Skip to main content

हृदयाची करुणा व मानवी मूल्यांच्या अमल बजावणीचे "तप" प्रजासत्ताक भारतातील सामाजिक, आर्थिक विषमता दूर करेल

 



किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम प्रिय सुजान बंधु आणि भगिनिनो सरष्टी च्या सर्व घटकाशी आपला संबंध असल्यामुळे आपण शांततेचे जीवन जगणे यावर विश्वास ठेवतो भारतीय संस्कतीक मूल्य व देशसेवा तसेच देशाचे अखंडत्व अशा विचारांची आपली परंपरा आहे आज आपल्या समोर सदर विषयाच्या अनुषंगाने क्रांतिकारी व 

सुयोग्य विचार मांडण्याचा प्रयत्न करित आहे. हे विचार भारताला सार्वभौम राष्ट्र बनण्यासाठी पूरक ठरले तर ते विचार फक्त खारीच्या वाट्या पुरते मर्यादित राहतील हे मात्र निश्चीत.


१. *जागतिक महासत्ता:-* माझ्या मित्र व मैत्री निनो आज भारत देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे त्या दिशेने भारताने पाऊस सुद्धा टाकले आहे. परंतु रोग ग्रस्त व्यक्ती जसा ध्येय साध्य करू शकत नाही नाही त्याच प्रमाणे भारत सुधा सामाजिक व आर्थिक विषमता या रोगाने ग्रस्त आहे.


 *संयुक्त राष्ट्राचा अहवाल*:-  आशिया प्रशांत क्षेत्रात काम करणा-या संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक

,सामाजिक आयोगाने युनेस्केपने भारतात गरिबीत आणि श्रीमंतीत दरी पडत आहे कारण..

 *१) .श्रम बाजार संस्था* 


२. मर्यादित सामाजिक सुरक्षा प्रणाली


३. वाईट शिक्षण (मूलभूत कर्तव्य प्रति प्रामाणिक नसणे.)


४. कर्ज आणि जमिनीचे असमान वाटप


१५. मालमत्तेचे अत्यंतिक केंद्रीकरण हे सांगण्यात आले आहे..


हा अहवाल सत्य मानने म्हणजे बुध्दीचा व पवित्र विचारांचा सुयोग्य वापर करनी होय भारतातील श्रम बाजार संस्था यामध्ये कुणाचे वर्चस्व आहे व ते का आहे? सामाजिक सुरक्षा प्रणालीचा अभाव आहे. व तो का आहे? हे तसेच भारतामध्ये वाईट शिक्षण देण्यात येते व ते का देण्यात येते ? कर्ज व जमिनीचे असमान वाटप आहे. व ते का आहे मालमत्तेचे केंद्रीकरण केल्या जाते. व ते का केल्या जाते. या सर्व बाबीचे मुख्य कारण आपणास इतिहासात स्पष्ट पाहवयास मिळते.


अ. *पार्श्वभूमी*:-  प्राचीन काळापासून धर्म संस्थेचा प्रभाव राजसंस्थेपेक्षा मानवी समुदायावर जास्त  होता म्हणजेच  असे कर्मकांड जे मानवी समुदाय विषम परिस्थिती कडे झुकल्या जाईल अशी परिसथिति निर्माण झाली.  धर्मसंस्थेचा उदेश मानवाला मानवी मूल्यांच्या चौकटीत राहून जीवन जगाव व ईश्वर असे न केल्यास नाराज होऊन श्राप देतो असे मूल्य रुजवणे योग्य होते  परंतू या उदेशापासून धर्मसंस्था वंचित होऊन ईश्वरी सत्तेचे अस्तित्व मान्य करून ईश्वर नावाच्या साध्याकडे जाण्यासाठी विषमता धिष्ठीत समाज निर्माण करून व्यक्तीला किंवा मानवाला गौण स्थान देवून बहुसंख्य मानव जात कशी दुखाच्या सानिध्यात कशी खितपत राहिल, अशी परिस्थीती निर्माण करन्यासाठी धर्मसंस्था झटत राहिली. ईश्वर हा सर्व  मानव जातीच्या कल्याणासाठी आहे हे मूल्य रूजवण्या ऐवजी  ज्यांचे सरासरी प्रमाणा ५ टक्के त्याच्याच सुखासाठी धर्मसंस्था काम करू लागली.मूलभूत कर्तव्य हे प्रामाणिक असावं लागत असे शिक्षण देणे धर्मसंस्था ने देणे बंद केल मानवी समुदायाचा जीवन जगण्याचा उद्देश हा मानवाचे कल्याण असायला पाहिजे हे कुणीच सांगायला तयार नव्हते ईश्वर प्राप्ती हेच साध्य आहे असे रुजविण्यात आले. . परंतु सुयोग्यपणे हे वास्तव सत्य संपूर्ण मानवाच्या समोर आणायची त्याकाळातील समाजविरोधी  समूहाला लाज वाटते कारण ते आळशी आणि संपूर्ण मानवजातीला ते धोकादायक असतात. त्यांनीच निर्माण केलेल्या परिस्थिती मुळे भारतात सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण झाली आहे आणि ती भारताला कशी धोकादायक आहे हे आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही सुजाण आहात भारतात असलेली सामाजिक विषमता कशी मूळ समस्येचे कारण आहे हे आपण पाहू.


३. *वर्णव्यवस्था* :- आदी सनातन काळात वर्ण व्यवस्था नव्हती आळशी व समाज विरोधी लोकांच्या हातात धर्मसंस्था गेल्यावर ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शुद्र असे वर्ण भारतात पडल्या गेले सुरुवातीला कर्मावर आधारित हे वर्ण होते परंतु नंतर घराणेशाही ची कीड लागली म्हणजे कोणत्याही वर्णात जाण्यासाठी त्या वर्णात जन्म घ्यावा लागतो असे प्रथा रूढ परंपरा आळशी ढोंगी मानव समुदायाने पाडली. तेथूनच पवित्र संस्कृती मध्ये विषमता निर्माण होणे सुरू झाले. बरेचदा तसेच वर्ग इतर धर्मातही आहेत. धर्माचा उद्देश ईश्वरप्राप्ती व काही लोकांचा विकास हाच असल्यामुळे तो उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी वर्णधिष्ठीत म्हणजेच विषमताधीष्ठित समाज त्यांनी निर्माण केला आहे. या विषमतेमुळेच भारत समाजवादी राष्ट्र बनू शकत नाही. म्हणजेच भारताला संपूर्ण मानवाचा विकासकरणारा देश असे न होवू देण्यासाठी ईश्वरी जाळ्यात ओढून देऊन आपली पोळी भाजून आपला कायम आळशीपणा आबाधीत ठेवण्याचे काम काही समाजविरोधी घटक करीत आहेत. शुद्र कधी वैश होत नाही. वैश्य कधी क्षेत्रिय होत नाही. क्षत्रिय कधीच ब्राम्हण होत नाही. हे वास्तविक सत्य मान्य केलेही जाऊ शकते. परंतु, त्या वर्गाचा सदस्य होण्यासाठी त्या वर्णात जन्म घ्यावा लागतो म्हणजेच आळशी मानव समूहाने त्याचे कपट करून कट रचला व पवित्र संस्कृती अपवित्र केली तसेच मानवाच्या मूळ कलागुणांना येथे समान संधी नाही. मग भारतात सामाजिक समानता कशी प्रस्थापीत होईल..


४. *धर्मनिरपेक्षेता* :- धर्मनिरपेक्ष (Secular) राज्याचा अर्थ काढण्याचा अधिकार सुध्दा त्या  समाजविरोधी लोकांच्या हातात आहे. त्यांनी सर्व धर्म समभाव अर्थ काढला खरा अर्थ आहे राष्ट्राच्या सेवेसाठी पेटून उठणारे नागरिक असा आहे परंतु चुकीचा अर्थ काढून आळशी समाजविरोधी घटकाने याचा अर्थ सुध्दा ईश्वरप्राप्ती व आळशी व्यक्तीमत्वाचे संरक्षण करणारा काढण्यात आलेला आहे. मग भारतात सामाजिक समता कशी प्रस्थापीत होईल. सामाजिक विषमते मध्येच आर्थिक विषमतेचे मूळ आहे.


 *५. सत्तेचे केंद्रीकरण :-* सामाजिक समता न येवू देण्यासाठी भारतामध्ये राजसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचारसत्ता, न्यायसत्ता, आद्योगिसत्ता या सर्व सत्ता ईश्वरी संकल्पनेच्या खाच्यातून निर्माण केलेल्या बहुतांश आळशी  समाजविरोधी  लोकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळेच भारतामध्ये समान संधी उपलब्ध करुन दिल्या जात नाही त्याचे कारण हे आळशी सांगतात बुध्दीप्रामाण्यवाद बुध्दीच्या जोरावर आम्ही वरिल सत्ता काबीज केले आहे. मग एकीकडे हेच लोक समान संधी नाकारून सामान्य माणसाच्या कलागुणांना म्हणजेच बुध्दीला वरिल सत्ता न प्राप्त होवू देण्यासाठी पावबंद घालतात व आपल्या मुर्ख पणाचे प्रदर्शन करत ते आळशी  बुध्दीप्रामाण्यावादाचे ढोंग करुन वरिल सर्व सत्ता काबीज करतात.


 *६. सामाजिक व आर्थिक विषमता ही भारताला कशी धोका आहे :-* सामाजिक विषमतेमध्येच आर्थिक विषमतेचे गुढ आहे म्हणजेच धर्म नावाच्या संकल्पनेमधून एखादी कमी लोकसंख्या असणा-या समूहाला केंद्रबिंदू मानून बहुसंख्य असलेल्या वेगवेगळया समूहाला संधी नाकारुन त्यांना गुलाम बनवून सामाजिक विषमता प्रस्तापीत करायची व भारतात आर्थिक विषमता कायम ठेवायची हे षड्यंत्र भारताला प्रजासत्ताक लोकशाही राज्य बनू शकत नाही हे आपणाला सांगावेसे वाटते.


विषमता विरहित भारत पाहण्यासाठी समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करावे लागेल म्हणजेच सुपूर्ण मानवाचा विकास करावा लागेल ईश्वरवादाच्या व्यतिरिक्त मानववादाला गुरु मानावे लागेल आतापर्यंतच्या राज्यकर्त्यानी ईश्वरवादाला गुरु व मानववादाला मित्र मानले म्हणजेच फक्त मानववादाला सोबती मानले आहे.


 *७. ईश्वरवादापेक्षा मानवतावाद श्रेष्ठ* :- जर आपणास सामाजिक आर्थिक विषमता भारतातून घालवायची असेल तर मानववादाला गुरु व ईश्वरवादाला सोबती मानावे लागेल. कारण ईश्वरवादामधून विषमता प्रस्थापीत होते तर मानवतावाद (ज्याला आपण आपली मूळ संस्कृती म्हणतो) त्यामधून समताधिष्ठीत समाज निर्माण होतो. विषमताविरहित समाज हे आपले


साध्य असले तर आपली मूळ परंपरा म्हणजेच मानवतावाद साधन असायला पाहीजे.


 *८. सामाजिक विषमता :-* या बाबीच्या कारणाचा आपण ऊहापोह केलेला आहे. सामाजिक विषमतेचे अपत्य म्हणजे आर्थिक विषमता होय. म्हणजेच या बाबीमुळेच भारत आजवर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनू शकले नाही. भारतातील बहुतेक नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले नाही परंतु ते कागदावर दाखवण्यात आले. 

*१. कुटूंब* :- माणूस सर्वप्रथम कुटूंबात जन्माला येतो त्यानुसारच त्याची जडणघडण होते तेव्हा आपण प्रत्येक कुटूंबापर्यंत ईश्वरवादापेक्षा मानवतावाद कसा श्रेष्ठ आहे असे सांगण्यासाठी सतर्क असले पाहीजे. त्या गोष्टीसाठी लागतात सुजाण नागरिक उदाहरणार्थ आपणास ४० वर्षाच्या आत भारतात समता प्रस्थापीत करायची असेल २५ हजार त्यागमयी सुजाण नागरीक कामाला लावावे लागतील. तसेच २० वर्षाच्या आत आपल्याला समता आणायची असेल ५० हजार सुजाण नागरिक स्वय प्रेरणेने कामाला लावावे लागतील आणि पाच वर्षाच्या आत देशाला महासत्ता बनवायची असल्यास 2 लाख प्रशिक्षित त्यागी जीवन धारण केलेले नागरिक कामाला लावावे लागतील


विलास संभाजी सुर्यवंशी

मो 9922910080

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.