घोटी येथील जि.प. शाळा रात्रीतुन जमिनोदोस्त केल्या प्रकरणी उपोषण केले , गटशिक्षणाधिकारी प. स. यांच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण मागे
(तालुका प्रतिनीधी किनवट):-
किनवट तालुक्यातील घोटी येथील जिल्हा परिषदेची शाळा
रात्रीतुन जमिनोदोस्त केल्या प्रकरणी शाळा पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणी करीता गटशिक्षणाधिकारी कार्यालया समोर सामाजीक कार्यकर्ते राजु लक्ष्मण सुरोशे, संतोष दत्ता मिराशे, उल्हास धरमा राठोड, सतीश मल्हाजी घुले, संजय शिवा गरड यांनी उपोषण केले होते .
जि.प. वर्गाची शाळा खोली बेकायदेशीर बुलडोझर लावुन पाडण्यात आली होती या करीता लेखी तक्रार करून देखील कोणतीही कारवाई नाही झाल्याने शेवटी यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला व या उपोषणाची दखल घेत गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊन व लिंबु पाणी देऊन उपोषण सोडवले व कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देले .
Comments
Post a Comment