Skip to main content

सा.बा. उपविभाग कार्यालयात दोन विश्रामगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे

 

(किनवट ता. प्र.)

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय किनवट मध्ये दोन विश्रामगृह कक्षांचे काम चालू आहे जे की अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून ज्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी घडण्याची शक्यता आहे. एका बाजूच्या कक्षाला वरती लोखंडी गजाळी लावून पडदी केली जात आहे,तर दुसर्‍या बाजूला सिमेंटच्या विटा लावून भिंत केली जात आहे ज्यामुळे एकाच कामांमध्ये हे दोन प्रकारचे  काम कसे केले जात आहे हे न उलगडणारे कोडे आहे. सदरील कामावरती नदीतील रेती न वापरता नागपूर विदर्भामध्ये मिळणारी कृत्रिम रेती वापर करून कामाचा धडाका संबंधित गुत्तेदारने लावला आहे त्यामुळे सदरील काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदरील कामाची चौकशी करून तात्काळ सदरील काम थांबवत सदरील काम  गुत्तेदार कडून काढून घेऊन पुन्हा नव्याने चांगल्या शासकीय गुत्तेदार कडून करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शोकात यांनी  नांदेडचे विभागीय सर्कल अभियंता अविनाश धोंडगे यांच्याकडे केली आहे.

साधारणत एक कोटी सत्तर लक्ष रुपयांचे अनुदान असणाऱ्या या कामाला ई टेंडर प्रक्रिया लागण्या आधीच या गुत्तेदारने काम सुरु करत ई टेंडर प्रक्रियेला हरताळ फासली आहे. हा गुत्तेदार असेच कोणतेही काम ई टेंडर प्रक्रिया लागण्या आधीच सुरु करतो आणि नंतर सगळ्या इतर गुत्तेदाराना दबाव टाकत काम स्वतः ला सोडवून घेत आला आहे त्यामुळे शासनाची टेंडर प्रक्रिया पुर्णतः निकामी ठरली आहे. माती मिश्रीत कृत्रिम रेती वापरल्याने बिल्डिंगची पकड मजबूत झालेली नाही आहे त्यामुळे भविष्यात ही इमारत पडण्याची शक्यता जास्त आहे. तरी सदरील कामाची चौकशी माझ्या समक्ष करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शोकात यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...