Skip to main content

हुताम्यांनी दिलेल्या बलिदानाची समाजाने जाणीव ठेवावी-खासदार हेमंत पाटील

 


हिमायतनगर /नांदेड : ज्या वीरांनी  स्वत:च्या कुटूंबाची काळजी न करता देशसेवेसाठी स्वत:ला वाहुन घेवुन प्राणाची आहुती दिली. त्यांच्या विचारांची, कार्याची बलिदानाची जाणीव समाजाने कायम ठेवावी असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी हिमायतनगर येथे आयोजित स्वातंत्र्ययोध्दा "वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळयाच्या अनावरण करण्यात आले .

       मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.   मराठवाडयात ठिकठिकाणी  वीरांना अभिवादन केले जाते,  खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन केले.  यावेळी  त्यांच्या हस्ते स्वातंत्र्ययोध्दा "वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळयाचा अनावरण करण्यात आले.  येथील मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  संकूलात आयोजित कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री माधवराव  किन्हाळकर , माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, आ. माधवराव  जवळगावकर , गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील , जेष्ठ संचालक राम भारती गणपत भारती, अरुण कुलकर्णी, प्राध्यापिका अरुणाताई कुलकर्णी, प्राचार्या उज्ज्वला सदावर्ते, गजानन रणखांब, उपप्राचार्य एल. टी. डाके, तहसीलदार गायकवाड साहेब, पोलीस निरीक्षक कांबळे ,  हिमायतनगर तालुका प्रमुख राम ठाकरे, काँग्रेस तालुका प्रमुख विकास पाटील देवसरकर, भाजप हिमायतनगर तालुका प्रमुख आशिष सकवान, भाजप युवा जिल्हा प्रमुख राम सूर्यवंशी, जि.प.सदस्य सुभाष आत्मा राठोड , माजी जिप सदस्य लक्ष्मणराव शक्करगे,माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सकसे , महावीर शेठ , शिरशिरमाळ, हेमलताताई  पाटिल, करूणाताई पाटिल,  आदी मान्यवर उपस्थित होते. 


            यावेळी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, स्वातंत्र्य लढा हा पुढच्या पिढी साठी प्रेरणादायी असतो त्यामुळे आपण स्वातंत्र्य लढ्याचे आणि क्रांतिकारक , वीर हुतात्म्यांचे स्मरण करून आपल्या येणाऱ्या पिढीला त्याची जाणीव करून द्यायची असते त्यांना आपला इतिहास सांगितला पाहिजे तो पुढे रुजवत नेला पाहिजे हीच आपली संस्कृती आहे . आज याठिकाणी वीर योद्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे माझ्या हस्ते अनावरण होत आहे हे माझ्यासाठी खूप  सुदैवाची  बाब असून हे करण्याचे भाग्य मला लाभले  याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे . हुतात्म्यांचे स्मरण म्हणून इस्लापूर येथे भव्यदिव्य स्मारक उभारण्याचे  आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी दिले.  कार्यक्रमाला परिसरातील जेष्ठ नागरिक यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.