Skip to main content

जर पोलिस संपावर गेले तर ...... धनश्री सुगावकर यांचा वाचनिय लेख

 

               


                         आपण शाळेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे खूप निबंध लिहिलेलं  आहेत. जसे की कामगार  संपावर गेले तर ,शिक्षक संपावर गेले तर, डॉक्टर संपावर गेले तर, अशा विविध प्रकारचे निबंध आपण प्रत्येक  विषयावर लिहिलेले आहेत. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला का, जे पोलिस संपावर गेले तर...... हा निबंध कधी लिहिला का तुम्ही ?का कधी या विषयाचा विचार केला का? कारण मी सांगते आपण असा विचार कधीच केला नाही, कारण आपल्या सभोवतालचे वातावरण याला जबाबदार आहे. म्हणजे बर्‍याच लोकांचे असे विचार आहेत की, पोलिसांची नोकरी खूप मस्त खूप मस्त असते. बाहेर पोलीस पोलिसांना सर्व घाबरतात .ते काहीच काम करत नाहीत. दादागिरी करतात ,कोणतीही वस्तू घ्यायची तर त्यांना ती फुकटच मिळते ,अशी वेगवेगळ्या प्रकारचे विचार काही लोक करतात. पोलिसांच्या कामाची सत्य परिस्थिती ही खूप कमी लोकांना माहीत आहे जर पोलिस संपावर गेले तर हा विचार केला तर.... अंगावर शहारे येतील. शिक्षक संपावर गेले तर शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे कसे होईल ,कामगार संपावर गेले तर कारखान्याचे तसेच दैनंदिन वस्तू लागतात त्याचे कसे होईल ,डॉक्टर संपावर गेले तर पेशंट कसे होईल, असे आपण विचार करतो पण पोलिस संपावर गेले तर बापरे विचार जरी केला तर अच्छा देश समोर दिसतो हो ना?

             एक दिवस पोलीस स्टेशन बंद राहिले ,तर किती खुन होतील, दरोडे पडतील, चोऱ्या होतील, भांडणे होतील ,मुलींची छेडछाड होईल,  याचा विचार करा. जगामध्ये सर्व संपावर जाऊ शकतील, पण पोलीस संपावर नाही जाऊ शकणार कारण पोलिसांना माहिती आहे की आपण जर संपावर गेले , तर देशाचे काही खरे राहणार नाही. एक दिवसात  सर्व संपून जाईल. जनजीवन विस्कळीत होईल इतका पोलीस विचार करतो तरी तो आपल्या नजरेत काटो असतो त्याचे जनतेप्रती काम दिसत नाही का?

                        पोलिसांच्या पण खूप समस्या आहेत. तरी आतापर्यंत त्यांना कोणी विचारले का तुमच्या काही समस्या आहेत का ?त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचू. पोलिसांचे जर काम पाहिले तर ते 24 तास आपले कर्तव्य बजावतात  .त्यांना कधी ठरावीक वेळ नाही की त्यांनी  इतका वेळ काम करावे आणि जास्तीचे काम केल्यावर त्यांना त्या कामाचे पैसे सुद्धा मिळत नाहीत मग पोलीस आणि संपावर का गेले नाही पाहीजे. आपल्याला जर एखादी इमर्जन्सी आली तर आपण सर्व कामे सोडून जातो तशी जर  पोलिसांना इमर्जन्सी आली तर पोलिस जाऊ शकत नाहीत कारण त्यांना काम असते आपल्या कर्तव्य पेक्षा कोणते काम त्यांना महत्वाचे वाटत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये? वाढदिवस ,पार्ट्या ,कार्यक्रम ,लग्न सोहळा असे विविध कार्यक्रम आपण करत असतो पण बाराही महिने पोलीस कोणताही सण साजरे करू शकत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये ?स्वतःच्या मुलाचा  वाढदिवशी तो हजर नाही राहु शकत किती वाईट परिस्थिती आहे.

                     एक तर पोलिसवाला सांगत होता की त्याच्या मुलीची लग्न  पाठवनी होती पण तो घरी जाऊ शकला नाही कारण महत्त्वाचा बंदोबस्त लागला होता हे ऐकून  मन सुन्न झालं.  हे ऐकून खूपच त्रास झाला की, अशी कशी पोलिसांची नोकरी की तो मुलीला वाट सुद्धा लावू शकत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये? 

      सकाळी आठ नऊ वाजता गेलेला पोलीस हा रात्री दहा-अकरा वाजता घरी येतो किती वेळ ही नोकरी.सारखे  दिवस-रात्र काम करायचे . पोलिस संपावर गेले तर देशाचे खूप मोठे नुकसान होईल, हा विचार जरी केला तर समजेल .पोलिस हा जनतेचा कणा आहे ,त्यामुळे त्याचा आदर करायला शिका, त्यांना सहाय्य करा .पोलीस हा पण माणूसच आहे त्यांना बोलून तर पहा खूप गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला समजेल की आपण जो विचार करतो तो त्याच्या खूप विरुद्ध पोलीस नोकरी करतो.



                         धनश्री सुगावकर वागरे

                            सातवा माळा बिल्डिंग नंबर 1 आर. ए .के .मार्ग पोलिस अधिकारी , वसाहत शिवडी, (प) मुंबई.

      9096504021



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...