Skip to main content

२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय उपोषण

 

 
बापुराव वावळे/किनवट प्रतिनिधी:-

.      गटविकास अधिकारी साहेब यांना दिले निवेदन.महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना किनवट तालुका कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या संदर्भात प़्ंचायत समिती किनवट समोर एक दिवसीय उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदन तालुका संघटनेच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी साहेब किनवट यांना देण्यात आले आहे.



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005अंतर्गत स्थरावर रोजगार हमी योजनेचे काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेत निवड करण्यात आलेली आहे.

ग्रामरोजगार सेवकांची पुर्णवेळ समर्पित नियुक्ती करण्यात यायला पाहिजे होती, परंतु महाराष्ट्र सरकारने 2 मे 2011रोजी शासन निर्णय काढून ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ बाह्स्त कर्मचारी म्हणून नियुक्त करून कामाच्या आधारावर 2.25%ते4.50% 6%पर्यंय तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी भाग पाडले आहे.महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना कोणत्याही प्रकारचे टिए,डिए, देण्यात येत नाहीत.मनरेगा अंतर्गत काम करणारे मजूर पुर्णवेळ, पण त्या मजुरांवर दिवसभर लक्ष देवून काम करून घेणारे ग्रामरोजगार सेवक मात्र अर्धवेळ, बाह्स्त कर्मचारी.

रोजगार हमी योजनेचा जनक असलेल्या राज्यात काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक यांच्या वर अन्याय सुरू आहे.

सहा सहा महिने तुटपुंजे मानधनही पदरी पडत नाही.प्रवास भत्याचा पत्ता नाही, लागणारी सामग्री कुठे अडकली याचा बेत नाही.स्वतंत्र कक्ष उभे करण्याचे नियोजन हवेतच उडाले अशा एक ना अनेक अडचणी असुन त्यास अनखिन भर म्हणून स्थानिक पातळीवर चे राजकारण,मग काम करावे तरी कसे, या व इतर मागण्या संदर्भात महात्मा गांधी जयंती दिनी महाराष्ट्रभर आंदोलन होत असुन त्या अनुषंगाने किनवट येते ही आंदोलन होणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित,किनवट तालुका ग्राम रोजगार सेवक संघटना अध्यक्ष मा.गेमसिंग जाधव,मधुकर गवले, बापूराव वावळे, राहुल पाटिल, पुंडलिक घुगे, नामदेव सावरकर,ज्ञानेश्वर मुंडे,अरूण राठोड,मनोज केंद्रे, बालाजी राठोड,किरण राठोड, संजय राठोड,राम जाधव, साहेबराव दार्लावार, अशोक जाधव तालुका किनवट ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...