Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

सुर्य-चंद्र माणसासाठी माणसाचीच माणसाला का होते आडकाठी....... मराठी भाषा गौरव दिना निमित्त कवि समेंलन उत्साहात

(शहर प्रतिनीधी किनवट ): दिवंगत प्रसिध्द, साहित्यिक, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर्फे ऑनलाईन कवि संमेलानाचे आयोजन दुपारी १:०० वाजता करण्यात आले होते या कवितेच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी, लेखक अॅड के.के. साबळे हे होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य राजकुमार नेम्मानिवार यांनी मांडले तर  डॉ.एस.के. बेंबरेकर यांनी मराठी भाषा दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास ऑनलाईन प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,कार्यक्रमाची सुरवात ऑनलाईन कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करुन झाली. कविसंमेलनाच्या सुरवातीस कवी रमेश मुनेश्वर यांनी "हाता पायाच्या जखमा साऱ्या  'बा' च्या कहाण्या सांगायच्या  शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा"  हि शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी काव्य रचना सादर केली व शब्दचक्षु नावाची प्रेम कविता सादर करुन ऑनलाईन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल . या नतंर युवाकवी राजेश पाटील यांनी  " खर सांगु माॅ तुझ्यावर लिहतांना श

महसूल विभागाच्या एका पथकाने शहरात दाखल कर चुकवेगिरी करणाऱ्याचे धाबे दणानले

किनवट, ता.२५ (बातमीदार) : शहर व परिसरातील अनेक व्यापारी दुकानदारांनी वस्तू सेवा कर कायद्याखाली नोंदणी केलेली नाही. असे असूनही सदर व्यापारी हे आपला व्यापार कर बुडवून धुमधडाक्यात करीत आहेत. अशा करबुडव्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर संबंधित विभागाने धाडी टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी,  जागृत नागरीकातून होत आहे.   काही दिवसापूर्वी महसूल विभागाच्या एका पथकाने शहर व परिसरातील काही दुकानांवर धाडी टाकल्या होत्या. परंतु, या प्रकरणात पुढे काय कार्यवाही झाली हे मात्र आजपर्यंत कळू शकलेले नाही. शहर व परिसरातील काही टेलर हे कपडे शिलाई बरोबरच आपल्या दुकानातून कपड्यांची व रेडीमेड कपड्यांची विक्री करतात. त्यांनी दुकाने व आस्थापना कायद्याअंतर्गत  टेलरिंग दुकानाची नोंदणी केलेली आहे. परंतु, व्यवसाय मात्र ते कपडे विकण्याचा करता. त्या दुकानदाराकडे वस्तू सेवा कर कायद्याअंतर्गत चे लायसनस सुद्धा नाही. सदरील टेलर हे कापड विक्री करतांना पावती सुद्धा देत नाहीत. कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापार्‍यांच्या  प्रतिष्ठानावर  छापे टाकून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. त्यांनी किती कर बूडविला आहे, ते उजेडात येईल. अशी अपेक्

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ केदार यांची जामगा येथील पिडीत कुटुंबियांना भेट

  नांदेड प्रतिनीधी: आज नांदेड येथील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथे  पीडित कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला व प्रशासनास कठोर कार्यवाही करण्याचे लोहा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले,   यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ केदार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले वंचितचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ इंगोले लोहा नगरसेवक बबन निर्मले लोहा नगरसेवक पंचशील कांबळे  वंचीतचे नेते प्रा.राजू सोनसळे वंचीत नेते ॲड. कमलेश चौदंते सुनील सोनसळे लोहा पंचायत समीती उपसभापती नरेंद्र गायकवाड वंचीतचे नेते सतीश आनेराव  ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्रध्यक्ष विनोदभाऊ भोळे दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण फुगारे उत्तरचे भीमराव बुक्तरे  रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश सावते भास्कर कदम विदान कदम आदिंच्या स्वाक्षर्या निवेदनावर आहेत . नांदेड व लोहा मधील बहुजन पक्ष संघटनेच्या वतीने बौध्द हाल्याच्या निषेधार्थ 27 फेब्रुवारीला लोहा शहर बंदची हाक देण्यात आली..अर्धापुर तालुका अध्यक्ष सुरेश सावते विद्यार्थी जिल्हाधक्ष संदेश जोंधळे उपस्थित होते

शालेय जि. परिषद इमारत जमीनदोस्त प्रकरणात आमरण उपोषणाचा इशारा :-राजू पाटील सुरोशे.

किनवट (तालुका प्रतिनिधी)  शासकीय इमारत उभी करण्यासाठी शासनाचा खर्च होत असतो तसेच एखादी इमारत किंवा व कधी पाडायची याबाबत शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे परंतु, काही शासकीय पदावर असलेले महारथी च्या आशीर्वादाने नियमाची पायमल्ली तर केली जाते. याउलट दोषी व्यक्तीला ही पाठीशी घातल्या जाते  त्याचाच एक भाग म्हणून की काय किनवट शहराजवळून जवळच असलेल्या घोटी येथील जिल्हा परिषद शालेय इमारत ही रातोरात जमीनदोस्त करण्यात आली. यासंबंधी राजू पाटील सुरोशे  यांनी वेळीच शासन दरबारी आपली कैफियत मांडली, परंतु अद्याप पर्यंत काहीही कारवाई झाली नाही, म्हणून दिनांक 24/ 2 /2021 रोजी राजू पाटील सुरोशे यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा गंभीर असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सदर निवेदना  मध्ये मौजे घोटी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील शालेय इमारत जमीनदोस्त केल्या बाबत विषयाला अनुसरून दिनांक 2/2 /2021 च्या मध्यरात्री जि. प. प्रा. शाळा घोटी येथील इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. तरी अद्याप पर्यंत गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी काहीही कार्यवाही केली नाही, असे निदर्शनास येत आहे. तरी दिनांक 28 /2 /2021 पर्यंत आपण संबंधितांवर का

महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशन वर्धापन दिनाचे औचित्य साधुन गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप

  ता . प्र . किनवट : जिल्हा अध्यक्ष पद्माताई गि-हे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व मरावाडा उपाध्यक्ष शकील शेख व नांदेड जिल्हा अध्यक्ष सलीम खान यांच्या सहकार्यातून पोलीस बॉईज असोसिएशन किनवट तालुक्यात तालुका अध्यक्ष परवीन शेख यांनी उप जिल्हा रुग्णालय येथे गरजु रुग्णांना फळाचे वाटप करून या covid-१९ च्या अनुशंगाने व महाराष्ट्र पोलिस बॉईज वर्धापन दिना निमिता रुग्णांना फळे व बिस्किट देऊन पोलीस बॉईज असोसिएशन वर्धापन दिन साजरा केला आली या वेळीं डॉक्टर उप जिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. धुमाळे , डॉ. जाधव, कोंडावर सिस्टर घोळ घाटे , कॉग्रेंसच्या नेत्या सुरेखा ताई काळे ,ग्राम पंचायत सदस्य मनीषा चौधरी, पोलिस संघटनेचे अध्यक्ष रीतेश सर, विराट महिला बचत गटाच्या अध्यक्षा जकिया, युवती ममता अनीता आदी जन उपस्थित होते.

"उदीष्टा शिवाय ते लिहत नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत.... प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांचे महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार पुस्तक प्रकाशना वेळी गौरोउद्गार

ता. प्र. किनवट:-दि.२१ "उदीष्टा शिवाय ते लिहतही नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत असे गौरोउद्गार प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांनी महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार या पुस्तक प्रकाशन सोहळा वेळी काढले ते पुढे बोलत होते प्रसिद्ध लेखक, कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी या पुस्तकातुन प्रबोधन चळवळीत खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या व आपले जीवन निस्वार्थपणे प्रबोधनासाठी झटणाऱ्या शहिर गायक यांचा लेखा जोखा मुलाखतीच्या माध्यमातुन त्यांनी अंत्यत मुद्देसुदपणे मांडला व सन्मान केला.  'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म. ज्यो. फुले महाविद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरवातीस धम्म वंदना घेण्यात आली व नंतर वामनदादा कर्डक अकादमीचे प्रा. सुरेश पाटील यांनी सुरेल आवाजात गीत सादर केले मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन विचार मंचावर प्रा.डॉ. आनंद इंजेगावकर ( परभणी), अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा क

टिपु सुलतान ब्रिगेड तर्फे छत्रपती शिवराय जंयती निमित्त फळांचे वाटप

(ता. प्र. किनवट) अठरा पगड जातींना एकत्र करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जंयती निमित्त  टिपु सुलतान ब्रिगेड किनवट टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे अध्यक्ष शेख सुभान अली यांच्या नेतृत्वाखाली  हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला किनवट टिपु सुलतान शाखे तर्फे आज उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले  तसेच संथागार वृद्धाश्रमात गरजवंताना  व जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबीरार्थी व शालेय विद्यार्थ्यांना विविध फळांचे वाटप करण्यात आले . यावेळी टिपु सुलतान ब्रिगेडचे  जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद नदीम,जिल्हासचिव शारूख खान,तालुका अध्यक्ष शाकीर शेख़ ,तालुका उपाध्यक्ष इशरतशेख़,तालुका युवा उपाध्यक्ष समीर शैख़ ,शब्बीर खान,रियाज़ शेख़ नासेर भाई ,अब्बास कुरैशी ,दुर्गेश भागीरथीवार,फारूक चव्हान ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष मुनीर शेख़ आदी उपस्थीत होते. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे

किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती विविध उपक्रमानी साजरी करून अभिवादन

(शहर प्रतिनिधी किनवट) : कुळवाडी भुषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जंयती किनवट मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . सुरवातीला सकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक उत्सव समिती तर्फे छ.शिवाजी चौक , डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक, जिजामाता चौक, ते गोकुंदा पर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्या नंतर जुन्या नगर पालीकेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, रंग भरण स्पर्धा, भाषण स्पर्धा, भव्य आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, व नेत्र तपासणी शिबिर असे विविध उपक्रम कोवीड१९ चे नियम पाळुन घेण्यात  आले व छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले  यावेळी आमदार भिमरावजी केराम, नगराध्यक्ष आंनद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, श्रीनिवास नेमान्नीवार, व्यंकट नेमान्नीवार,कैलास भगत, अभय महाजन, साजीद खान, अनुसया मधुकर अन्नेलवार, जहीराद्दीन खान, प्रशांत कोरडवार, सागर ताई शिंदे, बापुसाहेब तुप्पेकर, अण्णा भाऊ शेळके, किरण ठाकरे,डॉ . अरवींद भुरके, डॉ. बालाजी तेलंग, डॉ. प्रसाद सुर्वे, डॉ. वसंत बामणे, डॉ. अविनाश पवार, सतिश सोरटे, डॉ. सतिष सोरटे, डॉ. रीतेश सुर्यवंशी, डॉ .

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुखपदी किनवट टुडेचे मुख्य संपादक आनंद भालेराव यांची निवड

(ता . प्र. किनवट) आनंद भालेराव गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद भालेराव संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघाची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, क्राईम राज्य प्रमुख नफीस शेख, चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रमुख दिग्दर्शक प्रशांत विलनकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा कि

रींकु राजगुरू ( आर्ची) ने जिंकली किनवट माहुर तालुक्यातील लोकांची मने ....... संत सेवालाल जंयती निमित्त घेण्यात आलेली स्पर्धा उत्साहात

 ✍🏿 विशेष वृत्त : राजेश पाटील) (सारखणी/ किनवट/ माहुर प्रतिनिधी) संत सेवालाल महाराज यांच्या २८२व्या जंयती निमित् घेण्यात आलेल्या भव्य लेंगी स्पर्धेनिमित्त आलेल्या सैराट चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकु राजगुरु( आर्ची) सारखणी येथे आली असता प्रेक्षकांनी एकच गर्दी केली "ए मराठीत सांगलेल कळत नाय का ? गोरमाटीत सांगु का "असा डायलॉग मारताच प्रेक्षक आनंदाने भारावुन गेले तसेस संत सेवालाल जंयती च्या  व लेगीं स्पधेला तिने शुभेच्छा दिल्या व आयोजन समितीचे  आभार मानले व "जय सेवालाल असा जयघोष केला" या कायक्रमाचे आयोजन संजीवकुमार राठोड( निर्माता दिग्दर्शक आगामी चित्रपट आमदार निवास), सुनयना जाधव जि. प. सदस्या नांदेड, विशाल जाधव(संयोजक अखिल भारतीय गोर बंजार लेगीं स्पर्धा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी  अभिनेत्री रिंकु राजगुरु अकलुजहुन हेलीकॉप्टरने माहुर येथे ११:४५ वाजता दाखल झाली तेथुन सारखणीला १२:३५ ला संत सेवालाल जयंतीस उपस्थित होताच कार्यक्रमास सुरवात झाली . विशाल जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक मांडले तर संजीव कुमार राठोड यांन मनोगत व्यक्त केले या का

कॉस्मापॉलीटन विद्यालयात संत शिरोमनी सेवालाल महाराज यांची साजरी

किनवट:(तालूका प्रतिनिधी)           कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवट व विविध उपक्रमांनी सजलेली तालुक्यातील थारा केंद्रा अंर्तगत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 258वी जयंती दि. 15 रोजी सकाळी 11 वा. साजरी करण्यात आली. या प्रसंगी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवनावर शाळेचे सहशिक्षक देविदास येरवाळ यांनी प्रकाशझोत टाकला.          कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव पी व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष नामदेवराव रामतिर्थकर, मुख्याध्यापक कारामुंगे सर, पर्यवेक्षक राठोड सर, जेष्ठ शिक्षक घोरबांड सर, मोहिते सर, बारापात्रे सर, बामणीकर सर, कदम सर, कयापाक, जाधव सर, कोत्तरवार मॅडम, आलोने मॅडम आदींनी अभिवादन केले.        जाणजो,छाणजो पच माणजो ह्या संत सेवालाल यांनी दिलेल्या संदेशाचा उलगडा सतीश मठदेवरू यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केल तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस येथील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक राजीव बैलके,श्रीमती वैशाली यलमटे यांनी परिश्रम घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी होणार

 किनवट:(तालूका प्रतिनिधी)        छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिं 19 फेब्रुवारी रोजी किनवट येथे विविध उपक्रमाने साजरी होणार असुन या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती किनवटने केली आहे.        या उपक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, भाषण स्पर्धेचा समावेश असून सकाळी 7 वाजता पासून या स्पर्धा नगर परिषद किनवट च्या प्रांगणात होणार आहेत.तर दुपारी 12 ते 5 पर्यंत आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन ओमकार ऑप्टिकल यांच्या सौजन्याने या शिबिरात तपासणी करणाऱ्या रुग्णांना 250 रुपयांमध्ये चष्मा बनवून मिळणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात येणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त शिवभक्तांनी याा कार्यक्रमात सहभागी व्हा असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किनवट च्या वतीने गोविंदा रिसोड, शिवाजी पवार, आशिष का-हाळे, दगडू भरकड, सुमित माने, आकाश इंगोले, कपिल जाधव, राजू वानखेडे, श्रीकांत बेंद्रे, सचिन कदम, रितेश मंत्री यांनी केले आहे.

स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा तर्फे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्ष संपन्न.....300 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग...

किनवट: (तालुका प्रतिनिधी)         छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा तर्फे 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन 14 फेब्रुवारी रोजी एन. के टावर, गोकुंदा येथे करण्यात आले असून यामध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षा व शिवरायांचे विचार पोहोचवण्याचे काम स्वराज्य युवा प्रतिष्ठान यांनी केले आहे. परिक्षेच्या सुरुवातीला शिवरायांच्या पुतळ्याचे पुष्पहाराने पूजन करून ठिक 2 वर्षाआधी पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यात आली व शिवरायांच्या घोषणा देवुन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.          या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा व स्पर्धा परीक्षेचे आयोजक ईलीयाज मोहम्मद, नागेश राव, अभिषेक बामणे, गजानन सूर्यवंशी, अजिज शेख, अरविंद डाखोरे, शेख सुलतान, अजय इटकेपेल्लीवार, जावेद शेख, अरबाज शेख यांनी परिश्रम घेतले तर जाकिर सर, बाळकृष्ण

मांडवी येथे आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन व वन परिक्षेत्र अंतर्गत वन्यप्राणी नुकसान भरपाई अनुदान वाटप

    (मांडवी  प्रतिनिधी इंद्रपाल कांबळे)  कै. बळीराम पाटील शासकीय ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे प्रसूती कक्ष व विस्तारीकरण या कार्यक्रमाचे भूमिपूजन व वन परिक्षेत्र अंतर्गत वन्यप्राणी नुकसान भरपाई अनुदान वाटप नुकतेच किनवट माहूर विधानसभाचेआमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पार पडले.  व तसेच मांडवी येथील जुने जिल्हा परिषद शाळेतील परिसरात संस्कृती भवन या सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला . मा. आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून मुख्य रस्त्याला लावलेल्या पाच लाखाच्या हायमॅक्स दिव्याचे लोकार्पण करण्यात आले.  यावे माननीय आमदार व माहूर येथील अध्यात्मिक गुरु श्याम भारती महाराज यांची उपस्थिती विशेष होती. प्रस्तुती कक्ष भूमिपूजन पार पडताना मा.आमदार साहेबांनी आपले विचार मांडत असताना असे सांगितले की मांडवी परिसरामध्ये आरोग्य विषयी अधिक कामे असून सदैव काम करण्यास मी तात्पर्य तयार आहे यापूर्वी पण या विभागावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर आता दवाखान्याची विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल असे सांगण्यात आले इथून समोर ग्रामीण विभागाचे अनेक कामे प्रलंबित असून सर्व पूर्ण करण्याचे

तलाईगुडा येथील लोक आदालत संपन्न

 टाईम्स ऑफ किनवट वृत्तांत : मांडवी :( प्रतिनिधी इंद्रपाल कांबळे)  मांडवी पासून दहा कि.मी. अत रगत पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने दी १०/०२/२०२१.रोजी लोक न्यायालय आपल्या दरी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते लोकन्यायालय द्वारे  कायदेविषयक साक्षरता शिबिर या उपक्रमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा हा उपक्रम राबविण्यात येत असून या निमित्त पिंपळगाव ग्रामपंचायत द्वारे हा उपक्रम संपन्न झाला त्यानिमित्त या लोकअदाल तात मध्ये एकूण 6o पैकी १९ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे  मांडवी परिसरातील ग्रामीण भागात असे लोक न्यायालय हे प्रथमच आयोजन करण्यात आलेले असून पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत असा उपक्रम करण्यात आल्यामुळे सर्वत्र या ग्रामपंचायती कौतुक होत आहे  लोक न्यायालयाला न्यायाधीश म्हणून निवृत्त न्यायाधीश कमलाताई वडगावकर या अध्यक्ष म्हणून होते. यानिमित्त न्यायाधीश कमलताई वडगावकर विचार मांडत असताना असे सांगितले की, लोक न्यायालय आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमा अंतर्गत लोक न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आलेले असून यात फेरयाचिका  म्हणून येथे निकाल झालेले

किनवट येथे माता रमाबाई आबेंडकर यांची जयंती साजरी

( किनवट ता.प्रतिनिधी )            त्यागमूर्ती व अखंड स्त्री जातीला ऊर्जा स्त्रोत देणारी सर्वांची आई माता रमाई.  माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२३ वी जयंतीचे औचित्य साधून किनवट तालुक्यात तक्षशीला  बौद्ध विहारात धम्मबांधव व धम्मभगिनी शुभ्र वस्त्र परिधान करून विहारात ठीक ११ वाजता उपस्थित होते.            भीमयान बुद्ध विहार  परिसर समता नगर येथे  जगाला शांतीचा संदेश देणारे  महाकारुनीक,तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस धूप पूजा , पुष्पपूजा अर्पण करून त्रिशरण पंचशीला बौद्धाचार्य गंगाधर कदम यांच्या हस्ते घेण्यात आली व धम्म  वंदन घेण्यात आली.  या वेळी उपासक पांडुरंग भगत, भीमराव गीमेकार, सिद्धार्थ पाटील, संजीवन पाटील,अभय नगराळे, अशोक वासाटे, जीवन लाठे, आनंद नगारे, रवी कावळे, भीमराव पाटील, साहेबराव वाढवे,गंगाधर कदम, सुबोध गीमेकार, अनुपम वासाटे, महेंद्र वासाटे, सागर सूर्यवंशी, प्रभाकर भगत, सुधाकर भगत, अविनाश नगराळे, राहुल गीमेकार, हर्शानंद पाटील, चांगदेव सोनुले,अर्जुन दिंडाळकर, आकाश लाठे,सुमेध गायकवाड, अंकित गायकवाड,प्रशिक पाटील, रेनुकाबाई पाटील , द्रुपताबाई मुनेश्वर, शकुंतलाबाई गीमेकार, पार्वताबा

गजानन बावणे बजाज फाईनसर्व हिरोज पुरस्कारांने सन्मानित

   (तालुका प्रतिनिधी किनवट) बजाज फाईनसर्व २०२१ हिरोज पुरस्कार किनवट बजाज फायनान्स शाखेचे गजानन बावणे यांच्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल त्यांना हा हिरोज पुरस्कारा बद्दल मिळाला बजाज फायनान्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव जैन, व चीफ ह्युमन रिसोसेस एडमीनीस्ट्रेशन ह्यांच्या स्वाक्षरी असेलेले मेल किनवट बजाज गोल्ड लोन विभागास मेल द्वारे हे हिरोज पुरस्कार प्राप्त झाले आहे या बद्दल बजाज फायनान्सचे नादेंड विभाग प्रमुख साईनाथ माळवतकर, शाखा प्रमुख महेश पांडे तसेच किनवट बजाज फायनान्स शाखेचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी या बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रपोज - कवी राजेश पाटील

  (प्रपोज) व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी  आलो होतो तुला प्रपोज करायला  पण तुला लपलेल पाहून  गुलाबाच्या पाकळ्याही लागल्या गळायला  मनात उराशी बाळगून  तूला सांगायच होत बरच काही  पण तूझ्या मनात काय आहे हे  मलाच माहीत नाही तूझ्या मनातही मी आहे  हे थोड थोड लागल कळायला पण तुला लपलेल पाहून  गुलाबाच्या पाकळ्याही लागल्या गळायला रोजच दिसते तू मला  बोलू काय माझ्या मनाला  जीवनात तरी ये माझ्या  अस स्वप्नात नको येऊ छळायला पण तुला लपलेल पाहून गुलाबाच्या पाकळ्याही लागल्या गळायला मी तुझ्यावर खूप मरतो  माझ्या सारखा दुसरा मिळणार नाही दिलवाला  आता तुच काय ठरव ते  तुझ्यासाठीच जीव लागलाय मरायला पण तुला लपलेल पाहून  गुलाबाच्या पाकळ्याही लागल्या गळायला कवी : राजेश पाटील  

किनवट न्यायालय अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी Advocate अरविंद चव्हाण तर सचिवपदी Advocate पंकज गावंडे यांची निवड तर अन्य पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

(टाईम्स ऑफ किनवट नेटवर्क)  किनवट, दि. ४ : किनवट न्यायालय अभीवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे यांची आज (दि.३)निवड करण्यात आली.अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली होती. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले.  निवडण्यात आलेले अभीवक्ता संघाचे  पदाधिकारी असे; अध्यक्ष ॲड.  अरविंद चव्हाण, सचिव ॲड. पंकज गावंडे उपाध्यक्ष ॲड.तोफिक कुरेशी, सहसचिव ॲड. बिपीन पवार, कोषाध्यक्ष ॲड. सुनील येरेकार. दोन कार्यकारिणी सदस्यांची लवकरच निवड करण्यात येईल.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विजय चाडावार यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. सूनील  येरेकार यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रियेसाठी  संतोष जकुलवार व विठ्ठल आरपेलिवार यांनी सहकार्य केले.    निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ॲड. अनंत वैद्य, ॲड. पंजाब गावंडे, ॲड. दिलिप काळे, ॲड. मिलिंद सर्पे, ॲड. शंकर राठोड, ॲड. उदय चव्हाण,ॲड. के. एस. काझी,ॲड. सुभाष ताजने, ॲड.जी. एस. रायबोळे, ॲड. यशवंत गजभारे, ॲड. आकाश कोमरवार, ॲड.संतोष नेम्मानीवार, ॲड.दिलीप कोट्टावार, ॲड. कृष्णा

//उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाकडे प्रशांत वाठोरे यांची जन सामान्य हित याचीका दाखल//

(ता .प्र. किनवट ) शहरात उद्भवणारा सार्वजनिक उपद्रव किनवट शहरात आज गंभीर रुप धारण केले आहे यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेच आहे  त्यामध्ये गाढवांच्या सार्वजनिक रस्त्यावरच्या मस्ती मुळे सर्वसामान्याचे अपघात होत आहेत. तसेच किनवट शहरवासी व व परिसरातील नागरिक त्यांच्या दुचाकी सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्तपणे लावत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. तसेच किनवट शहरातील सार्वजनिक रस्त्यावर गल्लोगल्ली सदृढ शरीर धारण करणारे भिकारी हे तर फार सर्वसामान्याला भावनिक साद देऊन ते जनसामान्यांना एक प्रकारचा त्यांच्या मनाच्या विरुद्ध कृती करण्यास भाग पाडून सार्वजनिक उपद्रव देत आहेत. यासंबंधातील अनेक बातम्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापून सुद्धा आलेल्या आहेत किनवट वासी व परिसरातील जनसामान्यांच्या त्रासाचे कारण हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत जाते म्हणून की काय परिसरातील नामवंत पत्रकार श्री प्रशांत रतन वाठोरे यांनी 2 फेब्रुवारी 2021 रोजी उपविभागीय दंडाधिकारी साहेब किनवट यांच्या न्यायालयात फौजदारी कलम 133 व भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे त्यांच्या विधिज्ञ मार्फत जनसामान्यांच्

अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र कडून जेष्ठ गज़लकार इलाही जमादार यांच्या स्मरनार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन

  नांदेड : मराठी मधील सुप्रसिद्ध स्मृतीशेष जेष्ठ गज़लकार मा. इलाही जमादार यांचे निधन झाले यांचे सांगली दुध गाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मारनात आज अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र कडून सहयोग नगर, नांदेड येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे अध्यक्ष अक्षरोदय साहित्य मंडळ, नांदेड चे अध्यक्ष मा. मारोती मुंडे हे होते व प्रमुख पाहुणे मा. विठ्ठलराव जोंधळे हे होते सभेच्या सुरुवातीस इलाही जमादार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सर्व मान्यवर यांनी उभे राहून ५ मिनिटांचे मौन पळाले नंतर सर्व कवी मान्यवर यांनी इलाही जमादार यांच्या आठवणीत त्यांच्या गझल सादर केल्या व इलाही जमादार सर नांदेड ला आले होते त्यांच्या भेटी बद्दल ही आठवण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या सभेत मंडळाचे सचिव मा. नरेंद्र धोंगडे, नांदेड जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण जेष्ठ साहित्यिक मोहनराव बुक्तरे आंबेडकरी कवी आ. ग. ढवळे कवी. भगत सर, रंगकर्मी आनंद कांबळे सर कांबळे ताई मनीषा सपकाळे मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख मा. पंकज कांबळे, उषाताई उषा ठाकूर, बालिका बरगळ मंडळाचे अध्यक्ष सदानंद सपकाळ

इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडीच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

  (किनवट ता .प्रतिनिधी ) गोरगरीब महिलांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या गोकुंदा येथील महिलांच्या खंबीर नेत्या तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून महिला जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे  यांच्या हस्ते नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.  किनवट तालुक्यातील  महिलावर्गाच्या विविध प्रश्नासाठी लढा देणार महिलांच खंबीर नेतृत्व म्हणून गोकुंदा येथील परवीन शेख यांची तालुक्यात ओळख आहे.  महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात परवीन शेख नेहमीच पुढाकार घेऊन महिलांना न्याय मिळून देतात तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन  पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विजया बावदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली   नांदेड जिल्हाध्यक्ष पद्मा गिरी यांनी परवीन शेख यांची महाराष्ट्र प

माजी राज्य महसुल मंत्री डि. बी. पाटील यांचा किनवट/ माहुर तालुका भाजप पक्षाच्या वतीने वाढदिवस साजरा

 माजी राज्य महसुल मंत्री डि. बी. पाटील यांचा  भाजप पक्षाच्या वतीने वाढदिवस साजरा किनवट ता. प्र.) भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ माजी राज्य महसुल मंत्री खासदार डि.बी. पाटील यांचा वाढदिवस किनवट -माहुर तालुका व बाहेरील कार्यकर्ते यांच्या उपस्थीतीत साजरा करण्यात आला त्यांचा हार शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ, व केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, युवक महीला कार्यकर्ते उपस्थित होते  यावेळी किनवट/ माहुरचे आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, नप उपाध्यक्ष अजय चाडावार ,जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर, मा. सभापती सोपानराव केंद्रे, श्याम भारती महाराज, काँग्रेसचे गंगारेड्डी बैनमवार, संध्याताई राठोड, भा ज प शहराध्यक्ष श्रीनीवास नेम्मानीवार, सभापती व्यंकट नेम्मानीवार, डॉ. अशोक चिन्नावार, संदिप केंद्रे, प्रतिक केराम,दिपक चाडावार, भावना दिक्षीत , गंगुबाई परेकार , बाळकृष्ण कदम, संतोष गीनगुले, प्रकाश, उमाकांत कराळे, प्रकाश कुडमुते, निळकंठ कातले तथा अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते या वेळी अनेक जेष्ठ व युवकांनी पक्षात प्रवेश केला