किनवट:(तालूका प्रतिनिधी)
कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवट व विविध उपक्रमांनी सजलेली तालुक्यातील थारा केंद्रा अंर्तगत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 258वी जयंती दि. 15 रोजी सकाळी 11 वा. साजरी करण्यात आली. या प्रसंगी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवनावर शाळेचे सहशिक्षक देविदास येरवाळ यांनी प्रकाशझोत टाकला.
कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव पी व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष नामदेवराव रामतिर्थकर, मुख्याध्यापक कारामुंगे सर, पर्यवेक्षक राठोड सर, जेष्ठ शिक्षक घोरबांड सर, मोहिते सर, बारापात्रे सर, बामणीकर सर, कदम सर, कयापाक, जाधव सर, कोत्तरवार मॅडम, आलोने मॅडम आदींनी अभिवादन केले.
जाणजो,छाणजो पच माणजो ह्या संत सेवालाल यांनी दिलेल्या संदेशाचा उलगडा सतीश मठदेवरू यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केल तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस येथील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक राजीव बैलके,श्रीमती वैशाली यलमटे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment