Skip to main content

इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडीच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 


(किनवट ता .प्रतिनिधी )

गोरगरीब महिलांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या गोकुंदा येथील महिलांच्या खंबीर नेत्या तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली

असून महिला जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे  यांच्या हस्ते नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 किनवट तालुक्यातील  महिलावर्गाच्या विविध प्रश्नासाठी लढा देणार महिलांच खंबीर नेतृत्व म्हणून गोकुंदा येथील परवीन शेख यांची तालुक्यात ओळख आहे.

 महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात परवीन शेख नेहमीच पुढाकार घेऊन महिलांना न्याय मिळून देतात तसेच

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विजया बावदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  

नांदेड जिल्हाध्यक्ष पद्मा गिरी यांनी परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली 

असून नुकतेच नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलिसांच्या कुटुंबासाठी तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी काम करणारी संघटना आहे. 

भरतीमध्ये पोलिस कुटुंबातील उमेदवाराला पाच टक्के आरक्षण तसेच रनिंग मध्ये 50 सेकंदाचा वेळ वाढवून देण्याचे काम या संघटनेने केल्यामुळे त्याचा पोलीस कुटुंबांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्यामुळे दिवसेंदिवस या असोसिएशनचा देशभरात विस्तार होताना दिसून येत आहे.

किनवट तालुक्यातील महिलांच्या प्रश्नासाठी मी सतत काम करत आले.

माझ्या या कार्याचे फलित म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य, महिला प्रदेशाध्यक्ष विजया बावदाने,

 जिल्हाध्यक्ष शेख शकील महोमद युसूफ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे  यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पडण्यास मी कटिबद्ध राहील

 या असोसिएशन माध्यमातून किनवट तालुक्यातील  अन्याय  अत्याचारग्रस्त महिलांना निश्चितपणे न्याय मिळून देण्याचे काम करू 

अशी प्रतिक्रिया परवीन शेख यांनी नियुक्तीनंतर दिली आहे.

या नियुक्तीबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह

कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सुरेखा काळे, मनसेचे मा.तालुकाध्यक्ष नितीन मौहरे.

 इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुकाध्यक्ष आनंद भालेराव, नासिर तगाले , राजेश पाटील,सुहास मुंडे, प्रवीण कोवे, गंगाधर कदम, अरविंद सूर्यवंशी , शेख अतीफ यांनी  परवीन शेख यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...