(किनवट ता. प्र.)
कॉस्मोपॉलिटन विद्यालय किनवट येथे सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे वतीने शाळेचे शिक्षक बाळकृष्ण कदम व इंद्रदिप वाघमारे यांचा आदर्श शिक्षक तर उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणून श्री रमेश बारापात्रे सर यांची निवड करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आर व्ही घोरबांड सर , संस्थेचे सचिव मा श्री पी व्ही रामतीर्थकर सर, संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव रामतीर्थकर सर, पर्यवेक्षक श्री बारापात्रे सर, ज्येष्ठ शिक्षक मोहीते सर, माजी पर्यवेक्षक राठोड सर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पुराणिक सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment