Skip to main content

सहा दिवसीय कयाधु- पैनगंगा महोत्सव निमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वकृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


 

नांदेड, दि. १० (वार्ताहर)ः वक्तृत्व स्पर्धेला बोलणाऱ्या वक्त्यांची आणि श्रोत्यांची संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कोल्यास श्रोत्यांची भाषणे ऐकण्यास श्रोते येतील का हा आयोजकां समोरील सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेस आत्तापर्यंत अपेक्षेपेक्षा असा मोठा प्रतिसाद मिळाला आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतुच विद्यार्थ्यांमधील वक्ता सदैव जागे राहावा असाच आहे. तो हेतु साध्य झाला असल्याचे वक्तव्य राजश्री पाटील यांनी येथे केले. 

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१०) किनवट येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राजश्री पाटील बोलत होत्या.

याप्रसंगी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, शहर प्रमुख सुरज सातूरवार, भाजपचे धरमसिंग राठोड,  अशोक नेमानिवार, माहूर उपतालुका प्रमुख हनुमंतराव मुंडे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, मनोज तिरमनवार, शिवराज राघू मामा, पंढरीनाथ ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम, घनश्याम कऱ्हाळे, कपिल रेड्डी, चंद्रकांत जयभाये, भाऊराव राठोड, प्रा. सुरेश कटकमवार, सोनू माने, साई पलेपवाड, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, शेख अजीज, शेख अफसर, मोहसीन, गजानन जाधव, किनवट तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, महात्मा जोतिबा फुले संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्य शुभांगी ठमके, यांची उपस्थित होती.

या कार्यक्रमास उपस्थितीत असलेल्या किनवटच्या तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वक्तृत्व स्पर्धे बद्दल पुढे बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या की, खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भजन, किर्तन, प्रवचन सारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असते, त्यास श्रोत्यांना बोलावण्याची गरज पडली नसती, परंतु माझ्या मतदार संघातील तरुणवर्गास युवा पिढीच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, विचार त्यांच्या भावना समजुन घेण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेसारखे दुसरे उपसयुक्त माध्यम नाही. त्यामुळे आज या स्पर्धेस वक्ते आणि श्रोत्यांची संख्या मर्यादित वाटत असली तरी, पुढील वर्षी मात्र या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आणि श्रोत्यांची संख्या मोठी असेल त्यासाठी मतदार संघ निहाय वक्तृत्व स्पर्धेची कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी अजय झरकर, किर्ती तगडपल्लेवार, पंकज मोरे यांनी परिक्षण केले, उत्तम कानिंदे यांनी सुत्रसंचलन केले, सुनिल गरड यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...