Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू

सौजन्य नांदेड (जिल्हा माहीती कार्यालय) दि. ३० :- सन २०१३ च्या भारतीय प्रशासकिय तुकडीतील अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सन २०१४-१५ मध्ये त्यांनी सांगली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकिय कारकिर्दीस प्रारंभ केला. सन २०१५-२०१७ या कालावधीत त्यांनी तळोदा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले आहे. सन २०१७ते२०२०  या कालावधीत ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. जून २०२० पासून त्यांनी आजवर जळगाव जिल्हाधिकारी म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण कारकिर्दीचा ठसा उमटविला. स्वच्छता क्षेत्रात सांगली जिल्हा राष्ट्रीय पातळीवर पहिला आल्याबद्दल सन २०२० मध्ये भारत सरकारचा स्वच्छता दर्पण पुरस्काराने ते सन्मानित आहेत. सन २०१७-१८ मध्ये सांगली जिल्हा परिषदेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान देऊन जिल्हा परिषदेला पंचायतराज क्षेत्रात सर्व प्रथम आणले. महाराष्ट्र शासनाचा यशवंत पंचायतराज पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत. सन २०२०-२०२१ व २०२१-२०२२अशी सलग दोन वर्षे अभिजित राऊत यांना माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्

"राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा किनवट येथे उत्साहात " अंगनवाडी सेविका सह अनेक महीलांची उपस्थिती

  ✍🏾राजेश पाटील किनवट नेटवर्क:- शासनामार्फत देण्यात येत असलेल्या सेवा नागरिकांपर्यंत कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी 'सेवा पंधरवाडा' उपक्रम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त सेवा पंधरवाड़ाचे आयोजन करण्यात आले होते माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत हा उपक्रम देखील राबवला यावेळी अगंणवाडी सेवीका , मदतनीस यांना नांदेड जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मा.वर्षा घुगे/ठाकूर मार्गदर्शन केले व महिला बचत गटांच्या महीलांना लाभार्थीनां सहाय दिले या वेळी  आमदार मा.भिमरावजी केराम, मा.सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार, तहसिलदार मा. डॉ.मृणाल जाधव, जि.गटशिक्षणाधिकारी धनवे आदींची प्रमुख उपस्थिती होती  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. या दरम्यान अंगणवाडी सेवीका कार्यकर्ती यांनी पोषण आहार संदर्भात विविध  प्रकारचे स्टॉल लावले होते त्यांची पाहणी मान्यवरांनी केली तसेच बाल बालिकांनी विविध वेशभुषा परीधान केली होती एका चिमुकल्या

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे नवनिर्वाचीत गोकुंदा सरपंच अनुसया सिडाम यांच्या हस्ते उदघाटन

  ( विशाल गिमेकर/ प्रतिनिधी किनवट) माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान आरोग्य विषयक  कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे दिनांक 27 सप्टेंबर 22 रोजी उद्घाटक सन्माननीय लोकनियुक्त  सरपंच सौ.अनुसयाताई संजय सिडाम (ग्राम पंचायत गोकुंदा) व प्रमुख पाहुणे श्री.संजय सिडाम - सदस्य (ग्राम पंचायत गोकुंदा)यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्री व्हि.सी.जाधव सर होते याप्रसंगी डॉ. मगर मॅडम डॉ. जुबेरी सर ,डॉ.तोटावाड सर, डॉ. ढोले सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.श्री व्हि.सी.जाधव सर यांनी केले सूत्रसंचालन श्री.पंकज राठोड समुपदेशक RKSK यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी.  माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान उद्घाटन प्रसंगी बोलताना संतगीले की .घरातील महिला जर सक्षम झाली. तर आपले कुटुंब चांगल्या प्रकारे  आरोग्य संपन ठेवण्यासाठी प्रयत्न करते.म्हणून सर्व मातांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. व आपल्या बरोबर आपल्या घराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी. इन्चार्ज सिस्टर श्रीमती.सु

माहूरला घुमला 'उदे ग अंबे उदे'चा गजर रेणुका मातेचे न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक पुजन

  माहूर, ता. २६ (बातमीदार) शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर सोमवारी (ता. २६) हजारो भाविकांनी श्री रेणुकामातेचे दर्शन 'उदे ग अंबे उदे च्या गजरात घेतले. सकाळी साडेअकरा वाजता श्री अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा पहील्या माळेला सकाळी सहा वाजता पासून श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला व सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील स्थळी किर्तीकरण एच. पुजार हेही याचबरोबर कुमारीकापुजन, सुहासिनीपुजन, प्रथेप्रमाणे गणेशपुजन, कलशपुजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन करण्यात आले. तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदोर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीची कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोताली पाच उसाचे धांडे उभारून आणि त्या अधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी करण्यात आला. घटस्थापने नंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा न्यायाधीश एकनाथ बांगर उपस्थित होते. यांच्या हस्ते आरती

हृदयाची करुणा व मानवी मूल्यांच्या अमल बजावणीचे "तप" प्रजासत्ताक भारतातील सामाजिक, आर्थिक विषमता दूर करेल

  किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम प्रिय सुजान बंधु आणि भगिनिनो सरष्टी च्या सर्व घटकाशी आपला संबंध असल्यामुळे आपण शांततेचे जीवन जगणे यावर विश्वास ठेवतो भारतीय संस्कतीक मूल्य व देशसेवा तसेच देशाचे अखंडत्व अशा विचारांची आपली परंपरा आहे आज आपल्या समोर सदर विषयाच्या अनुषंगाने क्रांतिकारी व  सुयोग्य विचार मांडण्याचा प्रयत्न करित आहे. हे विचार भारताला सार्वभौम राष्ट्र बनण्यासाठी पूरक ठरले तर ते विचार फक्त खारीच्या वाट्या पुरते मर्यादित राहतील हे मात्र निश्चीत. १. *जागतिक महासत्ता:-* माझ्या मित्र व मैत्री निनो आज भारत देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे त्या दिशेने भारताने पाऊस सुद्धा टाकले आहे. परंतु रोग ग्रस्त व्यक्ती जसा ध्येय साध्य करू शकत नाही नाही त्याच प्रमाणे भारत सुधा सामाजिक व आर्थिक विषमता या रोगाने ग्रस्त आहे.  *संयुक्त राष्ट्राचा अहवाल*:-  आशिया प्रशांत क्षेत्रात काम करणा-या संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक ,सामाजिक आयोगाने युनेस्केपने भारतात गरिबीत आणि श्रीमंतीत दरी पडत आहे कारण..  *१) .श्रम बाजार संस्था*  २. मर्यादित सामाजिक सुरक्षा प्रणाली ३. वाईट शिक्षण

शिरपूरच्या ग्राम समृद्धी पॅनलच्या विजया बद्दल उत्साहाचे वातावरण

शिरपूरच्या ग्राम समृद्धी पॅनलच्या विजया बद्दल जल्लोष करतांना ग्रामस्थ किनवट ता. प्र. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिरपुर येथील नवनियुक्त सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याचे  मोठ्या उत्साहात जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले. सरपंच सिताराम गेडाम तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन भुरे, गंगुबाई सुरेशवार, जयशिला सोमावार, कौशल्या आश्रम, भीमराव पोयाम, कृष्णा धुर्वे, अश्विनी किनाके आदींचे अभिनंदन करण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थिती आमदार भीमराव केराम ,शेखररेड्डी एल्टीवार, जगदीशरेड्डी नलमेलवार, सुरेश सावंगेकर,  रमेश सुरेशवार, डॉ. श्रीनिवासरेड्डी एनगुवार, श्रावण मडावी, विजय जाधव ,विलास नासरे, रवी सावंगीकर, प्रविण नोमुलवार प्रा. डॉ. राजू मोतेराव आदींनी शुभकामना दिल्या.

बालाजी सिरसाट यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर

  किनवट प्रतिनिधी किनवट : दै.मराठवाडा नेताचे प्रतिनिधी बालाजी सिरसाट यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल युवराज्य परिवाराकडून दिला जाणारा सन २०२२ साठीच्या "युवा पत्रकार" पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.   नांदेड येथील दै.युवराज्य,न्यूज परिवाराच्या वतीने देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील सन २०२२ मधील उत्कृष्ट कार्याबद्दलचा पत्रकारिता क्षेत्रातील "युवा पत्रकार" पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच बालाजी सिरसाट यांना प्राप्त झाले आहे. दै.युवराज्य "युवा पत्रकार" पुरस्कार सोहळा या आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप हे शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह आणि प्रमाण पत्र हे असणार आहे.      हा पुरस्कार सोहळा दि-२५-सप्टेंबर २०२२ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथे मा.खुशाल सिह परदेशी (जिल्हाधिकारी नांदेड.) मा.भीमाशंकर कापसे (अध्यक्ष आझाद ग्रुप) मा. किरण आंबेकर (तहसीलदार नांदेड) मा.शिवसांभ दापकेकर (सेवानिवृत्त महसूल अधिकारी) मा.व्यंकटेश मुंडे ( तहसीलदार लोहा) मा.अनिरुद्ध काकडे ( पोलीस निरीक्षक) मा. प्रमोद

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी जाहीर

   मारेगाव,यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची मारेगाव तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.    यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी अनंतराव गोवर्धन, मारेगाव तालुका अध्यक्षपदी सचिन मेश्राम तर सचिवपदी कैलास ठेंगणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.    मारेगाव येथील विश्राम गृहात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना भोपळे, मौनोद्दीन सौदागर, जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव तालुका कार्यकारिणी अशी : तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, कार्याध्यक्ष दिपक डोहणे, सचिव कैलास ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे, सहसचिव सुनील उताणे, संघटक रवी घुमे,पंकज नेहारे, कैलास मेश्राम, कोषाध्यक्ष जयप्रकाश वनकर, सुरज झोटींग, प्रसिध्दी प्रमुख संतोष बहादूरे,

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध मान्यवरांचा सन्मान

  जिद्द, मेहनत, चिकाटी, परिश्रमातून समाजकार्याला मिळते प्रेरणा : राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिणीस संजीव भांबोरे यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त पवनी तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा चीचाळ येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणस संजीव भांबोरे बोलत होते. व्यक्तीच्या मनात, जिद्द,मेहनत, चिकाटी, परिश्रम असेल आणि त्यांना सामाजिक कार्याची जाणीव असेल तर तो व्यक्ती खरोखरच जीवनात यशस्वी ठरतो असे प्रतिपादन केले.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चुनीलाल लांजेवार तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच लोकमुद्राताई वैरागडे, माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र बिलवणे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज वैरागडे, ग्रामपंचायत सदस्य निलेश काटेखाये उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यां

सत्यशोधक समाज सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने उद्या व्याख्यानाचे आयोजन

  किनवट दि.२३: सत्यशोधक समाज-शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती,किनवट तर्फे सत्यशोधक समाज सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रबोधन व्याख्यानाचा पहीला कार्यक्रम उद्या(ता.२४) सकाळी १० वाजता एम.के.टी.शैक्षणिक संकूल,कोठारी (चि.ता.किनवट) येथे आयोजन करण्यात आला आहे.    यावेळी प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर व प्रा. डॉ.शाम मुंडे यांचे "सत्यशोधक समाज व सद्यस्थिती", या विषयावर व्याख्यान होईल.अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके या राहतील.कार्यक्रमास शहर व परिसरातील जनतेनी उपस्थित राहावे,असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव संयोजन समितिच्या वतीने करण्यात आले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथील मानव कांबळे हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून तिसरा..

  (किनवट ता. प्र.) औद्योगिक प्रशिक्षण महासंचालनालयाच्या (डीजीटी) वतीने घेण्यात आलेल्या कॉम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटच्या (कोपा) परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आदिवासी) विद्यार्थी मानव रवि कांबळे हा गुणवत्ता यादीत औरंगाबाद विभागातून तिसरा आला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये प्रशिक्षण महासंचालनालयाच्या वतीने क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीमच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत कॉम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (एनएसक्यूएफ -०४) ट्रेडचा विद्यार्थी मानव रवि कांबळे याने ६०० पैकी ५५१ गुण संपादित केले. त्याने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी ९१.८३ टक्के आहे. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून मानव कांबळे हा गुणाक्रमे औरंगाबाद विभागातून तिसरा तर राज्यातून २९ वा आला आहे. या यशाबद्दल मानवचे  औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट चे प्राचार्य  श्री.जी.जी पाटनुरकर, फोरमेन श्री.पोवळे के डब्ल्यू, निदेशक श्री. जाधव एच.टी, बी आर आरेवार ,कोपा निदेशक लक्ष्मीकांत दुथडे, वरिष्ठ लिपिक ए व्ही वारघडे, श्रीमती बावगे मॅडम, सौ धोंगडे मॅडम व इतर क

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन... चिरायू होवो

    "निजाम रझाकार अन् निसर्गाशीही अमुची लढाई  क्रांतिकारी इतिहास अन् पराक्रमी अमुचा बाणा ......  संग्रामवीरांचा आम्हा सदैव अभिमान  राष्ट्रभक्ती, उन्नतीसाठी नेहमीच अमुचा ताठ कणा..." प्रथमतः देशभक्त स्वामी रामानंद तीर्थ हुतात्मा गोविंदराव पानसरे,  रविनारायण रेड्डी, गोविंदभाई थॉफ, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे आदि. मराठवाडा मुक्ती संग्रामातील प्रभावी नेतृत्व अन् ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीसाठी आपले बलिदान दिले अशा सर्व वीरांना मानाचा मुजरा करून... १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला. सारा देश स्वातंत्र्यरुपी गोड फळ चाखत होता. स्वातंत्र्याचा. मुक्तीचा आनंद साजरा होत होता. स्वतंत्र भारताची सुखद स्वप्ने पाहण्यात सारे देशबांधव मग्न होते. .... पण त्याचवेळी मात्र भारतातील ५६५ संस्थांनांपैकी हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ हि ३ संस्थाने मात्र स्वातंत्र्याची वाट पाहत गुलामगिरीचा कडवटपणा अनुभवत होती. स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती. त्यातील हैदराबाद हे क्रूर निजामाच्या राजवटीतील मोठे संस्थान. मराठवाडा हे हैदराबाद स

फॉक्सकॉन भारतात आल्यामुळे चीनची डोकेदुखी वाढणार ?

  सौजन्य- बीबीसी न्युज मराठी: "भारताने सिलिकॉन व्हॅली होण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. भारत आता देशांतर्गत डिजिटल गरजा पूर्ण करेल पण इतर देशांचीही पूर्तता करू शकेल. चीप मागवण्यापासून ते चीप तयार करण्यापर्यंतचा प्रवास आता सुरू झाला आहे." वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मंगळवारी (13 सप्टेंबर) तैवानची कंपनी फॉक्सकॉन बरोबर हा करार केल्यावर हे ट्वीट केलं. अहमदाबादजवळ होणाऱ्या या प्रकल्पात 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यात वेदांताचा वाटा 60 टक्के असेल आणि फॉक्सकॉनचा वाटा 40 टक्के राहील. शरद पवार : 'फॉक्सकॉन तर गेला, आता दुसऱ्या प्रकल्पाचं आश्वासनं देणं म्हणजे...' 'फॉक्सकॉन-वेदांता'चा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रातच, देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या गुंतवणुकीपैकी ही एक आहे. गृहराज्य गुजरातमध्ये होणाऱ्या या प्रकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, "हा सामंजस्य करार म्हणजे भारताच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. 1.54 लाख कोटी रुपयांच्या या

मास्को ( रशिया)शहरात साहीत्य सम्राट लो. अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा १७ सप्टेबंर ला अणावरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अणावरण ....  मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम. जी. डी. ग्रुप ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद रशियातील पुश्किन विद्यापीठ, मास्को येथे सुरू आहे. आज, मंगळवार दि. १४ रोजी रशियात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे दोन पुतळेदेखील उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली. नाशिक: मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम. जी. डी. ग्रुप ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद रशियातील पुश्किन विद्यापीठ, मास्को येथे सुरू आहे. १४ रोजी रशियात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे दोन पुतळेदेखील उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली. या सोहळ्यासाठी देशभरातून ३५० भारतीय रशियातील पुश्किन विद्यापीठात गेले आहेत. नाशिकमधूनही

गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमास हिंगोलीत प्रतिसाद

हिंगोली, ता.१२ (प्रतिनिधी) – विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परंतू जंगल नष्ट करुन होणारा हा विकास कुणालाही परवडणारा नाही. हे खरे असले तरी, हल्ली गुळगुळीत रस्त्यांवरुन चालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे. त्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. आँक्सिजन पुरवणाऱ्या झाडांची लागवड होणे गरजेचे आहे. याच भावनेतून गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.  गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या  वाढदिवसानिमित रविवारी (ता.११) हिंगोली येथे गोदावरी फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करुन वाढदिवस साजरा करण

गोदावरी अर्बन शाखेच्या वतीने शिक्षकांचा सन्मानपत्र व पुष्प देवुन सत्कार

  किनवट:  गोदावरी अर्बन शाखा किनवटच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त   श्री अनिलकुमार येरेकार, श्री सुनिल निकम, सौ कविता  चाडावार आदी शिक्षकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन  शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देण्यांत आल्या. यावेळी शाखेचे  कर्मचारी पि. आर. बेक्कमवार, एस. एस. कटकमवार, जि. ए.  कोरटकर,ए. आर. जोशी, एल. यु. गायकवाड, आर. आर.  दासरवार व खासदार श्री हेमंत पाटील यांचे जनसंपर्क  अधिकारी सुनिल गरड उपस्थित होते.

गणपती बाप्पाचे विसर्जण शांततेत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

  ता. प्र.किनवट: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. या घोषणे सह किनवट येथील गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. या मध्ये विविध गणेश मंडळाचे गणपतीचे विसर्जण करण्यात आले आंचार संहीतामुळे या वेळी डीजेला परवानगी नसल्याने ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती . या वेळी नगर परीषद प्रशासना तर्फे पैनंगंगा नदी काठी गंगापुत्र जीवन रक्षक दलाची व्यवस्था करण्यात आली. या प्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसिलदार डॉ.मृणाल जाधव, उपविभागिय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, पो.नि. अभिमन्यु साळुंके, पो. उ. नि. विनायक पवार स्वतः जाऊन  पाहणी केली विसर्जन ठिकाणच्या परीसराचा आढावा घेेतला . या दरम्यान पवार स्वामी तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी व्यापारी असोसिएशनच्या व्यांपाऱ्यांनी महाप्रसाद वाटप करण्यास सहाय केले. या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,नप उपाध्यक्ष गोपाल व्यंकट नेमानिवार,अजय चाडावार, माजी नप उपाध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार , परीषद स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश नेमानिवार, माजी नगराध्यक्ष साजीद खान, शिवा कॅतमवार, सर्व नगर सेवक, नगर परिष

वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे उपयुक्त आहे- नारायणराव सिडाम

  (शहर प्रतिनिधी: किनवट) वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे उपयुक्त आहे.ग्रंथ हेच माणसाचे गुरु आहेत. जीवनातील अनेक प्रश्नांचे उत्तर हे पुस्तकातून मिळत असते.असे मत स्वंतत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व डॉ एस . आर . रंगनाथन जयंती निमित्त बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित भव्य ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम यांनी व्यक्त केले.      प्रारंभी थोर समाजसुधारक कै. बळीराम पाटील, डॉ .एस.आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमास किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, सचिव शंकरराव चाडावार, कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी, प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर,संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. पुढे बोलतांना नारायणराव सिडाम साहेब म्हणाले की, आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालय हे

समाजाच्या अर्थिक उन्नतीसाठी झटणाऱ्या गोदावरी समुहाचे कार्य प्रेरणादाई -संजय पाचपोर, यांची सहकारसूर्य मुख्यालयास सदिच्छा भेट

नांदेड, ता.८ (प्रतिनिधी) - सहकारी संस्था चालवणे कठीण काम असले तरी, समाज माझा आणि मी समाजाचा आहे. आपण समाजाचे देणे लागतो या उदांत हेतूने सहकारी संस्था स्थापन करणे आणि अल्पावधित त्या संस्थेचा पाच राज्यात विस्तार करणे हे गोदावरी परिवाराने करुन दाखवलेले कार्य सहकारी संस्थाच नव्हे तर प्रत्येकांसाठी प्रेरणादाई कार्य असल्याचे सहकार भारती मुंबईचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी येथे केले. तरोडा नाका , नांदेड परिसरात नव्याने उभारलेल्या गोदावरी अर्बन सहकारसूर्यच्या मुख्यालयास संजय पाचपोर यांनी बुधवारी (ता. सात) भेट दिली. यावेळी संस्थापक तथा हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील आणि संचालक मंडळाच्यावतीने संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. त्या नंतर  तांबेकर यांनी  पाचपोर यांना संस्थेच्या काम काजाविषयी थोडक्यात माहिती दिली व गोदावरी अर्बन संस्थेतील उच्च शिक्षित , अनुभवी, कार्यतत्पर अधिकारी व कर्मचारी यांच्याशी श्री पाचपोर यांनी संवाद साधला व त्यांच्या कामाचे मनापासून कौतुकही केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष

टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे सिरजखोड ता.धर्माबाद येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार

धर्माबाद /सय्यद नदीम टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिरजखोड (मराठी आणि उर्दू माध्यम) येथे आज शिक्षक दिनानिमित्त टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धर्माबाद तालुकाध्यक्ष मिर्झां खुर्रम पटेल,  तालुका उपाध्यक्ष मिर्झां इब्राहिम बेग यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षक दिन कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख अहेमद मिरा साब, शेख नसीम मॅडम, आनलदास एस. वी. मॅडम, गज़ाला जबीन मॅडम, मिर्झां सलीम बेग सर, मोहम्मद सुलतानउद्दीन सर, सज्जन प्रसराम मामा यांच्यासह धर्माबाद पंचायत समितीमधील शिक्षण विभागात विषय तज्ञ म्हणून कार्यरत मनोहर बोपटे सर आणि भत्ते सर यांचा सुद्धा पुष्पहार आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.         याप्रसंगी सिरजखोडचे भूमिपुत्र, या शाळेचे माजी विद्यार्थी, टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की "विद्यार्थ्यांनी खूप-खूप

शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.

  कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा. प्रतिनिधी : मजहर शेख,सारखणी सारखणी,दि,६- शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशे शिक्षणाचे महत्व डॉ. बाबासाहेबांनी सांगितले आहे.दिनांक ५ सप्टेबंर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधुन   कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल येथे शिक्षकदिनानिमित्त या अभिनव उपक्रमात विद्यार्थीच मुख्याध्यापक व शिक्षक होऊन  विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.याप्रसंगी  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .  यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके  तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मिसेवार,बळवंत वाढई ,सय्यद सौरभ उपस्थित होते.या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत  सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी व्यक्त केले .शिक्षकांनी उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचे देखील त्यांनी कौतुक केल . याप्रसंगी विद्यार

आगाखान प्री स्कुल येथे शिक्षक दिन साजरा

  किनवट ता. बातमीदार:- शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशे शिक्षणाचे महत्व डॉ. बाबासाहेबांनी सांगितले आहे. ५ सप्टेबंर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन  आगाखान एज्युकेशन सेंटर किनवट संचलीत आगाखान प्री स्कूल येथे शिक्षक दिन  उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषा परीधान केल्या होत्या तसेच प्रमुख अतिथीनी शिक्षक दिना बद्दल माहीती  सांगीतली  शाळेत सजावट करण्यात आली व विद्यार्थ्यांना खाऊ, अल्पोपहार देण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का पेन्शनवार, संस्थेचे  सचिव करीम जीवाणी, नुरजंहा जीवाणी, मुनीरा जीवाणी, फेरोज हिराणी शिक्षीकावृंद शाहीन चरनीया, शितल गजेन्गीवार, पुजा बंडेवार आदी उपस्थित होते.

शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान

(किनवट ता. प्र.)  कॉस्मोपॉलिटन विद्यालय किनवट येथे सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे वतीने शाळेचे शिक्षक बाळकृष्ण कदम व इंद्रदिप वाघमारे यांचा आदर्श शिक्षक तर उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणून श्री रमेश बारापात्रे सर यांची निवड करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आर व्ही घोरबांड सर , संस्थेचे सचिव मा श्री पी व्ही रामतीर्थकर सर, संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव रामतीर्थकर सर, पर्यवेक्षक श्री बारापात्रे सर, ज्येष्ठ शिक्षक मोहीते सर, माजी पर्यवेक्षक राठोड सर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पुराणिक सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

बळीराम पाटील महाविद्यालयात शिक्षकदिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

  किनवट: दि.5/9/2022 रोजी बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले, याप्रसंगी डॉ. वसंत बामणे यांनी मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व याविषयी माहिती दिली, तसेच शिक्षणतज्ञ माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिवन कार्य याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.किनवट संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्लरावजी राठोड, प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. प्रास्ताविक डॉ. आनंद भालेराव संयोजक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांनी केले व महाविद्यालया बद्दल माहिती दिली,याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना स्पर्धा परीक्षा संबधीत पुस्तके वितरित करण्यात आले,समारोप मार्गदर्शन उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे यांनी केले, संचलन प्रा. संतोष पवार सहसंयोजक यांनी केले तर आभार प्रा. सुलोचना जाधव सहसंयोजक स्पर्धा परीक्षा यांनी मानले, यशस्वीतेसाठी प्रा. दयानंद वाघमारे, प्रा. सतिश मिरासे व शुभम गाजलवार परिश्रम घेतले,कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्म

प्राचीन काळापासून ते आजप्रयंत जातीय कट्टर तेवर उपाय "अंतर जातीय विवाहच मानल्या गेले

  किनवट (तालुका प्रतिनिधी)    जनसामान्य माणसामध्ये विचार स्वातंत्र्य, श्रध्दा स्वातंत्र्य तसेच उपासना स्वातंत्र्य देणारी संस्कृती आपल्यालाच निर्माण करायची आहे त्यामुळेच आजचे विचार पुष्प..  प्राचीन काळी भारतात अस्पृश्यता नव्हती आणि जाती हे कधीही भेदभावाचे कारण नव्हते. हजारो वर्षांचा इतिहास वाचूया. सम्राट शंतनूने कोळ्याची मुलगी सत्यवती हिच्याशी लग्न केले.त्याचा मुलगा राजा झाला त्यामुळे भीष्माने लग्न केले नाही, भीष्माने आयुष्यभर निपुत्रिक राहण्याची शपथ घेतली. सत्यवतीचे पुत्र पुढे क्षत्रिय झाले, ज्यांच्यासाठी भीष्म आयुष्यभर अविवाहित राहिले, त्यांचे शोषण झाले असते का? श्रीकृष्ण हे दूध व्यावसायिकांच्या कुटुंबातील होते. त्यांचा भाऊ बलराम शेती करायचा, नेहमी नांगर सोबत ठेवायचा. यादव हे क्षत्रिय आहेत, अनेक प्रांतांवर राज्य केले आणि श्रीकृष्ण सर्वांसाठी पूज्य आहेत, गीतेसारखा ग्रंथ जगाला दिला. वनवासी निषादराज राम यांच्याकडे गुरुकुलात शिकत असत. त्यांचा मुलगा लव कुश याने वनवासी महर्षि वाल्मिकी यांच्या गुरुकुलात शिक्षण घेतले. त्यामुळे वैदिक काळाची गोष्ट आहे, हे स्पष्ट आहे की कोणीही कोणाचे शोषण केले न

शासकीय आश्रम शाळेत राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा

 शासकीय आश्रम शाळा जलधारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त विविध खेळ घेण्यात आले यांचे काही क्षणचित्र  प्रतिनिधी किनवट :- किनवट तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा जलधारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात आला क्रीडा साहित्याची पूजा करून , मेजर ध्यानचंद यांच्या जीवन व कार्य त्याबद्दल माहिती  देण्यात आली.  सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी मा. किर्ती किरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्याध्यापक पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली विविध स्पर्धा आयोजन करण्यात आल्या कबड्डी कुस्ती कराटे बॉक्सिंग खो-खो त्या प्रसंगी श्री भवरे सर व जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना खेळ व खेळाचे महत्व यांचे मार्गदर्शन केले.  विविध डावपेचांची  माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप प्रल्हाद येशीमोड यांनी दिली  . कार्यक्रमास उपस्थित शिक्षक पाटील मॅम खोकले सर मेश्राम सर आडे सर हनुमाने सर केंद्रे सर मेटकर सर  अधिक्षक सुर्यवंशी , गवले सर लिपीक , सय्यद  व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.

कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेच्या किनवटअध्यक्षपदी प्रा.राजीव राठोड , सचिवपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार

  (किनवट )किनवट तालुका कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.राजीव राठोड , सचिवपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार , उपाध्यक्षपदी डॉ .वसंत राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                                   दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी सरस्वती विद्यामंदिर किनवट येथे तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेची बैठक संपन्न झाला या बैठकीत प्रमुख उपस्थिती म्हणून बळीराम पाटील महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक  विजय खुपसे ,प्रा.अनिल पाटील, प्रा.  रेणुकादास पहुरकर ,मुख्याध्यापक प्रा. घनश्याम राठोड आदींच्या उपस्थितीमध्ये लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .           अध्यक्ष म्हणून सरस्वती महाविद्यालयाचे प्रा.राजीव राठोड उपाध्यक्ष सरस विद्यालय मांडवी चे डॉ.वसंत राठोड, सचिव बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्रा. पुरुषोत्तम येरडलावार ,कोषाध्यक्ष बापूजी पाटील, सहसचिव मुळे बी. एम. ,महिला प्रतिनिधी डॉ रत्ना कोमावार, सदस्य प्रा.सुरेश कावळे,प्रा. एकनाथ पोले, निमंत्रित सदस्य म्हणून प्रा. मंगनाले एस. बी .आदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला उच्च विद्या विभूषित विद