Skip to main content

वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे उपयुक्त आहे- नारायणराव सिडाम

 



(शहर प्रतिनिधी: किनवट)

वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे उपयुक्त आहे.ग्रंथ हेच माणसाचे गुरु आहेत. जीवनातील अनेक प्रश्नांचे उत्तर हे पुस्तकातून मिळत असते.असे मत स्वंतत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व डॉ एस . आर . रंगनाथन जयंती निमित्त बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित भव्य ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम यांनी व्यक्त केले. 

    प्रारंभी थोर समाजसुधारक कै. बळीराम पाटील, डॉ .एस.आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमास किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, सचिव शंकरराव चाडावार, कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी, प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर,संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती.


हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. पुढे बोलतांना नारायणराव सिडाम साहेब म्हणाले की, आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालय हे समृद्ध आहे.स्वतंत्र भारतातील क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारीत विविध प्रसिद्ध लेखकांची महत्वपूर्ण ग्रंथ उपलब्ध आहेत.भारतीय संविधानाची मूळ प्रत ही ग्रंथालयात उपलब्ध आहे. 

कथा, कविता, कादंबरी, संशोधनात्म, वैचारिक पुस्तके,कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनाचे दालन खुले करणारे आहे.अत्यंत मोकळे व प्रशंसनीय वाचनकक्ष आहे. नियमित वर्तमान पत्र येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज भरविलेले हे ग्रंथ प्रदर्शन वाचन संस्कृतीला वृध्दिंगत करण्यासाठी महत्वाचे आहे.असे मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ .एस .आर.रंगनाथन यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे 'जाणीवा ' भित्तीपत्रकांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आम्रपाली हटकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल मंदाकिनी राठोड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जी.बी.लांब,डाॅ.आनंद भालेराव, प्रा. किशन मिराशे, महाविद्यालयातीलअमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. ममता जोनपेल्लीवार  डॉ. सुरेंद्र शिंदे, डॉ. रत्ना कोमावार, प्रा. विजय खूपसे, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ. शुभांगी दिवे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.सुलोचना जाधव, डॉ. रचना हिपळगावकर, डॉ. स्वाती कुरमे,डाॅ.श्रीनिवास रेड्डी, डाॅ.विजया खामनकर, प्रा. दयानंद वाघमारे, प्रा . सतिश मिराशे 'प्रा. अजय पाटील, दीपक खंदारे, मिलिंद लाकडे, गौरव पवार, काशिनाथ पिंपरे, एन. जी. पवार,राजू पुठ्ठावार,सुधीर पाटील आदि. परिश्रम घेतले. आभार ग्रंथपाल मंदाकिनी राठोड यांनी मानले. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...