Skip to main content

इस्लाम समाजाच्या कुराण धर्मग्रंथाबद्दल अपशब्द काढणाऱ्या रिजवी वर कार्यवाहीची मागणी : टिपू सुलतान ब्रिगेड किनवट



ता. प्र.किनवट:

देश आधीच कोरोना महामारीत आरोग्य, बेरोजगारी, उपासमारी आणि  अर्थिक संकटांचा सामना करीत असताना जाणीव पूर्वक देशात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने धार्मिक द्वेष पसरवणारे कृत्य करणाऱ्या वसीम रिजवी या समाज कंटका विरूद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या मार्गदर्शनानुसार टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका शाखेच्यावतीने उप विभागीय अधिकारी, किनवट आणि कदीम पोलीस ठाणे, किनवट अशा दोन ठिकाणी दाखल करण्यात आली. वसीम रिजवी या समाज कंटकाने इस्लामी धर्मग्रंथ कुराणातील 26 आयाती कमी करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, तसेच इंडिया टि. व्ही.  ला मुलाखत देताना कुराणाचा संबंध आतंकवादाशी जोडून कुराणामुळे मुस्लिम युवक आतंकवादाकडे वळत आहेत अशा बिन बुडाचे आरोप केले आहेत. यामुळे समस्त भारतीय मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच मुस्लिमेत्तर समाज बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचे कार्य जाणीवपूर्वक करण्यात आले आहे.

         टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे जनतेला आवाहन करण्यात आले की आपण संयम बाळगावा व देशात, समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी संविधानिक आणि कायदेशीर पद्धतीने व ज्येष्ठांच्या संमतीने प्रकरण हाताळावे. वसीम रिजवी व त्या विचारधारेचा समूह आधी पासूनच श्रद्धावंत नाही. परंतु काही लोकं वसीम रिजवी यांना‌ बहिष्कृत केल्याचे प्रसारीत करत आहेत. तो स्वत: स्वीकार करतो की तो श्रद्धावंत नाही आणि तो अबु बक्र रजि., उमर रजि., उस्मान रजि., आई आयेशा रजि.,ई. चा तिरस्कार आणि शत्रूत्व करतो म्हणून मुस्लिम समाजाने  या समूहाच्या नाटकी प्रचाराला बळी पडू नये. वसीम रिजवी हा वंशवादाचा पुरस्कर्ता आहे. म्हणून वसीम रिजवीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

       याप्रसंगी टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद नदीम,  तालुका अध्यक्ष शेख शाकीर, युवा तालुका अध्यक्ष शेख समीर, जमीयते उलेमा हिंदचे मौलाना करीमोद्दिन, मौलाना सुलेमान, सामाजिक कार्यकर्ते शादाब सिद्दिकी इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...