Skip to main content

"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य उन सावली जीवनी येती नेहमी पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य"........ क्रांतिसुर्य प्रतिष्ठान तर्फे आयोजित काव्यपौर्णीमा कवी संमेलन पार पडले




✍राजेश पाटील

शहर बातमीदार किनवट :- सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात क्रांतिसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक पौर्णिमा काव्य पौर्णिमा या उपक्रमा अंतर्गत भाद्रपद पौर्णिमेच्या पुर्व संध्येला कवि संमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गजानन सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रवीकांत सर्पे, (सांगावाकार ) महेंद्र नरवाडे हे मंचावर उपस्थित होते तर सहभागी कवी म्हणून कवी रुपेश मुनेश्वर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मुनेश्वर,प्रा. गजानन सोनोने, राजेश पाटील आदी कवी मान्यवर उपस्थित होते कवि संमेलनाच्या प्रारंभी धम्म वंदना घेण्यात आली तद नंतर महेंद्र नरवाडे यांची भारतीय बौद्ध महासभा  उत्तर( पर्यटन व प्रचार) नांदेड शाखा मध्ये उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रा. रवीकांत सर्पे यांनी पौर्णिमे बद्दल विवेचन केले व कवि संमेलनास शुभेच्छा दिल्या

सुरवातीस सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी 

"हजारो वर्षाच्या रुक्ष वाळवंटी तुझ्या भावनेला 

येऊ दे आता धम्म पथावर 

अन मिळु दे बुद्ध प्रकाश त्याच्या अपार श्रद्धा बलाने कर नष्ट गडध अंधार"

हि सामाजिक रचना सादर केली .


या नंतर रुपेश मुनेश्वर यांनी

" हिंसा नको कधीही कायेने वाचेने

ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे

निंदा नको कुणाशी 

व्यभिचार लेक हि गेय रचना सादर केली


या नंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गजानन सोनोने यांनी 

" गातो मी गाणे निळ्या नभाचे 

आहे तराणे नव्या दमाचे 

स्वातंत्र्य समता हि बंधुता

जाणुन घ्याहो मोल तयाचे हि संविधान महत्व विशद करणारी रचना सादर केली.

या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी


"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य

पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य

उन सावली जीवनी येती नेहमी

पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य......"

हि मनाला भावनारी व पोर्णीमेचे महत्व सांगणारी रचना प्रस्तुत केली.


या नंतर युवा कवी राजेश पाटील यांनी

"पेटली पेटली हि भीमाची लेखणी

पेटली पेटली हि वामनाची लेखणी

अन्यायावर वार तु कर

वंचीताची तु बन ललकार 

वंचीताची तु बन तलवार हि क्रांतिकारी रचना सादर केली


 कवी संमेलनाचे सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केले तसेच

या काव्य पोर्णीमेस युवक,बाल बालीका व विशाखा महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.








Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...