Skip to main content

रोजच्या जीवनशैलीत हे बदल करा आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणं विसरा.. Helth Fitness tips



 “मला जरा ब्लड प्रेशरचा त्रास होतो”, असे जर कोणी आपल्या जवळची व्यक्ती म्हणाली तर लगेच आपल्याला त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागते.

पूर्वी ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, ह्याबद्दल आपल्याला थोडे कमी ज्ञान होते. पण गेल्या दहा वर्षात जगामध्ये इतके संशोधन झाले आहे की, ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्ट अटॅक, ह्या गोष्टींची माहिती कधीही मिळवता यायला लागली आहे. ह्या भीतीदायक रोगांचे आता काही फार वाटत नाही.

आताच्या धावपळीच्या जगात ब्लड प्रेशर मात्र बऱ्याच लोकांचे सोबती झालेले आहे. सगळ्याच देशांमध्ये बहुतांशी लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतोच. ह्याचे कारण आपली जीवनशैली. खाणेपिणे, झोप, कामाच्या वेळा, ह्यावर नियंत्रण नसलेली जीवनशैली ब्लड प्रेशरचे मूळ आहे.


पण रोजच्या धावपळीत हे कोणालाही लक्षात येत नाही. जेंव्हा डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते आणि डॉक्टर सांगतात तुमचे बी.पी.हाय झाले आहे, आता तुम्हाला रोज बी.पी.च्या गोळ्या न चुकता घ्याव्या लागतील. त्यावेळी कळते आपले बी.पी.वाढले आहे.

पण रोजच गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे आपले बी.पी.कंट्रोलमध्ये राहणार आहे म्हणल्यावर पुन्हा जीवनशैली तशीच चालू ठेवली जाते. रोजच्या सवयीप्रमाणे आपण त्यात काहीही बदल करत नाही. मग बी.पी.बरोबरच मधुमेह, हृदयरोग, हेही जवळ येतात आणि वाढत जाते आपल्याच जीवनाची अनिश्चिती.


असले अनिश्चित जीवन जगण्यापेक्षा आपण जर आपल्या जीवनशैलीत काही बदल केले तर बी.पी.ला आपण कायमचा निरोप देऊ शकतो. मग रोजच्या गोळ्या घेणंही बंद होईल आणि बी.पी. दूर पळाला तर बाकी मधुमेह, हृदय रोग हे आपल्या जवळ सुध्दा फिरकणार नाहीत.


चला तर मग आत्ताच जाणून घेऊ बी.पी.ला पळवून लावण्यासाठी आपल्या जीवनशैलीत करायचे हे साधे सोपे बदल.


रोजच्या सवयीत बदल करायचे म्हटले की आपण लवकर तयार होत नाही. ते बदल जाणूनबुजून, लक्षात ठेवून करावे लागतात. कारण ते आपल्या चांगल्यासाठी असणार आहेत हे आपल्या डोक्यात बसले पाहिजे.


१) सर्वप्रथम आपण माहिती करून घेतले पाहिजे आपले ब्लड प्रेशर किती आहे. १२०/८० असे साधारण सुदृढ व्यक्तीचे बी.पी.असते.


पण २०१३मध्ये अमेरिकन मेडिकल असोसीएशन च्या नवीन प्रसिध्द झालेल्या मार्गदर्शक जर्नल मध्ये दिलेल्या माहिती नुसार १४०/९० mm Hg. किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे नॉर्मल बी.पी.असे समजावे. त्यात आपले किती आहे हे निश्चित जाणून घ्यावे.


२) कधी कधी डॉक्टर कडे गेल्यावर पांढर कोट घातलेले डॉक्टर आणि तिथले एकूण वातावरण पाहून सुद्धा आपले ब्लड प्रेशर वाढते.


म्हणून ब्लड प्रेशर कफ (blood pressure cuff) आपण स्वतः च खरेदी करून घरच्या घरी ब्लड प्रेशर पाहणे योग्य असते असे अमेरिकेतल्या प्रसिद्ध Dr. Johny Bowden यांचे म्हणणें आहे.



३) तिसरी गोष्ट म्हणजे रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करावे. कारण त्यात मिठाचे प्रमाण जास्त असते. अर्थात काही लोकांना मिठाचा काहीही त्रास नसतो.


ते जास्त खाल्ले तरी त्यांचे ब्लड प्रेशर वाढत नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हा दावा फोल ठरेल. पण processed foods खाणे शरीराला हितकारक नसते, त्यामुळे ते न खाणेच चांगले.



४) जास्तीत जास्त भाज्या खाव्यात. कारण भाज्यांमध्ये पोटॅशियम असते. जेवढे जास्त पोटॅशिअम आपल्या शरीराला मिळेल तेवढे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.



५) शरीराचे वजन कमी करणे हा एक चांगला उपाय आहे, कारण जेवढे शरीर स्थूल, वजन प्रमाणापेक्षा जास्त तेवढी तुमची उच्च रक्तदाबाची शक्यता जास्त वाढते. म्हणून वजन कमी करण्याचा एखादा प्लान घ्यावा आणि ते प्रमाणात आणावे.



“वजन कमी तर उच्च रक्तदाबाची शक्यता कमी”, हे लक्षात ठेवावे. त्यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करणे जरुरीचे आहे. किमान आठवड्यातून अडीच तास ताकद वाढवणारा व्यायाम करावा.



६) पुरेशी झोप घेणे जरुरीचे आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉपवर बराच वेळ रोज काम करणे, त्यात कामाचा ताण, अशा गोष्टीमुळे डोळ्यावर सुद्धा ताण येतो. रात्री उशिरापर्यंत कॉम्प्युटरवर काम केल्याने झोप होत नाही.


त्यामुळेही ब्लड प्रेशर वाढू शकते म्हणून पुरेशी म्हणजे रात्रीची ८ तास झोप घेणे जरुरीचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जातो त्यामुळे बी.पी.ची चिंता राहत नाही.



७) मानसिक ताण काढून टाकावा. सतत कोणत्यातरी विषयामुळे आपले मानसिक संतुलन बिघडत असेल तर तो विषय मनातून काढून टाकावा. कुठली चिंता असेल तर ती काढून टाकावी म्हणजे मन हलके करावे. यामुळे ब्लड प्रेशर वाढत नाही.



सतत त्रास देणारे विचार कसे काढून टाकायचे?


तर रोज काही वेळ प्राणायाम करावे. त्यामुळे संपूर्ण शरीराला प्राणवायूचा चांगला पुरवठा होतो आणि शरीर ताजे तवाने व्हायला मदत होते. मेडिटेशन हा तणाव घालवण्याचा सगळ्यात चांगला उपाय आहे.



मेडिटेशन करत असताना मनातले विचारचक्र कमी होऊन एकही विचार नसलेली अवस्था प्राप्त होते आणि सगळा मानसिक ताण नाहीसा होतो. अर्थात मेडिटेशन सतत केल्याने ही अवस्था प्राप्त होते.



८) कॅफेनचे प्रमाण जर शरीरात जास्त वाढत असेल तर ते कमी करावे लागते.




सतत चहा, कॉफी, सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, ह्यांमुळे बी.पी.वाढते. एकदम ते पिणे बंद न करता हळूहळू कमी करता येते. आणि फक्त एखादा कप घेण्याने अपाय न होता बी.पी.कमी होते.



९) जर आपण रात्री झोपेत घोरत असाल तर त्या घोरण्याचे कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करावा. सर्दी, कफ, ऍसिडिटी, जास्त चरबी गळ्यावर साठणे, ह्या अनेक कारणांमुळे माणूस घोरतो.



कोणताही आजार वाढत गेला की त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे जरुरीचे असते. म्हणून घोरणाऱ्यांनी उपाय करून घ्यावेत.



१०) बिलबेरी नावाचे फळ खाण्याने ब्लड प्रेशर कमी करता येते. आत्ताच्या एका नवीन अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे .


११) कोको खाण्याने सुद्धा बी.पी. कमी होते. नवीन अभ्यासातून हेही सिध्द झाले आहे की डार्क चॉकलेट खाऊन ब्लड प्रेशर कमी होते. पण जास्त नाही तर, एक स्क्वेअर इंच इतके चॉकलेट एकावेळी खाण्याने बी.पी. कमी होते.

१२) जास्तीत जास्त मॅग्नेशियम आपल्या शरीरात गेल्याने ब्लड प्रेशर कमी होते. हे मॅग्नेशियम बी.पी.तर कमी करतेच. शिवाय शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेल्या जाड भिंतीही साफ करून रक्ताभिसरण चांगले होण्याला मदत करते.


हे मॅग्नेशियम आपल्याला हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, चणे, तसेच तीळ, जवस ह्यातून मिळते. तसेच अवोकॅडोतून जास्त प्रमाणात मिळते.

तेलाचे जास्त प्रमाण असलेले मासे आठवड्यातून किमान दोनदा तरी खावेत ह्यातून ओमेगा-३ असिड मिळते. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते.


.१३) धूम्रपान बंद करणे आवश्यक आहे. धूम्रपान तुमच्या शरीराला अनेक प्रकारे घातक ठरते.


धूम्रपानामुळे सिगारेट संपल्या संपल्या तुमचे ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते. जितक्या सिगारेट तुम्ही रोज संपवाल तितक्या वेळा बी.पी.वाढते. म्हणून धूम्रपान हे अतिशय घातक आहे.



म्हणून जर तुम्ही सिगारेट ओढत असाल तर लवकर निर्णय घ्या आणि सिगारेट ओढणे बंद करा.




Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...