चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करा व मनोज गरबडे या भिमसैनिकाची सहकाऱ्यासह सुटका करा - बहुजन युथ पँथर
नांदेड : महापुरुषांचाबद्दल अपशब्द वापरणारे भाजपा चे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मंत्री पदाचा राजीनामा घेऊन यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांची मंत्रिमंडळावरून हकालपट्टी करण्यात यावी व त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात कठोर कायदा करावा व त्याची अंमलबजावणी करावी. मनोज गरबडे व सहकारी यांच्या वरील चुकीचे गुन्हे रद्द करावी. महाराष्ट्रात होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानजनक वक्तव्य करण्याचे सत्र बंद झाले पाहिजे. अन्यथा बहुजन युथ पँथर च्या वतीने पूर्ण नांदेड जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. असे अशा आशयाच्या मागणी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी उपस्थित नांदेड जिल्हाप्रभारी भिमराव बुक्तरे वि.आघाडी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पाटोळे, शहर उपाध्यक्ष सागर ससाणे, विक्रांत बिऱ्हाडे, मौलाना सय्यद नुरल हस्नेन, भारत भिसे, ऋतिक मुंगल, मनोज सोनकांबळे सह आदी जण उपस्थित होते.
Comments
Post a Comment