(तालुका प्रतिनिधी किनवट):-
स्त्री शिक्षणाची जननी, भारतातील पहीली महिला शिक्षिका, स्फुर्ती नायिका अनंत अडचणीवर मात करून आपले संपुर्ण जीवन स्त्रियांच्या न्याय- हक्कासाठी झगडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२४ व्या स्मृती दिनानिमित्त किनवट येथील महात्मा फुले चौकात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला .
या कार्यक्रमास एल.आय.सी.विकास अधिकारी संदीप पेटकुले, भारिप बहुजन महासंघाचे सुरेश जाधव, तुळशीराम वाडगुरे, राजु पेटकुले, टाईम्स ऑफ किनवटचे राजेश पाटील, विनोद गुरनुले, गणेश वाडे, पांडुरंग गुरनुले, अशोक पेटकुले, राहुल वाडे, सुनिल गुरनुले, दत्ता वाडगुरे, मधुकर पाटील ,शंकर नगराळे, संतोष शेंडे, किशोर कोसले, राहुल कापसे, संजय गुरनुले आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment