किनवट वृत्त
(तालुका प्रतिनिधी):-
म्हणतात ना आपणही समाजाच काही देन लागतो त्याचीच प्रचीती अजिंक्य बहुद्दशिय संस्था द्वारा किनवट मध्ये चालवण्यात येणाऱ्या संथागार वृध्दाश्रमात अनेक लोक महीला , पुरुष वृध्द आश्रयास आहे नुकतेच नावारुपाला आलेले संथागार परिवार वृध्दाश्रम बहरत आहे इथे अनेक दान वृत्तीचे लोक सढळ हाताने मदत करत आहेत व वृध्दाश्रमास हातभार लावत आहे त्यामुळे संथागार मधील वृध्द आपल्या घरच्या परीवारा प्रमाणे जीवन व्यतीत करीत आहे अशेच एक किनवट मधील श्रीनिवास हेअर कटींग जे महात्मा फुले चौकात स्थीत आहे याचे मालक रामलु आईटलवार व त्यांचे दोन मुले गजानन व श्रीनीवास हे चक्क संथागार वृध्दाश्रमात दर शनिवारी येऊन वृध्दांची कटींग व दाढी विनामुल्य ,मोफत सेवा देत आहेत हि एक फार कौतुकाची बाब आहे या गोष्टीची चर्चा व आईटलवार परीवाराची दानी वृत्तीची प्रशंसा किनवट परिसरात होत आहे.
Comments
Post a Comment