(प्रपोज)
व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी
आलो होतो तुला प्रपोज करायला
पण तुला लपलेल पाहून
गुलाबाच्या पाकळ्याही
लागल्या गळायला
मनात उराशी बाळगून
तूला सांगायच होत बरच काही
पण तूझ्या मनात काय आहे हे
मलाच माहीत नाही
तूझ्या मनातही मी आहे
हे थोड थोड लागल कळायला
पण तुला लपलेल पाहून
गुलाबाच्या पाकळ्याही
लागल्या गळायला
रोजच दिसते तू मला
बोलू काय माझ्या मनाला
जीवनात तरी ये माझ्या
अस स्वप्नात नको येऊ छळायला
पण तुला लपलेल पाहून
गुलाबाच्या पाकळ्याही
लागल्या गळायला
मी तुझ्यावर खूप मरतो
माझ्या सारखा दुसरा मिळणार नाही दिलवाला
आता तुच काय ठरव ते
तुझ्यासाठीच जीव लागलाय मरायला
पण तुला लपलेल पाहून
गुलाबाच्या पाकळ्याही
लागल्या गळायला
कवी : राजेश पाटील
Comments
Post a Comment