"राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा किनवट येथे उत्साहात " अंगनवाडी सेविका सह अनेक महीलांची उपस्थिती
✍🏾राजेश पाटील
किनवट नेटवर्क:-
शासनामार्फत देण्यात येत असलेल्या सेवा नागरिकांपर्यंत कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी 'सेवा पंधरवाडा' उपक्रम राबविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त सेवा पंधरवाड़ाचे आयोजन करण्यात आले होते माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत हा उपक्रम देखील राबवला यावेळी अगंणवाडी सेवीका , मदतनीस यांना नांदेड जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मा.वर्षा घुगे/ठाकूर मार्गदर्शन केले व महिला बचत गटांच्या महीलांना लाभार्थीनां सहाय दिले
या वेळी आमदार मा.भिमरावजी केराम, मा.सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार, तहसिलदार मा. डॉ.मृणाल जाधव, जि.गटशिक्षणाधिकारी धनवे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.
या दरम्यान अंगणवाडी सेवीका कार्यकर्ती यांनी पोषण आहार संदर्भात विविध प्रकारचे स्टॉल लावले होते त्यांची पाहणी मान्यवरांनी केली तसेच बाल बालिकांनी विविध वेशभुषा परीधान केली होती एका चिमुकल्यांनी जिप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे , व सहा. जिल्हाधीकारी पुजार, आमदार केराम यांचे लक्ष वेधले त्याचे कौतुक व लाड केले.
Comments
Post a Comment