Skip to main content

किनवट नगर परिषदेने प्रशासनाचा दर्जा सुधारावा- माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार न .प. सेवक प्रभाग २, विभागीय आयुक्ताकडे तक्रार

 


किनवट - येथील पालिकेतील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध लेखी, तोंडी तक्रारी होऊनही संबंधितांकडून सुधारणा होत नाही.

ढिसाळ कारभारात त्वरित सुधारणा न झाल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार यांनी दिला आहे.     

 यासंदर्भात विभागीय आयुक्तांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 

किनवट पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे.

पालिकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन वेळेचे पालन होत नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयात खेटे घालावी लागतात.अनेक कर्मचारी कोणतेतरी कारण सांगून कार्यालयाबाहेर पडतात.


शहरवासीयांसाठी उपयुक्त असलेली वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन वर्षभरापेक्षा जास्तीचा कालावधी उलटला परंतु,अद्याप कामाला सुरुवात झाली नाही

अनेकदा तक्रारी करूनही शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.

छत्रपती शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्याबाबतची कारवाई अत्यंत संथगतीने सुरू असल्याने शिवप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची निगा राखण्यात येत नसल्याने पुतळ्यांभोवती अस्वच्छता,घाणीच्या साम्राज्यासोबतच अतिक्रमणात वाढ होत आहे.

भाजी मार्केट तसेच आठवडी बाजारात कोणीही यावे,अतिक्रमण करावे,अशी स्थिती आहे.

एकीकडे भाजी मार्केटमध्ये अतिक्रमणे वाढत असताना पालिकेत जमीन भाडेधारकांच्या नोंदीच नसल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

शिवाय,वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने महिला व नागरिकांना त्रास होत आहे.

पालिकेचे लेखा परीक्षण अहवाल सर्वसाधारण सभेपुढे ठेवून आयुक्तालयास पाठविणे बंधनकारक असताना डिसेंबर २०१७ ते फेब्रु.२०२१ पर्यंतचा अहवाल सभागृहात आलाच नाही.

विकास योजना विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विकासकामे संथगतीने होत आहेत.

जलशुद्धीकरणाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने नागझरी तलावातून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.

घनकचरा ठेकेदाराला  मुदतवादी 'चा पॅटर्न सुरूच असल्याने स्वच्छतेच्या कामांत अनियमितता दिसून येत आहे

न्यायालयीन प्रकरणांचा अहवाल ५ वर्षांपासून सभागृहापुढे ठेवण्यात आला नाही.

एखादे न्यायालयीन प्रकरण हाताळण्याबाबत विशिष्ट कर्मचाऱ्याची नियुक्ती संशयास्पद आहे.भूसंपादनाची बाबतीतही प्रशासनाची अनास्था दिसून येत असल्याचे नेम्मानीवार यांनी नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...