Skip to main content

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन... चिरायू होवो

 

 


"निजाम रझाकार अन् निसर्गाशीही अमुची लढाई 

क्रांतिकारी इतिहास अन् पराक्रमी अमुचा बाणा ...... 

संग्रामवीरांचा आम्हा सदैव अभिमान 

राष्ट्रभक्ती, उन्नतीसाठी नेहमीच अमुचा ताठ कणा..."

प्रथमतः देशभक्त स्वामी रामानंद तीर्थ हुतात्मा गोविंदराव पानसरे,  रविनारायण रेड्डी, गोविंदभाई थॉफ, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे आदि. मराठवाडा मुक्ती संग्रामातील प्रभावी नेतृत्व अन् ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीसाठी आपले बलिदान दिले अशा सर्व वीरांना मानाचा मुजरा करून...

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला. सारा देश स्वातंत्र्यरुपी गोड फळ चाखत होता. स्वातंत्र्याचा. मुक्तीचा आनंद साजरा होत होता. स्वतंत्र भारताची सुखद स्वप्ने पाहण्यात सारे देशबांधव मग्न होते.

.... पण त्याचवेळी मात्र भारतातील ५६५ संस्थांनांपैकी हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ हि ३ संस्थाने मात्र स्वातंत्र्याची वाट पाहत गुलामगिरीचा कडवटपणा अनुभवत होती. स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती.

त्यातील हैदराबाद हे क्रूर निजामाच्या राजवटीतील मोठे संस्थान. मराठवाडा हे हैदराबाद संस्थानातील महत्वाचा भाग होता.


"कधी संपेल माझी गुलामगिरी? 

कधी संपेल माझ्यावरील अन्याय? 

कधी संपेल माझे पारतंत्र्य?"


यांसारखे असंख्य प्रश्न मराठवाड्यातील जनता नियतीला विचारत होते.

एकाच भारतमातेची लेकरं.. पण काहींना एक न्याय अन् काहींना वेगळा न्याय का? असा विचार करत मराठवाडा आतुन धगधगत होता, बैचेन झाला होता.

पण हेच प्रश्न, हेच विचार, हेच अन्याय आपल्या क्रांतीकारी | मराठवाड्यातील देशभक्तांना शुरवीरांना झोप येऊ देत नव्हते.

सर्वांच्या एकीने. एकविचाराने अन् एकदिलाने सुरु झाला मराठवाडा मुक्ती संग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण हैदराबाद संस्थान एक झाले. या संग्रामाचा वेग आणि प्रभाव इतका जबरदस्त होता की अवघ्या काही दिवसांत प्रत्येक गावागावात हा वणवा पेटला. असंख्य स्वातंत्र्यवीर | या संग्रामात स्वतःहून सहभागी झाले.

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यपर्वांमधील सर्वांत मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम.

पण अशातच मुक्तीसंग्राम सुरु झालाय हे लक्षात येताच निजामाने अन् त्याचा सेनापती कासीम रझवी यांनी जनतेवर अनन्वित अत्याचार आणखी वाढविले. लोकांना त्रस्त केले. रझाकार नावाच्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाखाली सारा मराठवाडा भरडत होता.

गोविंदराव पानसरे हे या संग्रामातील पहिले हुतात्मा.पण त्यांचे हौतात्म्य मराठवाड्यातील क्रांतिकारकांनी वाया जाऊ दिले नाही. मराठवाडा आणखी वेगाने संघटित झाला. एकीकडे निजाम संस्थान हे वेगळे राष्ट्र करण्याचे स्वप्न बघत होता तर माझी मराठवाड्यातील जनता ही भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न बघत होती. निजामाचे हे नीच स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी संपूर्ण मराठवाडा एक झाला.

निजाम शरण येत नाही उलट जनतेवरील अन्याय आणखीच वाढले हे लक्षात येताच भारताच्या प्रशासनाने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध लष्करी मोहिम सुरु केली. तिचे नाव होते पोलीस अँक्शन.

१३ सप्टेंबरला वायव्य दिशेने औरंगाबादमधून, पश्चिम दिशेने सोलापूरहून, ईशान्य दिशेने आदिलाबादहून, दक्षिण दिशेने कुर्नानुलहून आणि आग्नेय दिशेने विजयवाडाहून अशा ५ दिशांनी हैदराबाद संस्थानात सैनिकांच्या ५ तुकड्यांनी प्रवेश केला. आणि अवघ्या ५ दिवसांत म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामशाहीचा अंत केला. निजामाला संस्थानातून हद्दपार केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला.

मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाच्या अधु-या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला.

मुंबई राज्याचा आणि नंतर महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मराठवाड्याला महत्त्व प्राप्त झाले.

किती मोठा संग्राम किती महान क्रांतिकारकांची बलिदाने, किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास.

हे सारे कशासाठी? 

तर महान भारताच्या अखंडत्वासाठी....

निसर्गाने स्वातंत्र्य देताना ११ महिन्यांचा अन्याय केलाच पण सातत्याने दुष्काळसदृश्य भौगोलिक परिस्थिती देऊन सदैव अन्याय करतच आहे पण मराठवाडा क्रांतिकारी इतिहासाची ऊर्जा घेत, आलेल्या समस्यांना सामोरे जात ताठ मानेने जगत आहे. मराठवाड्याने देशाला क्रांतिकारी इतिहास दिला. विविध राजकीय नेतृत्व  देऊन राज्याला अन् देशाला राजकीयदृष्ट्या समर्थ बनविले.

औरंगाबादमधील प्रसिद्ध लेण्या, बीडमधील ज्योतिर्लिंग, मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी आंबेजोगाई, नांदेडमधील भव्यदिव्य गुरुद्वारा, लातुरमधील ऐतिहासिक गंजगोलाई अन हिंगोलीमधील औंढा नागनाथ देवस्थान आदि वास्तू देशाच्या सौदर्यात भर टाकत आहेत.

भविष्यात आपल्या मराठवाड्याला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, कृषी अन राजकीय क्षेत्रात आणखी प्रगत करण्यासाठी आपण एक होऊया. प्रयत्न करुया आणि भारताच्या अखंडत्वासाठी लढलो आता महासत्ता बनविण्यासाठी लढूया.



 सौ.रूचिरा बेटकर नांदेड

9970774211

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...