Skip to main content

आंबानगर नांदेड येथे आज राज्यस्तरीय गीतगायन महास्पर्धा गाडगेबाबांच्या निर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे स्मृती दिनानिमित्त आयोजन





"समाजस्वर" "समाजशब्द" आणि "समाजविद्या" पुरस्कारचे होणार वितरण


किनवट : दि -

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा महापरिनिर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे यांच्या ९व्या स्मृतिदिनानिमित्त आंबानगर (सांगवी) नांदेड येथे आज दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय संगीतमय गितगायन महास्पर्धेचे आयोजन केले असल्याचे महेंद्र नरवाडे यांनी सांगितले आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता बालाजीराव गच्चे, नांदेड यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही प्रबोधनकार कैलासदादा राऊत हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराबाई काशिनाथ वाठोरे राहणार आहेत.


 या महास्पर्धेसाठी प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि ५०००रु. ३०००रु. २०००रु. आणि १०००रु अशी बक्षिसे असणार आहेत. संगीतकार तथागत आणि समाधान राऊत नांदेड यांचे ऑर्गन, पॅड, बॅझो, ढोलक, तबला आदी अत्याधुनिक संगीत साहित्य सर्व स्पर्धकांसाठी उपलब्ध असेल. 

*या स्पर्धेसाठी नांदेड शहर, नांदेड सिडको, किनवट, नायगाव, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव, उमरखेड, मुदखेड, भोकर, बाळापूर, वसमत, जालना, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, अमरावती, चिमूर, चंद्रपूर, पुणे आणि धर्माबाद येथील ५८ स्पर्धकांचा प्रवेश निश्चित झाला आहे.*


या कार्यक्रमाच्या आयोजनाचे हे ९ वे वर्ष असून या कार्यक्रमांत तीन विशेष व्यक्तीमत्वांना या कार्यक्रमात विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


*"गीतगायन" प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी "समाजस्वर" पुरस्कार देऊन यावर्षी शाहीर बळीराम हनवते, हिमायतनगर यांना, "साहित्य" प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी "समाजशब्द" पुरस्कार देऊन इंजिनीयर चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड यांना आणि "ज्ञान-विज्ञान" प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी 'समाजविद्या' पुरस्कार देऊन प्रो. डॉ. भास्कर दवणे, नांदेड यांना सन्मानित करण्यात येणार आहे*


या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून म्हणून निराबाई प्रभाकरराव गोखले, सरस्वताबाई तुकाराम गोखले, जिजाबाई ग्यानबाजी गोखले, विठ्ठलराव रणवीर, पांडुरंग दिपके कुरुळी, किसनराव भोरे भानेगाव, भीमराव राऊत कुपटी, मिलिंदराव गोखले आणि शिवाजीराव कवडे आदीलाबाद उपस्थित राहणार आहेत. 


मंडपात सर्व प्रेक्षकांसाठी खुर्च्याची आसन व्यवस्था केली आहे. या पबोधनात्मक कार्यक्रमाला सर्व बहुजनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक तथा व्यवस्थापक भालचंद्र वाठोरे, भारत वाठोरे, डॉ. सुनील गोखले, डॉ. माणिक साळवे, राजकुमार कवडे, संजू गोखले, संजय वाठोरे, महेंद्र नरवाडे किनवट, प्रा. प्रदीप एडके किनवट, एल्. जी. खंदारे वसमत, बी. सी. पाईकराव डोंगरकडा, डॉ. पंडित वाठोरे, विलास बिदाजी वाठोरे, मनोहर सोनाळे, साहेबराव पंडित, सुभाष नारायण राऊत, पत्रकार गौतम वाठोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...