Skip to main content

माधव मेकेवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हा संघटक पदी निवड




नांदेड :-(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यात प्रकाश कौडगे मनसे जिल्हाध्यक्ष पदावर येताच मनसेत येणाऱ्यांची वर्णी लागली आहे दिवसेंदिवस  मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे . तत्पूर्वी भारत प्रभात पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड सह अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरल्याने नांदेड जिल्हाध्यक्ष मनसे सर्वत्र झाली आहे . पक्ष प्रवेश करणारे आजून दिग्जज कार्यकर्ते असल्याने नांदेड मध्ये मोठे बळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार आहे.आगामी भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे.

*भोकर मधूनही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली*

जानेवारी महिन्यात अनेक तालुक्यात शिवसेनेला सह अन्य पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश झाला.नांदेड जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक वार्डात मनसेचे कार्यकर्ते असावेत यासाठी नियोजन सुरु असल्याचे चित्र आहे. पक्षवाढीसाठी मनसेत युवकांना सामावून घेतले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी सांगितलं.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अगदी थोड्या दिवसात राजकीय पक्षात प्रवेश करून आपला ठसा उमटवणारे माधव मेकेवाड नेहमी चर्चेत असतात.महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हाध्यक्ष
प्रकाश कौडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी सर्व निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी अग्रेसर होईल ह्या साठी राजसाहेब ठाकरे सोबत कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले हिंदुत्वाचा अजेंडा आज साहेबाच्या हातून होणार त्या साठी आम्ही आमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देऊ पक्ष वाढीसाठी जीवापाड प्रयत्न करून आगामी सर्व निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकु असे माधव मेकेवाडयांनी पक्ष प्रवेश झाल्यानंतर आश्वासन पक्षाला शेकडो कार्यकर्त्या समोर दिले. .पक्षात या वेळी अनेक धडाडीच्या कार्यकर्त्या समक्ष माधव मेकेवाड यांना जिल्हा संघटक पदाची धुरा सांभाळावी असे वक्तव्य प्रकाश कौडगे यांनी केले.यावेळी माधव मेकेवाड,विजय पांडुरंग मोरे,गुणाजी भंडरवाड ,गजानन जाधव,सुनील पवार यांच्या कडे विविध पदे देऊन सत्कार करण्यात आला .शंकर पाटील हाडोळीकर ,सोहम शेट्टे, आकाश गेंटेवार यांची निवड देखील यावेळी भोकर तालुक्यातील कार्यकर्ते समोर देऊन राजसाहेब यांच्या सैनिकांच्या घोषणा कार्यलयात यावेळी गुंजू लागल्या.

या निवडी वेळी माधव मेकेवाड म्हणाले...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब देशाला आणि महाराष्ट्र राज्याला खरी दिशा देणारे एकमेव नेते असणार आहेत अशा नेत्याच्या पक्षात कार्य करणे म्हणजे आगामी महाराष्ट्र राज्याचा खरा विकास करताना साक्षीदार ठरणे होय  यामुळे मी पुनश्च पक्षात प्रवेश केला असे मत माधव मेकेवाड यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी समोर पक्ष कार्यलय नांदेड येथील बैठकीत मांडले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...