( विशाल गिमेकर/ प्रतिनिधी किनवट)
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान आरोग्य विषयक कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे दिनांक 27 सप्टेंबर 22 रोजी उद्घाटक सन्माननीय लोकनियुक्त सरपंच सौ.अनुसयाताई संजय सिडाम (ग्राम पंचायत गोकुंदा) व प्रमुख पाहुणे श्री.संजय सिडाम - सदस्य (ग्राम पंचायत गोकुंदा)यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्री व्हि.सी.जाधव सर होते याप्रसंगी डॉ. मगर मॅडम डॉ. जुबेरी सर ,डॉ.तोटावाड सर, डॉ. ढोले सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.श्री व्हि.सी.जाधव सर यांनी केले सूत्रसंचालन श्री.पंकज राठोड समुपदेशक RKSK यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान उद्घाटन प्रसंगी बोलताना संतगीले की .घरातील महिला जर सक्षम झाली. तर आपले कुटुंब चांगल्या प्रकारे आरोग्य संपन ठेवण्यासाठी प्रयत्न करते.म्हणून सर्व मातांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. व आपल्या बरोबर आपल्या घराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी. इन्चार्ज सिस्टर श्रीमती.सुनंदा कांबळे यांनी प्रयत्न केले. आभार प्रदर्शन श्रीमती. योजना पेंदोर सिस्टर यांनी केले . सर्व विभाग प्रमुख तसेच उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा सर्व अधिकारी व कर्मचारी स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment