ता. प्र.किनवट:-ता.११ मार्च
किनवट येथील संथागार वृध्दाश्रमात निराधारांसाठी आधार बनलेले एक मायेची सावली देणारे वृक्ष ठरले आहे इथे वृध्दानां तर आश्रय मिळतोच व शहरातील वेगवेगळ्या दानी वृत्तीच्या लोकांकडुन मदत मिळते तसेच अनेक जन आपला वाढदिवस , वर्धापन दिन, महापरुषाची जंयती येथे मोठ्या मनाने व आपुलकीने साजरा करतात तसेच पुण्यानुमोदना निमित्त देखील सढळ हाताने मदत करतात किनवट येथील माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी मागील वर्षात धम्म परिषदा, आणि मोठ मोठे मंगल पारिणय मेळावे घेऊन अनेक गोर- गरीबांचे लग्न जुळवले व त्यांना शासनाचा लाभ देखील मिळवुन दिला असे सामाजिक कार्य त्यांच्या हातुन घडतच असते , तसेच अजिंक्य बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी संथागार वृध्दाश्रमच्या माध्यमातुन त्यांनी अनेक निराधार बेघरांना आधार दिला अशीच गोष्ट आज बघायला मिळाली ती म्हणजे एका जोडप्याचा आतंरजातीय मंगल परिणय (विवाह) आज संथागार मध्ये लावण्यात आला .
संथागार परिवाराच्या साक्षीने
दिलीप सोरटे ( बौद्ध ) (अनुसुचीत जाती)व पुनम आंबाडोळे ( गोवारी)व (अनुसुचीत जमाती ) या आंतर जातीय जोडप्यांचा मंगल परिणय आकांक्षा करुणारुण आळणे यांच्या हस्ते संथागार वृध्दाश्रमात संपन्न झाले व दोन जीव वैवाहीक जीवनात सुखी झाले . या वेळी संथागारचे संचालक अरुण आळणे , करुणा आळणे व संथागार येथील वृध्द महिला पुरुष परिवारातील सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment