Skip to main content

तेलंगणा राष्ट्र समिती(T.R.S.) पक्षाचे माजी खासदार एन. घोडाम यांची किनवट अभीवक्ता संघास भेट...

 



किनवट (तालुका प्रतिनिधी) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय किनवट येथे न दिल्यास किनवट/ माहूर तालुका तेलंगणात जाणार असे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब किनवट यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास  दिल्या नंतर शासन आता काय निर्णय घेईल ही बाब सर्वात महत्वाची असताना आज दिनांक 20/12/2022 रोजी तेलंगाना राष्ट्र समिती जी भारतीय राष्ट्र समिती असे ज्या पक्षाने धारण केले त्या पक्षाचे माजी खासदार यांनी भेट देऊन किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी हितगुज केली..

नवोदित वकिलास तेलंगाना राज्यात विकासात्मक योजना आहेत त्या महाराष्ट्रात सुधा सुरू होतील व तेलंगाना राज्या प्रमाणे शेतकऱ्याचा विकास साधण्यासाठी आमचा पक्ष कटिबध्द आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

सदर पक्ष महाराष्ट्रात कसा विजय प्राप्त करेल अथवा अजेंडा कसा राबवेल असे ॲड विलास शामीले (सुर्यवंशी) यांनी विचारले असता माजी खासदार यांनी आम्ही शेतकरी शेतमजूर यांच्या विकासा साठी कटिबध्द आहोत असे सांगितले आमचे शासन तेलंगणात विकास करून तेलंगाना पॅटर्न आमच्या साठी चांगली बाब आहे महाराष्ट्रात विकास करणे हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सुकर आहे असे सांगितले..

अभिवाक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड कुरेशी साहेब यांनी सुधा किनवट माहूर /तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी खासदार साहेब यांना अनेक प्रश्न विचारून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उभारण्यासाठी प्रयत्न करावे त्यावर माजी खासदारांनी तेलंगाना राज्याचे मुख्मंत्री यांना भेटून विनंती तथा सूचना करावी असे सूचित केले लवकरच तेलंगाना राज्याचे मुख्य मंत्री यांना अभिवक्ता संघ भेट देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रां कडून माहिती मिळाली आहे..

तेलंगणा राष्ट्र समिती चे पदाधिकारी भेट देत असल्या मुळे किनवट/माहूर तालुक्या चां विकास साधण्यासाठी निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत तेंव्हा संपूर्ण जनतेने साथ द्यावी अशी विनंती केली..

यावेळी अभिवक्ता संघाचे सचिव ॲड पंकज गावंडे साहेब ॲड ताजने साहेब ॲड. एस. डी. राठोड, ॲड, उदय चव्हाण साहेब ॲड वैद्य साहेब, ॲड. किशोर मुनेश्र्वर साहेब ॲड. येरेकर ॲड. टेकसिंघ चव्हाण ॲड,

कृष्णा राठोड ॲड सोनकांबळे साहेब ॲड नयन मूनेश्र्वर ॲड काळे साहेब ॲड, एम. यु. सर्पे साहेब 

ॲड. पुरुषोत्तमवार साहेब इत्यादी उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...