Skip to main content

बालाजी सिरसाट यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर

 


किनवट प्रतिनिधी

किनवट : दै.मराठवाडा नेताचे प्रतिनिधी बालाजी सिरसाट यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल युवराज्य परिवाराकडून दिला जाणारा सन २०२२ साठीच्या "युवा पत्रकार" पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.  

नांदेड येथील दै.युवराज्य,न्यूज परिवाराच्या वतीने देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील सन २०२२ मधील उत्कृष्ट कार्याबद्दलचा पत्रकारिता क्षेत्रातील "युवा पत्रकार" पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच बालाजी सिरसाट यांना प्राप्त झाले आहे. दै.युवराज्य "युवा पत्रकार" पुरस्कार सोहळा या आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप हे शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह आणि प्रमाण पत्र हे असणार आहे.

     हा पुरस्कार सोहळा दि-२५-सप्टेंबर २०२२ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथे मा.खुशाल सिह परदेशी (जिल्हाधिकारी नांदेड.) मा.भीमाशंकर कापसे (अध्यक्ष आझाद ग्रुप) मा. किरण आंबेकर (तहसीलदार नांदेड) मा.शिवसांभ दापकेकर (सेवानिवृत्त महसूल अधिकारी) मा.व्यंकटेश मुंडे ( तहसीलदार लोहा) मा.अनिरुद्ध काकडे ( पोलीस निरीक्षक) मा. प्रमोद टारपे (उपाध्यक्ष आझाद ग्रुप) मा.अजित पाटील (संपादक दै युवराज्य न्यूज नांदेड ) मा.गणेश शिंदे (आवृत्ती संपादक दै. युवराज्य नांदेड) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा नांदेड येथील गणराज पँलेस नमस्कार चौक येथ संपन्न होणार आहे.

    बालाजी सिरसाट यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वच क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते