"किनवटच्या सेट्राइब इन्स्टीट्युटच्या आदीवासी विद्यार्थ्यांनी बनवले महा असेंबली ऐप, मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाला शुभारंभ"
महाअसेंबली अँपचे विधान भवनात उदघाटन करतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, निलम गोऱ्हे, सारंग वाकोडीकर आदी.
ता. प्र. किनवट
डिसेंबरमध्ये झालेल्या नागपुर हिवाळी अधिवेशन 2022 साठी करण्यात आलेल्या विविध उपाय योजना, अधिवेशन, दैनंदीनी, महत्वाच्या व्यक्तीचे दुरध्वनी क्रमांक, विविध बैठका संदर्भातील माहीती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी महाअसेंबली हे ऍप कार्यान्वीत करण्यात आले आहे, विशेष आनंदाची बाब म्हणजे हे अँप नांदेड जिल्हयातील
किनवट येथील सेट्राईब या आय.टी. कंपनीच्या ग्रामीण भागातील आदीवासी विदयार्थ्यांनी तयार केले आहे सर्व सन्मानीय राज्यसभा सदस्य याचा लाभ घ्यावा अशी माहिती सेट्राईबचे संचालक सारंग वाकोडीकर यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment