Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा; पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला सल्ला

  आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा; पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला सल्ला राज्यात लॉकडाऊन करण्याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच खटके उडत असताना आता काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण  यांनी मोठं विधान केलं आहे. "आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा", असा सल्ला  पृथ्वीराज चव्हाण  यांनी राज्य सरकारला दिला आहे. चव्हाण यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढून लॉकडाऊन करण्याआधी राज्य सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत.  "राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत.  महाराष्ट्रात  उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांड

या पुढे लॉकडाऊन नको- माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार

ता. प्र.किनवट:- किनवट नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजप शहराराध्यक्ष यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन शासन व प्रशासनाला विनंती केली आहे त्यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले कि गेल्या वर्षी जनतेला कोव्हिड बद्दल माहिती नव्हती तेव्हां काटेकोर पणे अमलबजावणी झाली WHOने सुध्दा सांगीतल की आपल्याला कोरोना सोबतच जगाव लागेल आता या वर्षी जनता नागरिक सज्ञान झाली आहे त्यांना कोव्हीड चे सर्व  नियम माहीत झाले लोक आता मास्क वापरत आहे, लोकात जागृती झाली आहे तसेच आता कोव्हीडची लस उपलब्ध झाली आहे त्यामुळे हातावर पोट असणारे , अनेकांचा रोजगार बुडत आहे, छोटे मोठे व्यापारी, दुकानदार, गरीब जनता जनार्दन यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही त्या पेक्षा निर्बंध बरा असा संदेश प्रभाग २चे नगर सेवक व माजी उपनगराध्यक्ष यांनी या सुचना केल्या आहे

लॉकडाऊन आणि हातावर पोट असणाऱ्यांची कैफियत

   (ता. प्र. किनवट) लॉकडाऊन वृतांत : एकीकडे कोव्हीड १९साठी जिल्हाधिकाऱ्यांचे  लॉकडाऊन आणि दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांची दुर्दशा हे डोळ्यांनी बघवत नाही जिल्हाधिकारी आदेशा प्रमाणे २४ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले त्याच आदेशाचे पालन म्हणुन नांदेड पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे पंरतु या लॉकडाऊन दरम्यान जे हातावर पोट असणारे छोटे व्यापारी आहे जसे की फळ विक्रेते, हमाल,रीक्षावाले, लाकडाची मोळी विकणारे, बटाने-खरमुरे विकणारे, चहा टपरीवाले, भंगार विकणारे, ऐवढेच काय तर भिक मागणारे मुल भीक्षेकरी सुध्दा या परीस्थीत भीक कसे बसे मागतांना दिसत आहे आणि किनवट मध्ये  बाहेर जिल्ह्यातुन उदरनिर्वाहासाठी  नुकतेच मीनाबाजार आले पंरतु त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनीं संवाद साधल असता खुप बिकट परीस्थीती चालु आहे आमचा परिवार खुप मोठा आहे आम्ही लॉकडाऊनच्या आधी फक्त चार दिवस मिनाबाजार सुरु केला पण सर्व आता ठप्प झाले पोटाचा प्रश्न अवघड झाला बघुया आता ४ एप्रिल नंतर प्रार्थना करतो की लवकरच सर्व काही सुरळीत होईल  अशी आशादायक  प्रतिक्रीया मिना बाजारच्या सदस्यांनी दिली

अमृत आहार योजनेचे वाटप बचत गटाच्या हाती दिल्याने महिला लाभार्थी समाधानी ... विविध स्तरातुन सकारात्मक प्रतिक्रिया

   (ता. प्र. किनवट):-   एकात्मीक बाल विकास बचत गटाच्या मार्फत केला जाणारा आहार सकस व उत्तम दर्जाचं आहे असं लाभार्थी कडून सांगितले जात आहे. सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका मार्फत  डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा  बचत गटाच्या मार्फत केला जाणारा आहार सकस व उत्तम दर्जाचं आहे असं लाभार्थी कडून सांगितले जात आहे. होणारा पुरवठा हा स्थानिक महिला बचत गटांमार्फत सुरु करावा असा आदेश दिला होता.  या आदेशाने महिला बचत गटांतील महिलांना हाताला काम मिळाले व सर्व महिला व्यवसायिक बचत गटाच्या मार्फत केला जाणारा आहार सकस व उत्तम दर्जाचं आहे असं लाभार्थी कडून सांगितले जात आहे. दृष्ट्या सक्षम झाल्यात व स्वताच्या पायावर उभ्या झाल्या यांमुळे या आदेशाचे बचत गटांकडुन व सर्व महिलांकडून आभार व्यक्त केले जात आहे. सर्व महिलामधून या आदेशाचे स्वागत होत आहेत. जेंव्हापासून अमृत आहार योजनेचे वाटप हे महिला बचत गटांमार्फत करण्यात येत आहे. तेव्हापासून अमृत आहार योजनेचे लाभार्थी अमृत आहार योजनेचा आहार हा अत्यंत उत्कृष्ट व उत्तम आहे अशा तोंडी व लेखी प्रतिक्रीया देत आहेत. अशी माहिती महिला बचत गटांतील महिलांनी दिली

दरसांगवी येथील गावठाण डिपी गेल्या दोन वर्षापासुन नादुरुस्त गावकरी संतापले

  (प्रतिनिधी दरसांगवी):- किनवट तालुक्यातील दर सांगवी येथील डीपी बंद केल्यामुळे गावातील लोकांना कित्येक वेळास अंधार भोगावा लागला  असल्यामुळे महावितरण चे कर्मचारी दरसांगवी( ची ) गावासोबत वेळो वेळी लपंडाव चालू आहे उपविभागीय अभियंता महावितरण किनवट यांना लेखी अर्ज केला दि. ०७/१२/२०२० रोजी  वारंवार गावकऱ्यांना त्रास होत असल्यामुळे अहो रात्री डीपीवर सतत जाळ होत आसल्या मुळे रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांना डीपी जवळ येऊन फ्युज गेलेला टाकावे लागत असल्यामुळे जर दुर्दैवाने त्या ठिकाणी करंट लागून कोणाचाही म्रुत्यू होऊ शकतो  त्याला फक्त महावितरण जबाबदार राहील पण यावर हावितरण कानाडोळा करते वेळो वेळी अधिकार्‍यांना फोन करून गावकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असताना उडवाउडवीची उत्तरे देत अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला दरसांगवी (ची )या गावांमध्ये 95 टक्के गावात मीटर प्रत्येक घरोघर आहे गावातील मीटर संख्या जास्त असल्यामुळे एकाच डीपीवर जास्त लोड पडत असल्यामुळे गावातल्या गावकऱ्यांना हा त्रास भोगावा लागत आहे मात्र गावासाठी दोन डीपी असताना दोन वर्षापासून एक डीपी बंद आहे दरसांगवी ग्रामपंचायत मध्ये पुन्हा डीपी बदल ठराव

लॉक डाऊनची बिकट परीस्थीती लक्षात घेऊन न.प. ने नळ टॅक्स व घर टॅक्स माफ करावा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

ता. प्र.किनवट:- लॉकडाऊन मुळे सामान्य व मध्य वर्गीय कुटुंब यांचा जगण्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न फार गंभीर बनला आहे कोव्हीड१९च्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या सालापासुन ग्रामिण तसेच शहरी भागाचे चित्र बदलले आहे . हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला काम केल्याशिवाय त्यांचे घर चालत नाही त्यातच नगर पालीकेने मार्च एन्डीगंच्या नावाने सक्तीची वसुली सुरू केली आहे . यामुळे गोर गरीब व मध्यवर्गीय कुटुंबाने जगावे कि मरावे हा सवाल त्यांच्या समोर उभा टाकला आहे. सध्या या कोरोना मुळे सर्व शहर आर्थीक संकटाचा सामना करत आहे या पासुन जनतेला दिलासा मिळावा या करीता महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने माजी ता. अ. नितीन मोहरे, शहराध्यक्ष अनिल इरावार, ता. अ.रोहीत भिसे, प्रसाद भंडारे, नागेश मंत्रीवार, शहर सचिव गणेश करणेवार यांनी किनवट न .प. मुख्याधिकारी यांच्याकडे हे  निवेदन सोपवले व विनंती केली आहे.

सा.बा. उपविभाग कार्यालयात दोन विश्रामगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे

  (किनवट ता. प्र.) सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय किनवट मध्ये दोन विश्रामगृह कक्षांचे काम चालू आहे जे की अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून ज्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी घडण्याची शक्यता आहे. एका बाजूच्या कक्षाला वरती लोखंडी गजाळी लावून पडदी केली जात आहे,तर दुसर्‍या बाजूला सिमेंटच्या विटा लावून भिंत केली जात आहे ज्यामुळे एकाच कामांमध्ये हे दोन प्रकारचे  काम कसे केले जात आहे हे न उलगडणारे कोडे आहे. सदरील कामावरती नदीतील रेती न वापरता नागपूर विदर्भामध्ये मिळणारी कृत्रिम रेती वापर करून कामाचा धडाका संबंधित गुत्तेदारने लावला आहे त्यामुळे सदरील काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदरील कामाची चौकशी करून तात्काळ सदरील काम थांबवत सदरील काम  गुत्तेदार कडून काढून घेऊन पुन्हा नव्याने चांगल्या शासकीय गुत्तेदार कडून करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शोकात यांनी  नांदेडचे विभागीय सर्कल अभियंता अविनाश धोंडगे यांच्याकडे केली आहे. साधारणत एक कोटी सत्तर लक्ष रुपयांचे अनुदान असणाऱ्या या कामाला ई टेंडर प्रक्रिया लागण्या आधीच या गुत्तेदारने काम सुरु करत ई टेंडर प्रक्रियेला हरताळ फासली आहे. हा गु

किनवट सा.बा.उपअभियंता बोबडे यांना माहिती आयुक्तांनी लावला 15 हजारांचा दंड..!

  (किनवट ता. प्र.): शासनाचा महत्वकांक्षी कायदा असणाऱ्या माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किनवट सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उपविभागीय अभियंता बोबडे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांचा तीन प्रकरणांत माहिती आयुक्तांनी प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण तीन प्रकरणांत 15 हजारांचा दंड लावला आहे आणि दंडाची शिक्षा शास्ती करुन वसूल करण्यासाठी सर्कल अभियंता अविनाश धोंडगे नांदेड यांना आदेशित केले आहे.   महाराष्ट्र शासनाने त्यांचा कारभार कसा पारदर्शक आहे हे दाखवण्यासाठी सन 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा बनवत खऱ्या अर्थाने जनतेला सत्तेची चावी हाथी देतं प्रशासनावर वचक ठेवण्याची व्यवस्था निर्माण करून दिली आहे. त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यानंतर खुद्द केंद्र सरकारने या कायद्याची दखल घेत याला केंद्रीय कायद्याच्या स्वरूपात लागु केले आहे. आज रोजी या कायद्यामुळे मोठ मोठी प्रकरणे बाहेर निघाली आहेत. खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद या कायद्यामुळे गेलं होतं. त्यामुळे आपला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी सर्वच अधिकारी माहिती अधिकार काय

इस्लाम समाजाच्या कुराण धर्मग्रंथाबद्दल अपशब्द काढणाऱ्या रिजवी वर कार्यवाहीची मागणी : टिपू सुलतान ब्रिगेड किनवट

ता. प्र.किनवट: देश आधीच कोरोना महामारीत आरोग्य, बेरोजगारी, उपासमारी आणि  अर्थिक संकटांचा सामना करीत असताना जाणीव पूर्वक देशात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने धार्मिक द्वेष पसरवणारे कृत्य करणाऱ्या वसीम रिजवी या समाज कंटका विरूद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या मार्गदर्शनानुसार टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका शाखेच्यावतीने उप विभागीय अधिकारी, किनवट आणि कदीम पोलीस ठाणे, किनवट अशा दोन ठिकाणी दाखल करण्यात आली. वसीम रिजवी या समाज कंटकाने इस्लामी धर्मग्रंथ कुराणातील 26 आयाती कमी करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, तसेच इंडिया टि. व्ही.  ला मुलाखत देताना कुराणाचा संबंध आतंकवादाशी जोडून कुराणामुळे मुस्लिम युवक आतंकवादाकडे वळत आहेत अशा बिन बुडाचे आरोप केले आहेत. यामुळे समस्त भारतीय मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच मुस्लिमेत्तर समाज बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचे कार्य जाणीवपूर्वक करण्यात आले आहे.          टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे जनतेला आवाहन

महाराष्ट्राचे प्रसिध्द कवि,गझलकार, उत्कृष्ट चित्रकार प्रा. संजय बामणीकर यांचे दु:खद निधन

  ता. प्र.किनवट: महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवि, गझलकार, चित्रकार श्री संजय बामणीकर, नांदेड या़चे आज दिनांक २१/०३/२०२१ रोजी द:खद निधन झाले आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ५३ वर्ष होते.ते महाराष्ट्रात एक प्रसिद्ध कवि, गझलकार, चित्रकार,समिक्षक म्हणून प्रसिद्ध होते.संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या गझलेचा,चित्रकलेचा विशिष्ट चाहता वर्ग होता.ते फाईन आर्ट मध्ये स्नातक होते.ते उध्याचा मराठवाडा व इतर वर्तमानपत्रातून महाराष्ट्रातील उत्कृष्ट गझलकारांच्या गझलांचा परिचय करुन देणारे समिक्षणात्मक लेख लिहायचे.चित्रकला व गझल देखणा संदर्भात त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकां मधून प्रकाशित होत असायचे.त्यांचा एक कविता संग्रह "आता बस झाले" हा प्रकाशीत झालेला होता ते अविवाहीत ब्रम्हचारी होते.            एक हळव्या मनाचा कवि, चित्रकार मित्र काळाने हिरावून नेल्या मुळे त्यांचा संपूर्ण चाहता वर्ग,मित्र परिवार द:ख सागरात बुडालेला आहे.               राहसाल तूम्ही आम्हाला तुमच्या गझलेतून वारंवार, तुमच्या स्मृतिंना सलाम,मानाचा मुजरा, भावपूर्ण श्रद्धांजली."         

किनवट न.प.कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांची शिवा क्यातमवार यांच्या विरोधात तक्रार

  ता. प्र.किनवट:- किनवट नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक  व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांनी  नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार  यांचे पती शिवा क्यातमवार यांच्या हे नियमबाह्य कामे करण्या करिता दबाव टाकत असुन त्याकरीता मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मा.मुख्याधिकारी एन. सुंकेवार यांच्याकडे  केली आहे . वार्ड क्र.३मधुन निवडुन आलेल्या नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार हे नियमबाह्य कामे करण्यास दबाव आणत आहेत त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा लेखणी बंद आदोंलन  असे पत्रव्यवहार प्रभारी कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे सादर केल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे दि.१४ मार्च रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाला धुडकाऊन  काही दिवसापुर्वी एका व्यक्तीचे अपघाती निधन झाले त्यांचे १०मुळ प्रमाणपत्र द्या अशी मागणी श्रीमती  क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार का. अ. सी. दुधारे यांना या बाबत दबाव आणत होते . महिला आरक्षणावर एखादी महिला प्रतीनिधी निवडुण येते मात्र त्यांचा व्यवहार हे त्यांचे पतीच पाहतात एकीकडे शासन महिल

ऑल इंडिया पँथरचे जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेण्याबाबत निवेदन

नांदेड जिल्हा प्रतिनीधी:- महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करतात व परीक्षेची वाट बघतात पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे व कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करत परीक्षेची तारीख ढकलण्यात येते व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या मनाचे खच्चीकरण होते तसेच त्यांचा मानसीक ताण वाढतो याचा विपरीत परीणाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन सध्या अनेक विद्यार्थी धार्जिण संघठना महाराष्ट्रात आदोंलन करत आहे या आंदोलनात ऑल इंडीया पॅंथर सेना देखील काम करता आहे व विद्यार्थ्यानां न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे म्हणुन लोकसेवा आयोगाची परीक्षा तात्कळ घेऊन विद्यार्थ्यांची नाराजी दूर व्हावी हा प्रयत्न आहे या करीत नादेंड जिल्हाधिकारी साहेब नांदेड कार्यलयास ऑल इंडीया पॅंथर सेनेच्या वतीने दि. १२ मार्च ला निवेदन देण्यात आले निवेदनावर  ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे , विद्यार्थी  आघाडी जिल्हाध्यक्ष संदेश शेळके, महेंद्र शिंदे, शिवराज कांबळे,   ग्यानोजी निवडगे  निवेदनावर आदी च्या सह्या आहेत लवकरच प्रश्न मार्गी न लावल्यास ऑल इंडीया पँथर

शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे बेल्ट एग्जाम व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले

  तालुका प्रतिनीधी किनवट:- शोटोकान  कराटे  डो असोसिएशन या कराटे प्रशिक्षण केंद्रात एकुण दिडशे ते दोनशे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत शोटोकान  असोसिएशन तर्फे अनेक विद्यार्थी कराटे स्पर्धेत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरा पर्यंत विद्यार्थ्यांनी मजल मारली आहे या मुळे असोसिएशनचे नाव लौकीक आहे नुकतेच विद्यार्थ्यांची परीक्षा पैनगंगा अभयारण्य या निसर्गाच्या सानिध्यात घेण्यात आली  या मध्ये  यल्लोबेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्लु बेल्ट व ब्लॅक बेल्टचे वाटप करण्यात आले तसेच पारंगत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले यावेळी शोटोकान  कराटे डो, असोसिएशनचे प्रमुख सेन्साई संदीप यशीमोड, कोच सचिन राठोड,सहाय्यक मारोती यशीमोड, दिपक पालकर, किरण दरडे, गोदावरी यशीमोड, रोमा गादेकर स्टुडंट्स ओजस्वी मुंडे, शिवांश मेंडके, शर्वरी पत्की, संस्कृती सुंकरवार, किट्टु सुंकरवार, निर्भया मुंडे, पिहु राठोड, भक्ती कोरडे, मोक्ष नेम्मानिवार, खुशी लाखकर, कनिष्का चिल्लावार, याना जाधव, प्राचीका कटारे, निल ठमके,साईनाथ पवार दर्शन चव्हाण,आर्यन मोहरे अभिमनू राठोड ओवी पत्की, रुषी बोईनवाड, शिवसिद्धी चव्हाण आदी कराटे प्रशिक्षणार्थी

संथागार येथे आंतरजातीय मंगल परिणय संपन्न ... दोन जिवांचे जिवन झाले सुखी

ता. प्र.किनवट:-ता.११ मार्च किनवट येथील संथागार वृध्दाश्रमात निराधारांसाठी आधार बनलेले एक मायेची सावली देणारे वृक्ष ठरले आहे इथे वृध्दानां तर आश्रय मिळतोच  व शहरातील वेगवेगळ्या दानी वृत्तीच्या लोकांकडुन मदत मिळते तसेच अनेक जन आपला वाढदिवस , वर्धापन दिन, महापरुषाची जंयती येथे मोठ्या मनाने व आपुलकीने साजरा करतात तसेच पुण्यानुमोदना निमित्त देखील सढळ हाताने मदत करतात किनवट येथील माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी मागील वर्षात धम्म परिषदा, आणि मोठ मोठे मंगल पारिणय मेळावे घेऊन अनेक गोर- गरीबांचे लग्न जुळवले व त्यांना शासनाचा लाभ देखील मिळवुन दिला असे सामाजिक कार्य त्यांच्या हातुन घडतच असते , तसेच अजिंक्य बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी संथागार वृध्दाश्रमच्या माध्यमातुन त्यांनी अनेक निराधार बेघरांना आधार दिला अशीच गोष्ट  आज बघायला मिळाली ती म्हणजे एका जोडप्याचा आतंरजातीय मंगल परिणय (विवाह) आज संथागार मध्ये लावण्यात आला . संथागार परिवाराच्या साक्षीने  दिलीप सोरटे ( बौद्ध ) (अनुसुचीत जाती)व पुनम आंबाडोळे ( गोवारी)व (अनुसुचीत जमाती ) या आंतर जातीय जोडप्यांचा मंगल परिणय आकांक्षा करुणारुण आळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापण दिनानिमित्त संथागार वृध्दाश्रमास अन्नदानासाठी निधी समर्पित

 किनवट (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त  9 मार्च 2019 रोजी माजी तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली येथील संथागार वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदानासाठी पक्षाच्या वतीने निधी समर्पित करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष स्थापनेला 9 मार्च 2021 रोजी 15 वर्ष पूर्ण झालेली असून पक्षाचा हा वर्धापन दिन सबंध महाराष्ट्रात मनसेच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किनवट येथे सुद्धा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली किनवट शहरासह तालुक्यात महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या उत्साहात तसेच विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने साध्या पद्धतीनेच पण समाज भावनेतून किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात महाराष्ट्र सैनिकांनी पक्षाच्यावतीने वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनदान उपलब्ध व्हावे या मानवतेच्या दृष्टीने संथागार चे संचालक माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्याकडे  निधी समर्पित  करून वर्धापनदिन साजरा केला आहे. यावेळी माजी ताल

किनवट येथील महात्मा फुले चौकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिना निमित्त अभिवादन

  (तालुका प्रतिनिधी किनवट):- स्त्री शिक्षणाची जननी, भारतातील पहीली महिला शिक्षिका, स्फुर्ती नायिका अनंत अडचणीवर मात करून आपले संपुर्ण जीवन स्त्रियांच्या न्याय- हक्कासाठी झगडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२४ व्या स्मृती दिनानिमित्त किनवट येथील महात्मा फुले चौकात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमास एल.आय.सी.विकास अधिकारी संदीप पेटकुले, भारिप बहुजन महासंघाचे सुरेश जाधव, तुळशीराम वाडगुरे, राजु पेटकुले, टाईम्स ऑफ किनवटचे राजेश पाटील, विनोद गुरनुले, गणेश वाडे, पांडुरंग गुरनुले, अशोक पेटकुले, राहुल वाडे, सुनिल गुरनुले, दत्ता वाडगुरे, मधुकर पाटील ,शंकर नगराळे, संतोष शेंडे, किशोर कोसले, राहुल कापसे, संजय गुरनुले आदी उपस्थित होते.  

रोजच्या जीवनशैलीत हे बदल करा आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणं विसरा.. Helth Fitness tips

 “मला जरा ब्लड प्रेशरचा त्रास होतो”, असे जर कोणी आपल्या जवळची व्यक्ती म्हणाली तर लगेच आपल्याला त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागते. पूर्वी ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, ह्याबद्दल आपल्याला थोडे कमी ज्ञान होते. पण गेल्या दहा वर्षात जगामध्ये इतके संशोधन झाले आहे की, ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्ट अटॅक, ह्या गोष्टींची माहिती कधीही मिळवता यायला लागली आहे. ह्या भीतीदायक रोगांचे आता काही फार वाटत नाही. आताच्या धावपळीच्या जगात ब्लड प्रेशर मात्र बऱ्याच लोकांचे सोबती झालेले आहे. सगळ्याच देशांमध्ये बहुतांशी लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतोच. ह्याचे कारण आपली जीवनशैली. खाणेपिणे, झोप, कामाच्या वेळा, ह्यावर नियंत्रण नसलेली जीवनशैली ब्लड प्रेशरचे मूळ आहे. पण रोजच्या धावपळीत हे कोणालाही लक्षात येत नाही. जेंव्हा डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते आणि डॉक्टर सांगतात तुमचे बी.पी.हाय झाले आहे, आता तुम्हाला रोज बी.पी.च्या गोळ्या न चुकता घ्याव्या लागतील. त्यावेळी कळते आपले बी.पी.वाढले आहे. पण रोजच गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे आपले बी.पी.कंट्रोलमध्ये राहणार आहे म्हणल्यावर पुन्हा जीवनशैली तशीच चालू ठेवली जाते. रोजच्या

जागतिक महिला दिनानिमित्त संथागार येथे पाळी या विषयावर जनजागृती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

(तालुका प्रतिनीधी किनवट):-                                                        ८ मार्च जागतिक महिला दिन हा दिवस सर्व जगामध्ये मोठया उत्साहात साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन किनवट येथील डॉ. बाबासाहेब आबेंडकर  चौक जवळील संथागार वृध्दाश्रमात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . पाळी ही विटाळ नाही ती नैसर्गिक देणगी आहे त्या बद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला गेला व जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माहुरच्या लोकप्रीय मा. नगराध्यक्षा शितल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमात सहभागी वक्त्या अॅड प्रियंका सुनिल कैवारे पाटील आणि सहभागी वक्ते युवा प्रबोधनकार अतुलराज बेळीकर ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..  ॲड दिपा सोनकांबळे,ॲड सुनयना गेडाम यांनी कायद्याची माहिती तसेच महिला सांठीचे कलमे संविधानातील तरतुदी आदींची सविस्तर दिली. कार्यक्रमाचा समारोप स्मिता पहुरकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला.. आदरणीय  बळीराम पाटील महाविद्यालयाचे निवृत्त व माजी मराठी विभाग प्रमुख  प्रा.डॉ.रामप्रसाद तौर सर हे कार्यक्रमास आवर्जून

संथागार वृध्दाश्रमात मोफत सेवा देणारे आईटलवार परिवार

  किनवट वृत्त (तालुका प्रतिनिधी):-  म्हणतात ना आपणही समाजाच काही देन लागतो त्याचीच प्रचीती अजिंक्य बहुद्दशिय संस्था द्वारा किनवट मध्ये चालवण्यात येणाऱ्या संथागार वृध्दाश्रमात अनेक लोक महीला , पुरुष वृध्द आश्रयास आहे नुकतेच नावारुपाला आलेले संथागार परिवार वृध्दाश्रम बहरत आहे इथे अनेक दान वृत्तीचे  लोक सढळ हाताने मदत करत आहेत व वृध्दाश्रमास हातभार लावत आहे त्यामुळे संथागार मधील वृध्द आपल्या घरच्या परीवारा प्रमाणे जीवन व्यतीत करीत आहे अशेच एक किनवट मधील श्रीनिवास हेअर कटींग जे महात्मा फुले चौकात स्थीत आहे याचे मालक रामलु आईटलवार व त्यांचे दोन मुले गजानन व श्रीनीवास हे चक्क संथागार वृध्दाश्रमात दर शनिवारी येऊन वृध्दांची कटींग व दाढी विनामुल्य ,मोफत सेवा देत आहेत हि एक फार कौतुकाची बाब आहे या गोष्टीची चर्चा व आईटलवार परीवाराची दानी वृत्तीची प्रशंसा किनवट परिसरात होत आहे.

घोटी येथील जि.प. शाळा रात्रीतुन जमिनोदोस्त केल्या प्रकरणी उपोषण केले , गटशिक्षणाधिकारी प. स. यांच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण मागे

  (तालुका प्रतिनीधी किनवट):- किनवट तालुक्यातील घोटी येथील जिल्हा परिषदेची शाळा रात्रीतुन जमिनोदोस्त केल्या प्रकरणी शाळा पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणी करीता गटशिक्षणाधिकारी कार्यालया समोर सामाजीक कार्यकर्ते राजु लक्ष्मण सुरोशे, संतोष दत्ता मिराशे, उल्हास धरमा राठोड, सतीश मल्हाजी घुले, संजय शिवा गरड यांनी उपोषण केले होते . जि.प. वर्गाची  शाळा खोली बेकायदेशीर बुलडोझर लावुन पाडण्यात आली होती या करीता  लेखी तक्रार करून देखील कोणतीही कारवाई नाही झाल्याने शेवटी यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला व या उपोषणाची दखल घेत गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊन व लिंबु पाणी देऊन उपोषण सोडवले व कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देले .

किनवट नगर परिषदेने प्रशासनाचा दर्जा सुधारावा- माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार न .प. सेवक प्रभाग २, विभागीय आयुक्ताकडे तक्रार

  किनवट - येथील पालिकेतील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध लेखी, तोंडी तक्रारी होऊनही संबंधितांकडून सुधारणा होत नाही. ढिसाळ कारभारात त्वरित सुधारणा न झाल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार यांनी दिला आहे.       यासंदर्भात विभागीय आयुक्तांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  किनवट पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. पालिकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन वेळेचे पालन होत नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयात खेटे घालावी लागतात.अनेक कर्मचारी कोणतेतरी कारण सांगून कार्यालयाबाहेर पडतात. शहरवासीयांसाठी उपयुक्त असलेली वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन वर्षभरापेक्षा जास्तीचा कालावधी उलटला परंतु,अद्याप कामाला सुरुवात झाली नाही अनेकदा तक्रारी करूनही शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. छत्रपती शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्याबाबतची कारवाई अत्यंत संथगतीने सुरू असल्याने शिवप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. शहरातील

नांदेड :चित्रपट कामगार महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पद्मजा गिऱ्हे.

  माहूर (प्रतिनिधी) भाजपा चित्रपट कामगार महीला आघाडी नांदेडच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पद्मजा जयंत गिऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपट कामगार चळवळ सक्षम व सशक्त करण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कामगार नेते संजय केनेकर, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश साठे व भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय सरोज व जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी भाजपा चित्रपट कामगार आघाडीची ध्येय-धोरणे, कामगार व कलाकारांच्या समस्या जाणून संघटनेने दिलेले कार्यक्रम यशस्वी करून कामगारांच्या शास्वत विकासासाठी राबून देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये चित्रपटातील कामगार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी पार पडण्यासाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पद्मजा गि-हे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

माधव मेकेवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हा संघटक पदी निवड

नांदेड :-(प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात प्रकाश कौडगे मनसे जिल्हाध्यक्ष पदावर येताच मनसेत येणाऱ्यांची वर्णी लागली आहे दिवसेंदिवस  मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे . तत्पूर्वी भारत प्रभात पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड सह अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरल्याने नांदेड जिल्हाध्यक्ष मनसे सर्वत्र झाली आहे . पक्ष प्रवेश करणारे आजून दिग्जज कार्यकर्ते असल्याने नांदेड मध्ये मोठे बळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार आहे.आगामी भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे. *भोकर मधूनही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली* जानेवारी महिन्यात अनेक तालुक्यात शिवसेनेला सह अन्य पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश झाला.नांदेड जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक वार्डात मनसेचे कार्यकर्ते असावेत यासाठी नियोजन सुरु असल्याचे चित्र आहे. पक्षवाढीसाठी मनसेत युवकांना सामावून घेतले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी सांगितलं. सामाज

सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीची २०२१ची कार्यकारणी जाहीर

  ता . प्र.किनवट:( राजेश पाटील):- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांची १३०वी व क्रांतीसुर्य राष्ट्रपिता जोतीराव फुले यांची १९४वी संयुक्त सार्वजनिक जंयती सोहळा उत्सव समितीची कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. जंयती निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम घेण्याचा माणस असल्याचा आयोजन समितीने सांगितले आहे तसेच बैठकीच्या वेळी गेल्या वर्षाचा हिशोब देखील वाचुन दाखवण्यात आला व या वर्षीही पारदर्शक करण्याचे समितीने सांगीतले.  कार्यकारणी पुढील प्रमाणे:- अध्यक्ष: निखील वि.कावळे उपाध्यक्ष:- आकाश सर्पे/ सचिन कावळे सचिव:- प्रशिक मुनेश्वर/ निखिल सर्पे सहसचिव:- सुमेध कापसे/ शुभम भवरे कोषाध्यक्ष:- गौतम पाटील सहकोषाध्यक्ष:- सुगत नगराळे प्रसिद्धी प्रमुख:- राजेश पाटील संघठन:- प्रा.सुबोध सर्पे, शिलरत्न कावळे, रवी काबंळे,पंकज नगारे, प्रसेन्नजीत कावळे, सुबोध परेकार, प्रतिक नगराळे, रुपेश भवरे, सुरज भरणे, शुभम भवरे, पवन सर्पे, प्रशांत ना. ठमके, सुरेश कावळे मार्गदर्शक /सल्लागार:- अॅड के.के. साबळे, अभियंता प्रशांत ठमके, दादाराव कयापाक, नितीन कावळे, अॅड मिलींद सर्पे, विनोद भरणे, प्रकाश नगराळे