सुर्य-चंद्र माणसासाठी माणसाचीच माणसाला का होते आडकाठी....... मराठी भाषा गौरव दिना निमित्त कवि समेंलन उत्साहात
![]() |
(शहर प्रतिनीधी किनवट ):
दिवंगत प्रसिध्द, साहित्यिक, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर्फे ऑनलाईन कवि संमेलानाचे आयोजन दुपारी १:०० वाजता करण्यात आले होते या कवितेच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी, लेखक अॅड के.के. साबळे हे होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य राजकुमार नेम्मानिवार यांनी मांडले तर
डॉ.एस.के. बेंबरेकर यांनी मराठी भाषा दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास ऑनलाईन प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,कार्यक्रमाची सुरवात ऑनलाईन कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करुन झाली.
कविसंमेलनाच्या सुरवातीस कवी रमेश मुनेश्वर यांनी "हाता पायाच्या जखमा साऱ्या
'बा' च्या कहाण्या सांगायच्या
शेतामध्ये पीक नाही तरीही
बाप जगायचा"
हि शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी काव्य रचना सादर केली व शब्दचक्षु नावाची प्रेम कविता सादर करुन ऑनलाईन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल .
या नतंर युवाकवी राजेश पाटील यांनी
" खर सांगु माॅ तुझ्यावर लिहतांना शब्द सुध्दा अपुरे पडले
जीवन काय असते हे तुझ्या मुळेच कळले
व "त्या लिबांच्या झाडाखाली सावली होती
तेव्हांच तु मला आय लव्ह यु म्हणाली होती"
हि कविता सादर केली व उपस्थित लाईव्ह प्रेक्षकांची दाद मिळवली .
या नंतर कविसंमेलन अध्यक्ष अॅड के. के.साबळे यांनी
"सुर्य-चंद्र माणसासाठी पृथ्वीही माणसासाठी
माणसाचीच माणसाला का होते आडकाठी
पर्वतही माणसासाठी
नद्याही माणसासाठी
घाणीचे साम्राज्य माणसाने का
करावे नद्याकाठी"
हि सामाजिक रचना व " बाळा तुझी मला रे काळजी वाटे तुझ्या जीवनाला आता फुटले अनेक फाटे" हि रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली
या नंतर कवी वैभव जिल्हावार कवी रुपेश मुनेश्वर,डॉ. आनंद भालेराव, प्रा.सुरेश पाटील,प्रा.विजया खामनकर व विद्यार्थी अर्जुन जाधव, दिव्या बावणे, राहुल करमनकर, नितीन भगत, राजेश्वरी मडावी, रामेश्वर शेंडे, शेख अरशद, शुभम राठोड, विकास ठाकरे आदी बळीराम पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी ऑनलाईन झुम अँपवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी केले .
Comments
Post a Comment