यांनो ,महिलांनो कामगारांनो तसेच ग्राहक म्हणून सराफा दुकाना मध्ये जाणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील बंधूनो तसेच माझ्या भगिनींनो आज आपला विषय जरा वेगळा आहे आज आपण नित्याच्या विषयाला फाटा देत सामान्यवर्गाचा असा महत्वाचा विषय चर्चेसाठी घेत आहोत. आज आपण बघणार आहोत कि सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल. भारतात सोनं खरेदीचं प्रमाण मोठं आहे. सोन खरेदी हा विषय महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तसेच आज संपूर्ण जग सोन्याकडे एक गुंतवणूक या नजरेने पाहत आहेत त्याचा फायदा कितपत आहे किंवा कसे हे येणारा काळच सांगत असतो हे मात्र खरे.गुंतवणूक म्हणूनही सोनं खरेदी करण्यालाच जास्त पसंती दिली जाते. पण अनेकदा सर्वसामान्य व्यक्तींना सोनं खरेदीत फसवणुकीचाही सामना करावा लागतो. सोनं खरं आहे, की खोटं हे ओळखता न आल्यामुळे ही फसवणूक होते. सोन्यात अंगठी बनवत असताना बनविल्यानंतर tounch टंच काढून घ्या, सेक्सी म्हणजे तुम्ही जागरूक ग्राहक आहात असे समजण्यास तुम्हाला हरकत नाही.

बरेच सराफ लोक हे फायद्यासाठी kdm मध्ये दागिने तय्यार करुन देतात ..त्यात सोन्याचे पैसे हे त्यात किती टक्के सोने आहे ( कॅरेट प्रमाणे 16/18/22/24 ) प्रमाणे घेत नाहीत. ते लमसम घेतात समजा उदाहरणार्थ. तुम्ही मंगळसूत्र बनवायला दिले आहे 3( 30 ग्राम) तोळे चे आणि त्यादिवसाचा सोन्याचा भाव हा 31500/- असेल अशाप्रकारे तुम्ही घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यां ची तुम्हाला संपूर्णपणे माहिती आसतेच हे खरे आहे. कारण तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता त्या वस्तू बद्दल संपूर्ण शहानिशा करूनच ती वस्तू खरेदी केलेली असते असे गृहीत तत्त्व समजण्यात येते किंबहुना तसा नियमच आहे.तर आपला प्रश्न सोनाराला हा असला पाहिजे की हा दागिना किती कॅरेट चा असेल ? आणि जसे 916 हॉलमार्क बनवायच्या असेल तर त्यात 91.60 % सोने असते इतर तांबे,चांदी, असते तर सोनाराने 31500 च्या 91.60% च सोन्याचा भाव लावला पाहिजे . जेव्हा दागिने तयार होतील तेव्हा त्यांच्या net weight सोन्याचे आणि gross weight नक्की पाहिजे असे सांगा

तसेच त्यांच्या कडून टंच report नक्की घ्या 50/- रुपयात येतो .जेणे करून त्यात किती टक्के सोने आहे आणि किती कॅरेट सोने वापरले आहे ते कळेल, माझ्या कडे एक याजमान पुष्कराज, निलम करीत आले त्यांनी आपल्या जवळील मंगळसूत्र दिले ते त्यांना सोनाराने kadm मध्ये बनवुन दिले 6 वर्षांपासून ते वापरत होते,बनविले त्यावेळेस 91% सोने वापरले आहे असे सांगितले आणि पैसे पण 91% घेतले सोन्याच्या भावा प्रमाणे परंतु मी tunch काढला त्यावेळेस ते फक्त 70 ते 75 टक्के सोने होते ..ही खुप मोठी फसवणूक आहे म्हणजे आजच्या तारखेला 21 % सोन्याचे 3 तोळे चे ( 31500 × 21% × 3 तोळे – 19845 /- ) अश्यांप्रकारे हे प्रकार चालु आहेत. सोनी खरेदी बद्दल शासनाने अनेक नियम घालून दिलेले आहेत परंतु ते नियम सर्वसामान्यापर्यंत माहित होत नाही यासाठी खारीचा वाटा होईना लेखकाने उचललेला आहे.

सध्या हॉलमार्क पद्धत शहरात जरी असली तर बरेच सोनार हे जास्त मजुरी सांगून kdm मध्ये बनवण्याचा plan करीत लूट करीत आहेत. गावातील सध्या अशिक्षित लोक तर सर्वात जास्त बळी पडत आहेत. मुंबई पुणे सारख्या शहरात सुसूक्षित वेल एज्युकेटेड लोक पण हा विचार करत नाही, हे दुर्दैव ।

लोकल ज्वेलर कडून खरेदी केली असता असे प्रकार नक्कीच घडतात, त्यामूळे सोने दागिने किंवा चोख सोने हे हॉलमार्क ज्वेलरी विक्रेत्या कडूनच खरेदी करावी. भले त्यांचा मजुरी चा दर लोकल ज्वेलर च्या तुलनेत जास्त जरी असला तरी रिप्लेस च्या वेळी चालूच्या दरा प्रमाणे दागिना माघारी घेतला जातो, त्यात कोणतीही वजावट घातली जात नाही.

 *काय आहे हॉलमार्क?:* सोन्यावरील हॉलमार्क हे शुद्धतेचं एक प्रमाण आहे. सध्या हॉलमार्कची निवड ही ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोला हॉलमार्कचे प्रशासकीय अधिकार आहेत. हॉलमार्कच्या दागिन्यांवर बीआयएसची खूण पाहायला मिळेत.

परवानाधारक प्रयोगशाळेत सोन्याची शुद्धता तपासली आहे का ते बीएसआयमुळे समजतं. बीएसआयने १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट या तीन ग्रेडसाठी हॉलमार्क मानक निश्चित केले आहेत. तर आपण अशाप्रकारे जाणून घेतले कि सोई खरेदीमध्ये आपली कशी फसवणूक होऊ शकते त्यामुळे स्वतः जागरुक व्हा आणि इतरांना देखील हि माहिती पाठवून जागरूक बनवा! सोने खरेदीचा ग्राहक हा नेहमी जागा असला पाहिजे किंबहुना त्याची फसवणूक झाली नाही पाहिजे ज्या वेळेस असे होईल त्यावेळेस लेखकांनी लिहिलेल्या लेखाचा उद्देश साध्य होणार हे मात्र खरे..


:- विलास संभाजी सुर्यवंशी 

किनवट. ता. किनवट जि. नांदेड

मो.न.992291 0080



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...