Skip to main content

आ. भिमराव केराम यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यासाठी ३ कोटी तर प्रलंबीत कामाकरीता ७ कोटी एकुण दहा कोटी निधी उपलब्ध करून दिले

 



किनवट ता. प्र दि २४ राज्यातील सत्तांतरा नंतर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघामध्ये आ. भिमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास एकूण 3 कोटी व शहरातील इतर प्रलंबित विकास कामा करिता 7 कोटी रुपये निधी असे एकूण 10 कोटीचा निधी किनवट नगर परिषदेला उपलब्ध करून दिले आहे. आ. केराम हे आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे हेच धेय्य घेऊन सतत कार्यरत असलेले नेते म्हणुन त्यांची मागील ४० वर्षापासुन किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात ख्याती आहे. २०१९ विधानसभा निवडणूकीत येथिल जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली परंतु सुरवातच हि कोरोना नावाच्या विषाणुने व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले त्यामुळे मागील तीन वर्षात राज्यातील महाविकास आघाडी मुळे किनवट माहुर विधानसभा क्षेत्राचे विकास हे मनाजोगे करता आले नाही. 

परंतु राज्यात सत्तांतर झाल्या नंतर आ. केराम यांचे पिंड हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर व बिरसा याच्या विचारांचे असल्याने इतिहासातील महापुरुष हा त्यांचा आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय असून विधानसभा क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाची कामे सुरु असतांना त्यांच्या मनात असलेल्या विषयाला न्याय मिळवुन देण्याचे प्रयत्न सातत्याने चालु होते त्याअनुषंगाने  नुकतेच त्यांनी हुतात्मा गोंडराजे मैदान सुषोभीकरण करण्याच्या कामास सुरवात केली. त्यापाठोपाठ किनवट शहर व तालुक्यातील तमाम शिवभक्त व आंबेडकरी अनुयायांचा आस्थेचा विषय असलेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा या दोन्ही पुतळ्याच्या पुर्णजिवनाचा विषय गाजत असतांना कोणताही गाजावाजा न करता आ. केराम यांनी सदरील दोन्ही पुतळ्या करिता ३ कोटी रुपये निधी मंजुर करवुन घेतला आहे. 

तर भाजपाचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी सांगितले कि किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही व उपनगराध्यक्ष व सर्व पक्षिय नगरसेवकांनी शहरातील दोन्ही महापुरुषाचे पुतळे भव्य स्वरुपात व्हावे या करिता प्रयत्न, पाठपुरावा केला होता तर आ. केराम यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्यांने आम्ही किनवट्च्या जनतेच्या वतीने आमदार केराम यांचे आभार मानतो.

(चौकटः  तर आ. केराम यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि सुमारे ४० वर्ष माझ या शहरात वास्तव्य आहे हे शहर माझ्या जिवनातील सुख व दुखाच्या प्रसंगाचा साक्षिदार आहे व मला या शहराने खुप काही दिले आहे त्याच बरोबर जेवढे प्रेम मला या शहरातील नागरीकांनी दिले त्यांचे ऋण मी कधीच फेडु शकत नाही परंतु माझ्या हातुन या मतदारसंघातील नागरीकांसाठी जेवढे चांगले होईल ते मी करण्याचे प्रयत्न करणार तर शहरातील व विधानसभा क्षेत्रातील तरुण पिढीने आपल्या महापुरुषांना पाहून त्यांच्याकडून बोध घेणे आवश्यक असून शहरात होणारे हे दोन्ही महापुरुषांचे भव्य दिव्य पुतळे युवकांना प्रेरित करतील. )

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...