Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

सराफा दुकानदार श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार यांचे हैद्राबाद येथे उपचारा दरम्यान निधन , १५ दिवसांपूर्वी झाला होता त्यांच्यावर भ्याड हल्ला

  किनवट:- :अत्यंत दुःखद बातमी किनवट येथील सराफा व्यापारी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार यांच्यावर 15 दिवसांपूर्वी भ्याड हल्ला केला होता. त्यांचे हैदराबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले.  आज रोजी(28/1 2/2022) त्यांचे अवयव दान होत आहे. 2 डोछे, 2 किडनी, यकृत, हृदय, फुफुसे दान झाल्यावर आज रात्री किनवटला पोहचतील.  उद्या 29/12/2022 दुपारी 12 वाजता त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येडल.  त्यांचे राहते घर: एसवीएम कालनी, रोड येथून अंत्ययात्रा सुरु होईल  *निषेध* -  किनवट व गोकुंदा बंद बंद बंद   किनवट येथील व्यापारी श्रीकांत कंचर्लावार व बंडू कंचर्लावार या दोघा बंधूंवर भ्याडपणाने हल्ला झाला त्यात दोघांनाही दुखापत होऊन ,  पैकी श्रीकांत कंचर्लावार यांचे दुःखद निधन झाले सदरिल हल्ल्या प्रकरणी किनवट व गोकुंदा येथील   सर्व प्रतिष्ठाने व उपारगृहे उद्या दिनांक 29/12/22 रोजी एक  दिवस कडकडीत बंद ठेवावीत असे अवाहन व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.

प्रा. नितेश कराळे यांच्या मारेगाव येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मारेगाव कॉलेजच्या वतीने केले होते आयोजन

  मारेगाव, यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेतून तालुका मारेगाव येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मराठी विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ डिसेंबर २०२२रोजी खद खद मास्तर प्रा. नितेश कराळे यांचे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    यावेळी मंचावर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. नितेश कराळे सर होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून रंगनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, डॉ. महेंद्र लोढा होते. प्रमुख अतिथी म्हणून केशवजी सवळकर (विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महा. राज्य ) अनिलभाऊ राठोड (जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महा. राज्य ) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन कापसे, सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले, अविनाश लांबट, ठाणेदार राजेश पुरी यांची मंचावर उपस्थिती होती.    या कार्यक्रमांची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्प

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक आज दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले

  -खासदार हेमंत पाटील; यांनी विद्यार्थ्यांना दिल्ली दौऱ्यासाठी शुभेच्छा देत रवाना केले नांदेड, दि. २५ (वार्ताहार) ः हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्ली संसदभवन अभ्यास दौरा आणि इतर प्रेक्षणिक स्थळे बघण्यासाठी आज सर्व ५० स्पर्धक व जनसंपर्क अधिकारी दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.  खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  हिंगोलीसह औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव, कळमनुरी, माहूर, किनवट, उमरखेड, हिमायतनगर, महागाव आणि हादगाव या तालुक्यातील साडेतीनशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील पन्नास विजेते स्पर्धक रविवारी (दि.२५) खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी न

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका कार्यकारिणीच्या ता.अध्यक्षपदी नसीर तगाले तर सचिव पदी राजेश पाटील यांची निवड.

किनवट/ प्रतिनिधी:  आज दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी "आज की न्यूज कार्यालय" गाळा क्रमांक 8 मध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.टी. आंबेगावे व जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.     यात तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष- नसीर तगाले, तालुका कार्याध्यक्ष- सय्यद नदीम, तालुका सचिव- राजेश पाटील, तालुका सहसचिव- शेख आतिफ, तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम, बाबुराव वावळे. तालुका कोषाध्यक्ष- प्रज्वल कारले, तालुका सह कोषाध्यक्ष- इंद्रपाल कांबळे, तालुका संघटक- विनोद पवार, विशाल भालेराव,रावसाहेब कदम.जितेंद्र चव्हाण,तालुका सदस्य- शुभम शिंदे ,सय्यद गौस, अमर सुरोशे, अकबर खान, रेहान खान.तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून  पत्रकार एड. जी.एस. रायबोळे व एड. विलास सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.     तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ची युवा तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. तालुका अध्यक्ष- प्रणय क

दरसांगवी (सि) ग्रा.प.वरती जनता पॅनलचा दणदणीत विजय

   किनवट प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील दरसांगवी (सि) ग्रामपंचायत वरती जनता पॅनल चा झेंडा फडकला ग्रामविकास पॅनलचा व तिसरी आघाडीचा 103 मताने धुवाधार पराभव करत जनता पॅनल ने 403 मते घेत विजयश्री खेचून आणली .दरसांगवी (सि) ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शंशाक सुभाष कनाके हे आपल्या सर्व पॅनलच्या नवनिर्वाचित सदस्यासह बहुमताने निवडुन आले  दरसांगवी (सि) ग्रामपंचायतची मत मोजणी पार पडली त्यात दरसांगवी (सि) पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे यात जनता पॅनलच्या  सरपंचासह 6 सदस्यांनी विजय मिळवला आहे या निवडणुकीत सरपंच पदी शशांक सुभाष कनाके निवडुन आले तर सदस्य पदी पुंजाराम कनाके  निर्मला नंदु पवार , सुहास राठोड, शिवकन्या पेंदोर, सुरेखा पवार, शत्रुघ्न मैश्राम, यांनी ग्रामविकास पॅनलचा व तिसरी आघाडीचा धुवाधार पराभव करत जनता पॅनल च्या सरपंच पदासहित 6 सदस्यांनी बाजी मारली किनवट तालुका निवडणूक अधिकाऱ्याकडून विजयी घोषीत करिताच गावकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला  दरसांगवी (सि) ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती पुरुषासाठी राखीव होते या विजया बद्दल सखाराम पवार,दिलीप राठोड,  रमेश पवार, शिवा राठोड, म

आ. भिमराव केराम यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यासाठी ३ कोटी तर प्रलंबीत कामाकरीता ७ कोटी एकुण दहा कोटी निधी उपलब्ध करून दिले

  किनवट ता. प्र दि २४ राज्यातील सत्तांतरा नंतर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघामध्ये आ. भिमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास एकूण 3 कोटी व शहरातील इतर प्रलंबित विकास कामा करिता 7 कोटी रुपये निधी असे एकूण 10 कोटीचा निधी किनवट नगर परिषदेला उपलब्ध करून दिले आहे. आ. केराम हे आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे हेच धेय्य घेऊन सतत कार्यरत असलेले नेते म्हणुन त्यांची मागील ४० वर्षापासुन किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात ख्याती आहे. २०१९ विधानसभा निवडणूकीत येथिल जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली परंतु सुरवातच हि कोरोना नावाच्या विषाणुने व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले त्यामुळे मागील तीन वर्षात राज्यातील महाविकास आघाडी मुळे किनवट माहुर विधानसभा क्षेत्राचे विकास हे मनाजोगे करता आले नाही.  परंतु राज्यात सत्तांतर झाल्या नंतर आ. केराम यांचे पिंड हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर व बिरसा या

किनवट तालुका पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष म्हणुन दत्ता जायभाये, सचिवपदी दिलीप पाटील तर कार्याध्यक्षपदी मलीक चव्हाण यांची निवड

  किनवट (प्रतिनिधी) :- तालुका: पत्रकार परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक 22/12/2022 गरुवार रोजी मा.नगराध्यक्ष ईसाखान सरदार खान यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव नेममनिवार निवडणूक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत इसाखान सरदार खान यांच्या फार्म हाऊसवर पुढील एक वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात संपलेला असून मावळते अध्यक्ष अनिल भंडारे व सचिव मलिक चव्हाण यांनी एकमताने बिनविरोध नवीन कार्यकारणीची घोषणा केली. अध्यक्षपदी दत्ता जायभाय सचिव पदी दिलीप पाटील तर कार्याध्यक्षपदी मलिक चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेचे सल्लागार म. आ. चौधरी, शिवराज मामा, दादाराव कयापाक, एड. मिलिंद आली. जुन्या कार्यकारणीच्या कार्यकाळ संपल्यानंतर  नव्या कार्य कारणीची घोषणा करण्यात आली .  या वेळी पत्रकार परिषदेचे सल्लागार म. आ. चौधरी,राघू मामा, दादाराव कयापाक, एड. मिलींद सर्पे, शकील बडगुजर, चतुरंग कांबळे, सुनील श्रीमनवार, जयवंत चव्हाण, आशिष देशपांडे, दुर्गादास राठोड, अनिल भंडारे, संदीप निखाते आदी उपस्थित होते.  नवीनकार्यकारणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष दत्

"किनवटच्या सेट्राइब इन्स्टीट्युटच्या आदीवासी विद्यार्थ्यांनी बनवले महा असेंबली ऐप, मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाला शुभारंभ‍"

  महाअसेंबली अँपचे विधान भवनात उदघाटन करतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,  निलम गोऱ्हे, सारंग वाकोडीकर आदी. ता. प्र. किनवट डिसेंबरमध्ये झालेल्या नागपुर हिवाळी अधिवेशन 2022 साठी करण्यात आलेल्या विविध उपाय योजना, अधिवेशन, दैनंदीनी, महत्वाच्या व्यक्तीचे दुरध्वनी क्रमांक, विविध बैठका संदर्भातील माहीती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी महाअसेंबली हे ऍप कार्यान्वीत करण्यात आले आहे, विशेष आनंदाची बाब म्हणजे हे अँप नांदेड जिल्हयातील किनवट येथील सेट्राईब या आय.टी. कंपनीच्या ग्रामीण भागातील आदीवासी विदयार्थ्यांनी तयार केले आहे सर्व सन्मानीय राज्यसभा सदस्य याचा लाभ घ्यावा अशी माहिती सेट्राईबचे संचालक सारंग वाकोडीकर यांनी दिली आहे.

शासकीय आश्रम शाळा सारखणीचे विभागीय शालेय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश तर जगदीश शेडमाके यांची बॉक्सींग मध्ये राज्यस्तारावर निवड

   (किनवट ता. प्र.) लातूर येथे दिं. २० रोजी झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत   शासकीय आश्रम शाळा सारखणी ता किनवट येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असून १७ वर्ष वयोगटातून बॉक्सिंग  स्पर्धेत राज्यस्तरावर जगदीश शेडमाके यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी नेहा भोसले  IAS व तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांनी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.         दर वर्षी क्रीडा विभागातर्फे विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.  शासकीय आश्रम शाळा सारखणी येथील जगदीश शेडमाके व संचिता वाडगुरे प्रथम क्रमांक17 वर्षे वयोगटातून बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्य स्तरावक मजल मारून किनवट तालुक्याचे नाव राज्य पातळीवर नेले आहे. तर  द्वितीय क्रमांक   संदेश कनाके, विशाल तरडे, पृथ्वी धुर्वे, पवन कुसराम, नामदेव गेडाम, कार्तिक जाधव तृतीय क्रमांक गणेश कोरंगे, किरण गुवाडे, तुषार गेडाम, प्राजक्ता दरडे  सुरज टेकाम  रणजित पवार  या विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.          या सर्व विद्यार्थ्यां यशापाठीमागे क्रिडा शिक्षक NIS राष्ट्रीय कोच संदीप यशीमोड व बाळकृष्ण कदम सर 

तेलंगणा राष्ट्र समिती(T.R.S.) पक्षाचे माजी खासदार एन. घोडाम यांची किनवट अभीवक्ता संघास भेट...

  किनवट (तालुका प्रतिनिधी) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय किनवट येथे न दिल्यास किनवट/ माहूर तालुका तेलंगणात जाणार असे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब किनवट यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास  दिल्या नंतर शासन आता काय निर्णय घेईल ही बाब सर्वात महत्वाची असताना आज दिनांक 20/12/2022 रोजी तेलंगाना राष्ट्र समिती जी भारतीय राष्ट्र समिती असे ज्या पक्षाने धारण केले त्या पक्षाचे माजी खासदार यांनी भेट देऊन किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी हितगुज केली.. नवोदित वकिलास तेलंगाना राज्यात विकासात्मक योजना आहेत त्या महाराष्ट्रात सुधा सुरू होतील व तेलंगाना राज्या प्रमाणे शेतकऱ्याचा विकास साधण्यासाठी आमचा पक्ष कटिबध्द आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. सदर पक्ष महाराष्ट्रात कसा विजय प्राप्त करेल अथवा अजेंडा कसा राबवेल असे ॲड विलास शामीले (सुर्यवंशी) यांनी विचारले असता माजी खासदार यांनी आम्ही शेतकरी शेतमजूर यांच्या विकासा साठी कटिबध्द आहोत असे सांगितले आमचे शासन तेलंगणात विकास करून तेलंगाना पॅटर्न आमच्या साठी चांगली बाब आहे महाराष्ट्रात विकास करणे हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सुकर आहे असे

मांडवी परिसरामध्ये निकृष्ट फरसाणची सर्रास विक्री

  मांडवी  प्रतिनिधी   मांडवी परिसरामध्ये अनेक गाव ,खेडे , तांडे वस्त्या असून परिसर हा दुर्गम भागातील आहे.  खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणात नित्कृष्ट फसवण्याची विक्री सरास पण होत असून यामुळे लहान मुलाचे आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग यावर कारवाई करावी अशी मागणी होत आह   नामांकित कंपन्यांचे  फरसाण  मार्केट मध्ये उपलब्ध असून त्याच फरसाणची कॉपी करून त्याच नावामध्ये फेरबदल करून हे फरसाण  सर्रासपणे विक्रीस उपलब्ध आहे  निष्कृष्ट दर्जामुळे लहान मुले हे बिमार पडत असून खोकल्याचे प्रमाण वाढलेले आहे चवीला आहे एकदम खालच्या दर्जाच्या असतात पण ग्रामीण भागातील अनेक महिलांना व लहान मुलांना याची फरक कळत नसल्यामुळे हे  फरसाण खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे  सध्याच्या परिस्थितीमुळे फरसाण व अल्प आहार ( स्नॅक) दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत असून याची गुणवत्ता तपासण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाने करावे अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे   मांडवी परिसरामध्ये या निष्कृष्ट  फरसाण मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असून पुरवठा करणाऱ्यावर  स्थानिक प्रशासनान

बेंदी (तांडा ) ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता चंपत जाधव सरांनी मानले गावकऱ्यांचे आभार

बेंदी :- बेंदी (तांडा) ग्रामपंचायतचे सरपंच अंजनाबाई मनोहर पेंदोर यांच्यासह सर्व सदस्य भरघोस मताने निवडून आल्याने पॅनल प्रमुख तथा सेवानिवृत्त कर्मचारी चंपत कनीराम जाधव सर यांना गावकऱ्यांच्या प्रेमाची थाप व विकासाची कास या धर्तीवर एक हाती सत्ता दिली. किनवट पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंदी (तांडा) ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 18/12/2022 रोजी पार पडली या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेपासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्वीच तीन सदस्य बिनविरोध निवडले गेल्याने बळीराम पाटील कॉलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी चंपत कनीराम जाधव यांचा आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेत नियोजनबद्ध पद्धतीने गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळींना सर्व शासकीय योजनांचे महत्त्व पटवून देत प्रचारामधे सर्वांचे मन जिंकून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक लढविल्याने गेल्या अनेक वर्षापासून बेंदी (तांडा) गावाचा विकास झालेला नाही या कारणामुळे गावातील नागरिकांना प्रतिस्पर्धी यांच्या सर्वच उमेदवारांना बगल देत नवीन उमेदवारांना सरपंचसह सर्वच सदस्य निवडून आणत गावकऱ्यांनी नवी

आंबानगर नांदेड येथे आज राज्यस्तरीय गीतगायन महास्पर्धा गाडगेबाबांच्या निर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे स्मृती दिनानिमित्त आयोजन

"समाजस्वर" "समाजशब्द" आणि "समाजविद्या" पुरस्कारचे होणार वितरण किनवट : दि - राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा महापरिनिर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे यांच्या ९व्या स्मृतिदिनानिमित्त आंबानगर (सांगवी) नांदेड येथे आज दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय संगीतमय गितगायन महास्पर्धेचे आयोजन केले असल्याचे महेंद्र नरवाडे यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता बालाजीराव गच्चे, नांदेड यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही प्रबोधनकार कैलासदादा राऊत हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराबाई काशिनाथ वाठोरे राहणार आहेत.  या महास्पर्धेसाठी प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि ५०००रु. ३०००रु. २०००रु. आणि १०००रु अशी बक्षिसे असणार आहेत. संगीतकार तथागत आणि समाधान राऊत नांदेड यांचे ऑर्गन, पॅड, बॅझो, ढोलक, तबला आदी अत्याधुनिक संगीत साहित्य सर्व स्पर्धकांसाठी उपलब्ध असेल.  *या स्पर्धेसाठी नांदेड शहर, नांदेड सिडको, किनवट, नायगाव, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव, उमरखेड, मुदखेड, भोकर, बाळापूर, वसमत, जालना, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, अमरावती, चिमूर,

तालुका स्तरीय शालेय विविध क्रिडा स्पधेचे आयोजन

  ✍🏻 राजेश पाटील/ तालुका प्रतिनिधी किनवट:- क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ जिल्हा क्रिज अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने किनवट येथील तालुका क्रिडा संकुल येथे "तालुकास्तरीय शालेय विविध क्रिडा स्पर्धा२०२२-२३ चे आयोजन करण्यात आले आहे ह्या क्रिडा स्पर्धा दिनांक ०३ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत चालणार आहेत या मध्ये क्रिडा प्रकार १) तायक्वांदो२) बॅडमिंटन ३) योगासन ४) कुस्ती ५) मैदानी ६) क्रिकेट ७) कबड्डी ८) खो- खो ९) फुटबॉल आदी खेळांचा समावेश असुन या मध्ये एकुप १६ शांळाचा सहभाग घेतला आहे .

दलित पॅंथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार- डॉ.सुरज येंगडे

  - दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव; तरुणांचा उस्पूर्त सहभाग औरंगाबाद: दलीत पँथर अगोदरच काळ साहित्य विद्रोहाचा काळ आहे. साहित्यातून विचार तयार झाला विचारातून नवी ऊर्जा तयार झाली आणि नव्या ऊर्जेला पर्याय म्हणून  पॅंथरच निर्माण झालं. त्यानंतरने चार वर्ष मोठ्या ताकतीने काम केलं. पॅंथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले.ज्या ठिकाणी अंन्याय अत्याचार व्हायचे त्या ठिकाणी पँथर जाणारा हे कळताच तेव्हा प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा असा धाक पँथरचा होता.मात्र आयडीयॉलोजी कारणाने पँथर बरखास्त करण्यात आली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. मात्र दलित पॅंथर ही आग आहे ही सहज विझत नाही ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे असेही येंगडे म्हणाले.  दलित पॅंथरच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये रविवार दि.१८ रोजी शेवटचा दिवस होता.या यावेळी मार्गदर्शक म्हणून संशोधक डॉ. सुरज येंगडे जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल पोलीस अधिकारी प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले की, पँथरच्या माध्यमातून तुमच्या पूर्वजांनी विषम

५० ग्रामपंचायतीचे भवितव्य ईव्हियम यंत्रात बंद ,७०% मतदान झाले

  किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्रावर निवडणूक लढविणाऱ्या सरपंच पदाच्या 137 व सदस्य पदाच्या एकूण 722 उमेदवारांचं भवितव्य अंदाजे सत्तर टक्के मतदारांनी मतदान करून केलं मतदान यंत्रात बंद सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले, भाप्रसे व निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सकाळ पासून दिले होते.. तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित शांतपणे पार पडत असल्याचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष पाहणीत घेतला. बुधवार पेठ, शनिवार पेठ ही दोन गावे तसेच 07 सरपंच व 77 सदस्य बिनविरोध झालीत. सक्रुनाईक तांडा येथून एकही नामनिर्देशन दाखल झालं नाही. त्यामुळे ही तीन गावे वगळता उर्वरित 50 ग्राम पंचायतीसाठी 146 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. 21105 पुरुष मतदार, 19316 स्त्री मतदार व 0 1 असे एकुण मतदार 40422 होते. यापैकी 70% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे. निवडणूकीकरिता क्षेत्रीय अधिकारी 9, मतदान केंद्राध्यक्ष 179, मतदान अधिकारी एक 179, मतदान अधिकारी दोन 185

१२ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित. माजी आमदार प्रदीप नाईक यांना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण.

किनवट : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी देखील किनवट येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची लगबग व जय्यत तयारी सर्वीकडे पाहण्यास मिळत आहे. मग ते भिंती वरील पेंटींग असो, अॅटो व गाड्यावरील बॅनर व पोस्टर असो, किंवा फेसबुक व व्हाट्सअॅप अशा सोशल नेटवर्किंग साइटवरील पोस्ट असो, सध्या सर्वीकडेच १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची तयारी पाहण्यास मिळत आहे.           किनवट माहुर विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक काल दिनांक १४ डिसेंबर रोजी किनवट आले असता, १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद च्या टिम नी प्रदिप नाईक यांची भेट घेऊन त्यांना दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण दिले. यावेळी प्रदिप नाईक यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे करपुडे पाटील व किनवट चे माजी नगराध्यक्ष साजिद खान यांना देखील निमंत्रण देण्यात आले. यावेळी १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांच्या सोबत, निखिल वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, राजु नरवाडे, राहुल चौदंते, दत्ता भाले

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव शाखेच्या वतीने प्रा. नितेश कराळे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन

प्रतिनिधी यवतमाळ/ मारेगाव:- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कार्यकारणीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले विद्यार्थ्यांना हसत खेळत स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देणारे फिनीक्स अकॅडमीचे " खदखद मास्तर " प्रा. नितेश कराळे यांच्या मार्गदर्शनाचा व व्याखानाचा कार्यक्रम प्रे. सं. व प. से. सं.चे संस्थापक मा. डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान मारेगाव जि. यवतमाळ येथे २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा तयारी करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी , विद्यार्थिनी शिक्षक वृंद प्राध्यापक  उपस्थित रहावे असे आवाहन मारेगाव   प्रे. सं. व प. से. सं. चे दिपक डोहाणे, सचीन मेश्राम, कैलास ठेगंणे, अमोल कुमरे, अनंतराव गोवर्धन, रवी घुमे, सुनीत उतने, पंकज नेहारे, कैलास मेश्राम, जय प्रकाश वनकर, सुरज झोटींग, रोहन आदेवार, संतोष बहादुरे, विवेक तोडसे, सुदर्शन टेकाम, राजु पिपरवाडे, संतोष कोवे आदींच्या वतीने करण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान!

  तळा, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना श्री चंद्रकांत रोडे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी रायगडच्या माजी पालकमंत्री आ आदिती तटकरे, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सर्व नगरसेवक व नगरसेविका, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मारोती शिर्के गुरुजी, उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रविभाऊ मुंढे, बाळासाहेबांची शिवसेना शहर अध्यक्ष राकेशशेठ वडके, तळा नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या नेहा पांढरकामे, गो म वेदक विद्यालयाचे चेअरमन महेंद्रशेठ कजबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्रीराम कजबजे, शिवसेना नेते लिलाधर खातू, ॲड उत्तम जाधव, ॲड चेतन चव्हाण, ॲड रोशन पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत नांदगावकर पत्रकारितेच्या माध्यमातून तळा तालुक्यातील पाणी, कचरा, रस्ते, कृषी, आरोग्य, शैक्षणिक आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा विचार करून सदर पुरस्का

तपासात कुठलाही हलगर्जीपणा नको : आमदार भीमराव केराम

 प्रशासनाकडून आश्वासन : आत्महत्याग्रस्त विश्रांतीवर तीस तासांनंतर अंत्यसंस्कार शवविच्छेदन अहवालासह कारवाईकडे लक्ष बरडशेवाळा, ता. १५ (बातमीदार) केदारगुडा येथील शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेत चौथीत शिकत असलेल्या दहावर्षीय विद्यार्थिनी विश्रांती बाळू देशमुखे हिने सोमवारी (ता. १२) सायंकाळी आत्महत्या केली होती. या प्रकरणी प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त विश्रांतीवर तीस तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. आत्महत्येची घटना घडल्यानंतर सायंकाळी आश्रमशाळेवर कुटुंबीयांसह गावकरी व समाज बांधवांनी धाव घेऊन गर्दी केली होती. घटनास्थळी तहसीलदार जीवराज डापकर व पोलिस उपविभागीय अधिकारी अफशत आमना यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली. गर्दी लक्षात घेऊन आणखी पोलिसांची कुमक मागविण्यात आली. आत्महत्येचा तपास योग्य पध्दतीने व्हावा, यासाठी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. १३) दुपारी चार वाजता इन कॅमेरा शवविच

त्या घटनेचे चित्रकरण करणाऱ्या पत्रकारावरील अन्यायाविरोधात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आक्रमक

  यवतमाळ : पुणे येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांच्यावर भीमसैनिक मनोज गरबडे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे कडून महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अपमानजन्य वक्तव्य केल्याचे निषेधार्थ पुणे येथे त्यांच्यावर शाही फेकण्यात आली या घटनेचे चित्रीकरण वृत्तांकन करण्याचे दृष्टीने पुणे येथील न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी केले असता सदर प्रकरणात गोविंद वाकडे यांना सामील असल्याचा खोटा आरोप करून पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा व हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी शासनाला निवेदन दिले आहे. पत्रकार विरोधात केलेला कट हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभावर घाला घालण्यात आला असून महाराष्ट्रातील पत्रकार कदापिही सहन करणार नाहीत. पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिक

चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करा व मनोज गरबडे या भिमसैनिकाची सहकाऱ्यासह सुटका करा - बहुजन युथ पँथर

 नांदेड :  महापुरुषांचाबद्दल अपशब्द वापरणारे भाजपा चे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मंत्री पदाचा राजीनामा घेऊन यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.      राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांची मंत्रिमंडळावरून हकालपट्टी करण्यात यावी व त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात कठोर कायदा करावा व त्याची अंमलबजावणी करावी. मनोज गरबडे व सहकारी यांच्या वरील चुकीचे गुन्हे रद्द करावी. महाराष्ट्रात होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानजनक वक्तव्य करण्याचे सत्र बंद झाले पाहिजे. अन्यथा बहुजन युथ पँथर च्या वतीने पूर्ण नांदेड जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. असे अशा आशयाच्या मागणी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी उपस्थित नांदेड जिल्हाप्रभारी भिमराव बुक्तरे वि.आघाडी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पाटोळे, शहर उपाध्यक्ष सागर ससाणे, विक्रांत बिऱ्हाडे, म

महापुरुषांचा सातत्याने अवमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांचा किनवट येथे तिव्र निषेध व राजीनाम्याची मागणी

  तालुका प्रतिनिधी:- बहुजन समाजाच्या जडण -घडणीत व समाज सुधारणेत ज्यांचा सिंहांचा वाटा आहे अशा महामानवांचा अवमान संविधानीक पदावर असलेल्या भगतसिंग कोश्यारी, भाजप मंत्री मंडळात उच्च शिक्षण मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्या कडुन सातत्याने जाणीव पुर्वक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अवमान झाला या प्रकरणी  किनवट येथील शिव, फुले , शाहु, आंबेडकरी प्रेमी अनुयायां तर्फे जिजामाता चौकात तिव्र निदर्शने करण्यात आली तसेच अँट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली तहसिल कार्यालय  , पो. उ. वि. कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना  निवेदन देण्यात आले या वेळी विनोद भरणे, विवेक ओंकार, अभय नगराळे, राजु शेळके, रवींद्र कांबळे, सुगत नगराळे, सचीन कदम पाटील,सुरेश मुनेश्वर, प्रविण गायकवाड, भिमराव पाटील,किशन परेकार, राजेश पाटील,सुगत भरणे, निखील कावळे,शुभम पाटील, अनिल साकपेल्लीवार, कापसे, गंगाधर मुनेश्वर, गंगाधर कदम, शुभम पाटील, आकाश सर्पे, आनंद कावळे, निवेदक कांनिदे, सम्राट सर्पे, सचिन कावळे, प्रशांत ठमके, सतीश कापसे, प्रतिक नगराळे,

पत्रकारांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही : डी. टी. आंबेगावे

 पत्रकारांच्या एकजुटीचा विजय.... पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली या घटनेची न्यूज 18 लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांनी बातमी कव्हर केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पत्रकार गोविंद वाकडे यांच्या अटकेचा निषेध करून त्यांना तात्काळ मुक्त करावे यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि इतर पत्रकार संघटना आंदोलन करण्याच्या पावित्र्यात होत्या. आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. पत्रकार संघटनांचा विजय झाल्याचे चित्र आहे आणि यामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा सहभाग असने हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची ताकद आहे. शिवाय अस्तित्वही असे पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे यांनी सांगितले.  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सर व पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी यांचे मनापासून आभार! कारण पत्रकारावर विनाकारण झालेला अन्याय कदापीही सहन केला जाणार नसल्याचे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले आहे.

वेतनात बदल नका करू साहेब वन कामगार महीलांची आर्त हाक वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट येथील वनकामगार महीलांचे उपोषण

  किनवट/प्रतिनिधी:  गेल्या 13 दिवसापासून वन कामगार महिला वनपरिक्षेत्र कार्यालय किनवट येथे उपोषणाला बसल्या असून त्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाहीत.आशा कडक थंडीच्या दिवसात गेल्या 13 दिवसापासून धरणे आंदोलन करत असून या दरम्यानआमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट यांच्यावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वन कामगारांनी गेल्या13 दिवसापूर्वी वनपरिक्षेत्र कार्यालयात, किनवट, उपविभागीय कार्यालय किनवट व तहसीलदार कार्यालय किनवट येथे युएलपी 19 अभिलेख 2022 या प्रकरणातील कामगारांना सेवेत व वेतन बदल न करणे व रोपवाटिका लोणी मध्ये 8/ 2/2022 पासून कामावर चालू आहेत तरी आमची पगार मिळणे बाबतआशा आशयाचे निवेदन सादर केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी वनपरिक्षेत्र कार्यालय किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, न्यायालय आदेशातील सर्व कामगार आपले परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत कामावर चालू आहेत. आमच्या सेवेत व वेतनात कसलीही बदल करू नये असा आदेश माननीय न्यायालयाचा आहे. आमच्या सेवेत आणि वेतनात बदल करू नये बदल के

किनवट येथे जागतिक स्तरीय धम्म परिषद ११ व १२ फेब्रुवारी रोजी होणार ,विविध बौद्ध भिक्खुंची धम्म देसना होणार समितीची माहिती

  किनवट प्रतिनिधी:- फुले, शाहू, दिवस भरगच्च कार्यक्रम राहणार देशविदेश व भारतातून येणाऱ्या आंबेडकरी विचारांचे वैचारिक असून यात बौद्ध भिक्षूंची मान्यवरांचे विचार आत्मसात मंथन व्हावे, समाजात नवी उर्जा धम्मदेसना, व्याख्याने, वक्त्यांची करण्यासाठी वैचारिक विचारांची निर्माण व्हावी, महामानवांची भाषणे, सांस्कृतिक महोत्सव, देवाणघेवाण करण्यासाठी विचारप्रणाली जनमाणसात प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे रुजावी यासाठी शनिवार ता. ११ ११ धम्मपरिषदा यशस्वीरित्या पार आवाहन संयोजन समितीचे व रविवार ता. १२ फेब्रुवारी पडल्यानंतर १२ व्या धम्म परिषदेचे दयाभाऊ पाटील, संयोजक २०२२ रोजी बुध्दमुर्ती परिसर, स्वागताध्यक्ष पूर्णाचे माजी नगराळे, आयोजक राहूल अध्यक्ष कापसे, समतानगर किनवट येथे बाराव्या नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे राहणार संयोजन समितीचे सम्राट कावळे, जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल हलवले, राहूल गिमेकार, येथे आयोजन करण्यात आले देवकांत वंजारे, गंगाधर ढवळे, सुधाकर हलवले, सुगत नगराळे, आहे. या धम्म परिषदेत दोन प्रशांत वंजारे हे करणार आहेत. विजय पाटील यांन

नसीर तगाले यांना चौथ्यांदा बॉलीवूड लिजेंड अवॉर्डने सन्मानित

  किनवट/ प्रतिनिधी: कृष्णा फाउंडेशन मुंबई तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध कार्याबद्दल बॉलीवूड लिजंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मेअर हाऊस अंधेरी वेस्ट या ठिकाणी 10 डिसेंबर 2022 रोजी अनेक मान्यवरांना बॉलीवूड लेजंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात किनवट येथील आज की न्यूज चे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका सचिव मा. नसीर तगाले यांनाही या अवॉर्डने सलग चौथ्यांदा सन्मानित करण्यात आले.

सहा दिवसीय कयाधु- पैनगंगा महोत्सव निमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वकृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

  नांदेड, दि. १० (वार्ताहर)ः वक्तृत्व स्पर्धेला बोलणाऱ्या वक्त्यांची आणि श्रोत्यांची संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कोल्यास श्रोत्यांची भाषणे ऐकण्यास श्रोते येतील का हा आयोजकां समोरील सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेस आत्तापर्यंत अपेक्षेपेक्षा असा मोठा प्रतिसाद मिळाला आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतुच विद्यार्थ्यांमधील वक्ता सदैव जागे राहावा असाच आहे. तो हेतु साध्य झाला असल्याचे वक्तव्य राजश्री पाटील यांनी येथे केले.  खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१०) किनवट येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राजश्री पाटील बोलत होत्या. याप्रसंगी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सु