Skip to main content

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक आज दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले

 



-खासदार हेमंत पाटील; यांनी विद्यार्थ्यांना दिल्ली दौऱ्यासाठी शुभेच्छा देत रवाना केले


नांदेड, दि. २५ (वार्ताहार) ः हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्ली संसदभवन अभ्यास दौरा आणि इतर प्रेक्षणिक स्थळे बघण्यासाठी आज सर्व ५० स्पर्धक व जनसंपर्क अधिकारी दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.  खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  हिंगोलीसह औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव, कळमनुरी, माहूर, किनवट, उमरखेड, हिमायतनगर, महागाव आणि हादगाव या तालुक्यातील साडेतीनशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील पन्नास विजेते स्पर्धक रविवारी (दि.२५) खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी नांदेडच्या हुजूर साहिब रेल्वे स्थानकाहून दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी खासदार हेमंत पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी रेल्वे स्थानावर हजर राहुन दिल्लीकडे निघालेल्या विजेत्या स्पर्धकांचे पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी अधिक माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, वक्तृत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे बघता येणार आहे. वास्तूसंग्राहलय, विविध संस्थानच्या भेटी, राष्ट्रपती यांच्या देखील भेटीचा वेळ मिळाला आहे. संसदभवन परिसरासह, ग्रथालय, विज्ञान भवन, पंतप्रधान संग्राहलय यासह विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार आहे. विशेष म्हणजे देशाचा महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना भेटता येणार असल्याने सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पाच दिवसाच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना प्रवासा दरम्यान चहा, बिस्कीट, नाष्टा, शुद्ध पिण्याचे पाणी तर दिल्लीत पोहचल्यानंतर राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी सौ. राजश्री पाटील, बाबुराव कदम कोहळिकर, बबन कदम यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...