आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा; पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला सल्ला
संपूर्ण लॉकडाऊनला केला विरोधपृथ्वीराज चव्हाण यांनी थेट लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. बेरोजगार, रोजंदारी मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारनं लक्ष देऊन आधी या घटकांना मदत करा, नंतरच लॉकडाऊचा विचार करा, असा सल्ला दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागण्या कोणत्या?>> लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी ठेवायला हवा लॉकडाऊन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. याकाळात प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा. खासगी वाहनातून प्रवासाला मुभा देणे शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होता कामा नये.
Comments
Post a Comment