Skip to main content

समाजाच्या अर्थिक उन्नतीसाठी झटणाऱ्या गोदावरी समुहाचे कार्य प्रेरणादाई -संजय पाचपोर, यांची सहकारसूर्य मुख्यालयास सदिच्छा भेट



नांदेड, ता.८ (प्रतिनिधी) - सहकारी संस्था चालवणे कठीण काम असले तरी, समाज माझा आणि मी समाजाचा आहे. आपण समाजाचे देणे लागतो या उदांत हेतूने सहकारी संस्था स्थापन करणे आणि अल्पावधित त्या संस्थेचा पाच राज्यात विस्तार करणे हे गोदावरी परिवाराने करुन दाखवलेले कार्य सहकारी संस्थाच नव्हे तर प्रत्येकांसाठी प्रेरणादाई कार्य असल्याचे सहकार भारती मुंबईचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी येथे केले.

तरोडा नाका , नांदेड परिसरात नव्याने उभारलेल्या गोदावरी अर्बन सहकारसूर्यच्या मुख्यालयास संजय पाचपोर यांनी बुधवारी (ता. सात) भेट दिली. यावेळी संस्थापक तथा हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील आणि संचालक मंडळाच्यावतीने संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. त्या नंतर  तांबेकर यांनी  पाचपोर यांना संस्थेच्या काम काजाविषयी थोडक्यात माहिती दिली व गोदावरी अर्बन संस्थेतील उच्च शिक्षित , अनुभवी, कार्यतत्पर अधिकारी व कर्मचारी यांच्याशी श्री पाचपोर यांनी संवाद साधला व त्यांच्या कामाचे मनापासून कौतुकही केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष किशनराव वाडीकर, तेलंगणा व आंध्रप्रदेश सहकार भारतीटे प्रदेश संघटनमंत्री प्रवीण गायकवाड, गंगाधर कोलमवार, नागरी सहकारी बँकेचे संचालक तथा सहकार भारती विभाग प्रमुख रमेश शिंदे  ,  श्री गुरुजी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी भास्कार डोईबळे यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना श्री पाचपोर म्हणाले की, समाजाच्या अर्थिक उन्नतीसाठी मराठवाड्यातील गोदावरी अर्बन सारखी संस्था जेव्हा कार्य करते हे सहकार क्षेत्रातील प्रेरणादाई व सहकारप्रवृती उभारी देणारे पाऊल असल्याची गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्यच्या मुख्यालयास भेट दिल्याने अनुभुती आली असल्याची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली. श्री पाचपोर यांनी दिली व गोदावरीचा हा प्रवास पाच राज्यापुरता मर्यादित न राहता तो देशभरात विस्तार व्हावा अशा त्यांनी गोदावरी अर्बन संस्थेस शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी गोदावरी अर्बनचे मुख्यालय प्रिंसिपल मॅनेजर विजय शिरमेवार, मुख्य शाखेचे व्यवस्थापक अविनाश बोचरे, वितरण व्यवस्थापक महेश केंद्रे, लेखा व्यवस्थापक प्रशांत कदम, प्रशासन व्यवस्थापक गोपाल जाधव, यांच्यासह गोदावरी अर्बनच्या मुख्यालयातील व मुख्य शाखेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.